CONVERSATION
Girl Standing in a Balcony
CONVERSATION
श्रीगणेशा..
खूप दिवसापासून माझ्या स्केचेस, पेंटींग्जस, कॅलीग्राफी, असेच काहीतरी खरडलेले स्केचेस ब्लॉग वर टाकायची इच्छा होती. इथे पण ब्लॉग चे नाव शोधण्यामध्ये एक महिना गेला आणि त्याहून जास्त टेम्प्लेट शोधण्यामध्ये गेला. टेम्प्लेट वर काम चालूच आहे. एखादी चांगली थीम भेटली तर परत थीम चेंज करेन. तोपर्यंत हीच चालवायची.
म्हटल सुरुवात गणपती बाप्पा पासूनच करुया. वरील चित्र डायरेक्ट पेनाने काढले आहे.मला खोड रबर न वापरता चित्राचे स्ट्रोक काढायला आवडतात. त्यामुळे मी खोडरबर कधीच जाग्यावर ठेवत नाही आणि खोडरबर ची सवय सुटायला मी मुद्दाम स्केच पेन किंवा पेनाने चित्र काढतो.
म्हटल सुरुवात गणपती बाप्पा पासूनच करुया. वरील चित्र डायरेक्ट पेनाने काढले आहे.मला खोड रबर न वापरता चित्राचे स्ट्रोक काढायला आवडतात. त्यामुळे मी खोडरबर कधीच जाग्यावर ठेवत नाही आणि खोडरबर ची सवय सुटायला मी मुद्दाम स्केच पेन किंवा पेनाने चित्र काढतो.
CONVERSATION
श्री घाटण देवीचे मंदिर
मंदिराचा बोर्ड |
मागच्या महिन्यात नाशिक सेक्युरीटी प्रेस बघायचा योग आला होता. मुंबई नाशिक हायवे वरून जाताना मानस रेसोर्ट च्या आधी एका ठिकाणी काही गाड्या थांबलेल्या दिसल्या. पास होता होता एक वाकडा झालेला बोर्ड बघायला मिळाला. " श्री घाटण देवी मंदिर" मनात लगेच विचारचक्र चालू झाली हे नाव कुठे ऐकले आहे. नंतर आठवले माझ्या बायकोच्या तोंडून हे नाव ऐकले आहे. हि घाटण देवी तिच्या गावाचे कुलदैवत. तीने सांगितले होते कि कधी नाशिक ला जायला मिळाले तर नक्की त्या देवीचे दर्शन करून ये. ते आठवेपर्यंत गाडी ९० च्या स्पीड ने खूप पुढे निघून गेली होई. ड्रायवर ला सांगून ठेवले होते कि येताना ते मंदिर आले तर सांग मला दर्शनाला थांबायचे आहे.येतेवेळी त्याने आठवणीने मानस रेसोर्ट आल्यावर सांगितले गाडी बाजूला थांबवून मी तिथे उतरलो.
सुंदर छोटेसे मंदिर रस्त्याच्या बाजूला उभे होते. ते बहुतेक नवीन बांधलेले होते कारण आधीचे मंदिर जुन्या रस्त्याच्या खूप जवळ होते आणि खूप छोटे होते. रस्ता रुंदीकरणात ते मागे घेऊन नवीन मोठे देऊळ बांधले आहे. बुटे काढून आत आलो तर समोर सुंदर देवीची मूर्ती दिसली काही माणसे दर्शन घेत उभी होती. रात्री गस्त घालणारे हायवे पोलीस साष्टांग नमस्कार घालत होते. मोठ्याने आवाज देत होते,'देवी सर्वांचे रक्षण कर, आज कुणाचा अपघाताची बातमी नको येउदे'. नमस्कार घालून ते निघून गेले.
मी मंदिर रिकामे होईपर्यंत बाहेर थांबलो कारण मला फोटो काढायचे होते. दरवाज्यातच देवीचा सोनेरी रंगातला सिंह होता. लाल रंगाच्या साडीतली देवीची मूर्ती छान दिसत होती. बघून प्रसन्न वाटले.
मी मंदिर रिकामे होईपर्यंत बाहेर थांबलो कारण मला फोटो काढायचे होते. दरवाज्यातच देवीचा सोनेरी रंगातला सिंह होता. लाल रंगाच्या साडीतली देवीची मूर्ती छान दिसत होती. बघून प्रसन्न वाटले.
ह्या मंदिरानातर मुंबईकडे येताना कसारा घाट चालू होतो. पूर्वीचा घाट खूप अरुंद होता आणि अपघाताचे प्रमाण खूप होते. त्यामुळे ह्या हायवे वरून जाणारे ट्रक ड्रायवर, एसटी ड्रायवर ह्या देवीला पाया पडल्याशिवाय पुढे जात नव्हते. आता हि लोक कसारा घाट चालू व्हायच्या आधी ह्या देवीचे दर्शन केल्याशिवाय पुढे जात नाही. ह्या देवीची दर दसऱ्याला मोठी जत्रा भरते.आजूबाजूच्या गावातले सर्व गावकरी मोठ्या उत्साहाने जत्रा साजरी करतात.
कधी नाशिक हायवे वरून पास होत असाल तर नक्की ह्या देवीचे दर्शन घ्या.
CONVERSATION
My Tour Diary/ माझे प्रवास वर्णन
लहानपणापासून मी अनेक मोठ्या मोठ्या लेखकांची प्रवास वर्णने वाचत आलो आहे. नंतर नंतर खूप कंटाळा यायला लागला आणि प्रवास वर्णनांची चीड यायला लागली. मधली काही वर्षे तर मी काहीच प्रवास वर्णने वाचली नाहीत. नंतर नेट आल्यावर मग भरपूर जणांची प्रवास वर्णने वाचायला लागलो तरी सुद्धा जेवढे पाहिजे तेवढे आवडत नाही. पण नवीन जागा / नवीन माहिती असेल तर वाचायला नक्की आवडते. लहानपणी विचार केला होता कि आपण पण आपला प्रवास वर्णन लिहावे पण मध्यंतरीच्या काळात त्या गोष्टीचा कंटाळा यायला लागला होता त्यामुळे दुर्लक्ष झाले होते. ऑफिस च्या कामामध्ये फिरताना काही नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या पण त्या माझ्या जुन्या ब्लॉग मध्येच टाकल्या आहेत.
काही दिवसापूर्वी ठाण्यामध्येच फिरताना काही नवीन मंदिरे , जुन्या वस्तू दिसल्या तेव्हा अचानक विचार आला. आपले पण प्रवास वर्णन लिहायचे पण वाचन बोरिंग न करता फोटो लावून मोजक्या शब्दातच लिहायचे. त्या जागेबद्दल असलेली माहिती लिहियाची. मग त्या अनुषंगाने नवीन ब्लॉग लिहायचा विचार आला. ब्लॉगला नाव सुचता सुचता आणि ते ब्लॉगर वर मिळेपर्यंत एक महिना गेला. शेवटी कॉम्प्रोमाईज करत My Tour Diary हे नाव मिळाले. आणि श्री गणेश झाला. त्याची थीम आणि टेम्प्लेट करेपर्यंत दोन आठवडे गेले आणि फायनली पहिला ब्लॉग चालू झाला. तो पर्यंत ५० विझिट हि मिळाल्या...बहुतेक शोधाशोध करणारे आले असावेत.
असो फायनली ब्लॉग चालू झाला. ह्यात हेडिंग मध्ये लिहिल्याप्रमाणे अगदी घराच्या एक किलोमीटर अंतरापासून प्रवास चालू करणार आहे. ह्यात साहजिकच माझी बाईक आणि बायकोची मला चांगली साथ मिळणार आहे.
CONVERSATION
हनिमूनला गेल्यावर...
हनिमूनला गेल्यावर...
मागच्या पोस्ट मध्ये हनिमून ला जाण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी लिहिले आहे. सर्व तयारी करून हनिमून ला पोचल्यावर कोणत्या गोष्ठी लक्षात ठेवू शकता हे इथे दिले आहे.
(सर्व चित्रे नेट वरून साभार/ Image Source: Internet)
मागच्या पोस्ट मध्ये हनिमून ला जाण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी लिहिले आहे. सर्व तयारी करून हनिमून ला पोचल्यावर कोणत्या गोष्ठी लक्षात ठेवू शकता हे इथे दिले आहे.
- हनिमून च्या ठिकाणी सकाळी किंवा दुपारी पोचाल अशा हिशोबाने निघा कारण नवीन शहरात हॉटेल शोधताना त्रास होऊ शकतो. जर तुम्ही पॅकेज मधुन जाणार असाल तर टूरिस्ट वाले तुमच्या साठी सर्व बंदोबस्त करून ठेवतात पण जर तुम्ही स्वत: प्लॅनिंग केले असेल तर दिवसा उजेडी नवीन शहरात पोहचणे चांगले. किंवा जर तुम्ही हॉटेल बुकिंग केले असेल तर हॉटेल वाले हि तुमच्यासाठी रेल्वे स्टेशन किंवा एअरपोर्ट वर गाडी पाठवतात.
- प्रवासात आपल्या पार्टनर ला कधीही एकटे सोडू नका. जर चुकामुक झाली तर खूप त्रास होऊ शकतो. त्यामुळे बस अथवा रेल्वे स्टेशन ला थांबली असताना फिरून येणे टाळा. जर गाडी चुकली तर विचार करून बघा नवीन शहरात किती मनस्ताप होईल ते ?
- तुम्ही जर टॅक्सी किंवा रिक्शाने जर हॉटेल वर पोचणार असाल तर छोट्या छोट्या गोष्टीवरून किंवा पैशावरून त्यांच्याशी हुज्जत घालू नका अशाने तुमचा मुड हि खराब होतो आणि पार्टनर समोर इमेज हि खराब होते.
- हनिमुनला गेल्यावर मनमोकळा खर्च करा. काही पैशांसाठी चांगल्या हॉटेलात जाणे, वस्तू विकत घेणे टाळू नका. (त्यासाठी तुम्हाला आयुष्यभर ऐकावे लागू शकते.)
- हनिमून ला गेल्यावर पैशांचे पाकीट बाळगण्यापेक्षा प्लास्टिक मनी म्हणजेच डेबिट कार्ड/ क्रेडीट कार्ड वापरा ते सोयीस्कर पडते. पण हाताशी सुट्टे पैसे पण बाळगा. सर्व पैसे स्वत: कडे न ठेवता अर्धे आपल्या पार्टनर कडे देऊन ठेवा जेणेकरून जर तुमचे पाकीट कधी मारले गेले तर तुमच्या पार्टनर कडे तरी काही पैसे राहतील.
- सहसा हनिमूनला गेल्यावर नवदाम्पत्यांची चांगली बडदास्त ठेवली जाते. हनिमून कपल ला सर्व ठिकाणी आदराने मदत केली जाते. त्यामुळे हॉटेल मध्ये गेल्यावर तिथे तुम्ही हनिमून ला आला आहात असे समजले तर हॉटेल वाले तुमची चांगली खातिरदारी करतात. काही हॉटेल मध्ये स्पेशल हनिमून स्युट असतात ते तुम्हाला मिळू शकतात. ते तुमची रूम चांगली सजवूनहि देतात. नसेल देत तर काही पैसे देऊन तुमची रूम चांगली सुवासिक फुले किंवा सुगंधी मेणबत्ती लावून सजवून घ्या. त्याने तुमची रात्र नक्कीच चांगली जाईल.
- महत्वाचे : रूम वर गेल्यावर सुरक्षितेच्या दृष्टीने सर्व रूम चेक करा. आजकाल छुपे कॅमेरे आणि टू साईड मिरर मुळे तुमचे खाजगी जीवन धोक्यात येऊ शकते.कदाचित हे वाचायला तुम्हाला विचित्र वाटेल पण ह्या गोष्टींची शक्यता टाळता येत नाही अगदी मोठी मोठी ५ स्टार हॉटेल हि ह्या प्रकरणात सामील असतात. त्यामुळे आपण काळजी घेतलेली बरी.
- हे कॅमेरे शक्यतो एखाद्या वस्तुत लावले असू शकतात जेथून तुमचा बेड व्यवस्थित दिसतो. त्यामुळे रुम मधल्या सर्व वस्तू चेक करणे चांगले. जसे भिंतीवरील एखादे पेंटिंग, शोपीस , बेड वर लावलेले डिझाईन , फ्लॉवरपॉट, पेन, रंगीत दिवे, आरसे, कुठलीही इलेक्ट्रिक वस्तू, बाथरूम मधील एखादा नको असलेला पाईप, बाथरूम च्या खिडक्या वगैरे अनेक गोष्टीमध्ये छुपे कॅमेरे असू शकतात. त्यामुळे सर्व वस्तू हलवून, फिरवून ठेवणे चांगले.
- आपल्या भारतीय संस्कृतीत लग्न झाल्यावर इतक्या विधी असतात कि जेणे करून नवीन कपल ला हनिमून ला जाण्यापूर्वी खूप वेळ मिळतो. ह्या सर्व प्रसंगात आपल्या पार्टनर ला ओळखून घ्यायचा प्रयत्न करा. वेळ आणि एकांत मिळेल तेव्हा एकमेकांना हलकाच चोरून स्पर्श करा. सर्वांच्या नकळत हलकेच हात हातात घेऊन दाबा. अगदीच मिळाले तर गालावर चुंबन करा. जेणेकरून एकमेकांच्या स्पर्शाची सवय होईल आणि हनीमून च्या वेळेला तुमच्या मिलनाच्या इच्छा चांगल्या जागृत होतील.
- आज कालच्या मुली जरी मॉड असल्या तरी काही मुली आपले घर, आई वडील ह्यांना सोडून आल्या असल्यामुळे जरा नाराज असतात. सासर चे नवीन आई वडील, नवीन कुटुंब, खाण्याच्या, राहण्याच्या पद्धती ह्यामुळे जरा बावरलेल्या असतात. त्यात एक पुरुषाबरोबर नवीन ठिकाणी जावे लागल्यामुळे हि जरा घाबरलेल्या असतात. त्यामुळे एकदम त्यांच्यावर तुटून पडू नका. प्रवासात त्यांच्याशी गप्पा मारा त्यांना विश्वासात घ्या. हातात हात घेऊन हलकेच दाबा त्यामुळे त्यांना विश्वास वाटेल आणि जरा सावरायला मदत होईल.
- आई वडिलांना सोडून आल्यामुळे मनातून उदास असतात त्यामुळे वेळ भेटेल तेव्हा त्यांना घरी फोन लावून द्या. त्यामुळे जरा उदासी कमी होईल. (तुम्हाला रोमिंग चार्जेस लागतील पण ते दुर्लक्ष करा. फोन लावायच्या आधी त्यांना कल्पना द्या. फोन लावल्यावर सांगू नका...त्यांना राग येतो)
- फिरायला गेल्यावर पार्टनर ला एकटे सोडून जावू नका. कुठे चुकामुक झाली तर कुठे भेटायचे हे सांगून ठेवा. मोबाईलची रेंज असेलच सांगता येत नाही.
- साईट सीइंगचे, फिरण्याचे शेड्युल आधीच आखून ठेवावे. मोजक्याच जागा बघाव्या अन्यथा थकायला होते आणि रात्री जगायचे पण असते ना !!
- हनिमून च्या पहिल्याच रात्री घाई करू नका जर लग्न अरेंज मॅरेज असेल तर दोघांनी एकमेकांना समजण्यास वेळ घ्यावा आणि मगच शारीरिक संबध प्रस्थापित करावे.
- जेवताना प्रमाणात खा आणि खाल्ल्यावर दात घासायला विसरू नका. माउथ फ्रेशनर चा उपयोग हि करू शकता. जेवल्या जेवल्या लगेच बेड वर जाऊ नका. जवळपास फेरी मारून या किंवा हॉटेल च्या बगीच्या मध्येच फेरी मारा.
- नशापान करणे टाळा. पार्टनर वर वेगळाच परिणाम पडू शकतो.
- खाताना, फिरताना, काही गोष्ट करताना वाद टाळा. एकमेकांवर कमेंट मारू नका किंवा एकमेकांचा पाणउतारा करत बसू नका. काही चुकले तर एकांतात किंवा रूम वर आल्यावर समजावून सांगा.
- लग्नात आलेले कौटुंबिक समस्या, लग्नातले वाद, देवाण घेवाण वरून झालेले वाद आपल्या हनिमूनला तर नक्कीच टाळावे. ऑफिस च्या गोष्टी, फोन टाळा.
- शक्य तवढे दागिने आणि मौल्यवान वस्तू कमीत कमी घेऊन जा.
- पहिल्याच रात्री शारीरिक संबंध साठी घाई करू नये. जर अरेंज मॅरेज असेल तर मुलीला सावरायला वेळ लागतो. पहिल्या रात्री गप्पा हि मारू शकता एकमेकांच्या आवडी निवडी जाणून घेऊ शकता.
- मिलनापुर्वी अंघोळ नक्की करा त्याने अंगाला घामाचा वास हि नाही येणार आणि तुम्हाला फ्रेश वाटेल.
- पार्टनर ला हलकेच स्पर्श करा, हात हातात घेऊन हलकेच दाबा. एकांतात मिठीत अलगद ओढून घ्या. लाजून मुलगी बाजूला होत असेल तर तिला होऊ द्या पुढच्या वेळेला मिठीत घेतली कि ती नाही बाजूला होणार. ओठांवर चुंबन घेण्याची घाई करू नका. पहिले गालावर करा, कपाळावर करा आणि मग ओठांवर करा.
- वातावरण निर्मिती करण्यासाठी लाईट डीम करू शकता, रूम सुगंधित करू शकता, एखादी सुगंधी अगरबत्ती लावू शकता. सुगंधी फुले बेड वर टाका. रोमॅंटिक गाणे लावा. गाणे लावायला काही नसेल तर मोबाईल मध्येच लावा.
- वातावरण निर्मिती झाली कि मग हलकेच स्पर्श करा. स्पर्शात जी भावना व्यक्त करण्याची ताकत असते ती कशात हि नाही. हळुवार आलिंगन द्या कुठेही घिसाड घाई करू नका.
- आधी सांगितल्याप्रमाणे पार्टनर ला काहीतरी सरप्राईज गीफ्ट द्या. छान अशी अंतर्वस्त्रे द्या.बाजारात हनिमून स्पेशल अशी अंतर्वस्त्रे मिळतात. त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी एक छानसे आपल्या हाताने प्रेम पत्र लिहा. प्रेम पत्र कसे लिहायची ह्याच्या काही छान टिप्स तुम्हाला प्रशांत रेडकर ह्यांच्या ब्लॉग वर मिळतील.
- आजकाल च्या मुलांमध्ये एक भीती असते, तणाव असतो कि आपण हे करू शकू कि नाही आपण लवकर एक्साईट होऊन काही गडबड तर नाही ना करणार. ह्या तणावामुळे मुले चांगले प्रेम हि करू शकत नाही. तीच गोष्ट मुलींच्या बाबतीत असते. भीतीमुळे त्यांचे शरीर त्यांना साथ देत नाही आणि नर्वसनेस मुळे त्या प्रतिसाद देऊ शकत नाही आणि पहिली रात्र तणावाखाली वाया जाते. ह्या सर्व गोष्टींचे टेन्शन न घेता बिनधास्त प्रेम करावे. काही चुकले माकले तरी ते दोघांमध्येच राहणार असते. दोघांनी एकमेकांना सांभाळून घ्यावे.
- तुझे हे पहिले चुंबन होते का ? तुझे हे पहिले प्रेम होते का ? तुझ्या आयुष्यात आलेला मी पहिलाच/ पहिलीच आहे ना ? असे फालतू प्रश्न विचारू नये. समजा उत्तर "नाही" आले तर ..ते सहन करायची ताकत असायला हवी.
- फॅमिली प्लॅनिंग नक्की करा. निदान सुरवातीचे २ वर्षे तरी.
- जास्त डीटेल मध्ये आता लिहीत नाही बाकी तसे आपण सुज्ञ असलाच.
मधुचंद्राच्या शुभेच्छा !!!
Happy Honeymoon. !!!
(सर्व चित्रे नेट वरून साभार/ Image Source: Internet)
CONVERSATION
हनिमुनला जाण्यापुर्वी
हनिमूनला जाण्यापूर्वीच्या टिप्स
नुकतेच माझ्या एका मित्राचे लग्न झाले. ३ ते ४ दिवसांनी तो हनिमून ला जाईल. तेव्हा सिनिओरिटि च्या नात्याने त्याने माहिती विचारले. सिनिओरिटि अशा साठी कि माझे लग्न होऊन दोन वर्षे होत आली आहेत आणि आम्ही हनिमून ला जाऊन आलोय. अर्थातच आपल्याला कुणी भाव देऊन विचारले तर नक्कीच आपण २ इंच छाती फुगवून त्याला आपल्या अनुभवाचे बोल सांगतो. तसेच काही माझ्या बाबतीत हि झाले. म्हटले ज्या टिप्स त्याला दिल्या आहेत तेच ब्लॉग वर टाकू जेणेकरून इतरांना हि फायदा होईल.
काही गोष्टी अनुभवाच्या आहेत तर काही आजूबाजूच्या परिस्थिती वर अवलंबून आहेत.लग्न झाले आणि सर्व धार्मिक विधी उरकत आले कि नवदाम्पत्यांना हनिमून ची ओढ लागायला लागते. प्रत्येकालाच आपला हनिमून हा चांगल्या शहरात, मोठ्या हॉटेलात, सुंदर निसर्गरम्य वातावरणात आणि एकांतात साजरा करायचा असतो. पण काही छोट्या मोठ्या चुकांमुळे व काही गोष्टी विसरल्यामुळे हनिमून च्या मजेवर पाणी फिरू शकते.
- हनिमून चे ठिकाण निवडण्यापूर्वी आपल्या पार्टनरचा विचार नक्की घ्यावा. असे नको व्हायला कि तुम्ही जिथे बुकिंग कराल तिथे तुमचा पार्टनर आधीच आपल्या कुटुंबाबरोबर जाऊन आला किंवा आली असेल तर मग तुमची सगळी मजाच जाईल. एक वेळ मुले जाऊन असेल तरी ठीक आहे. जेणेकरून नवीन जोडप्यांना अनोळखी ठिकाणी फिरताना अडचण होणार नाही.
- स्थळ निवडताना असेही होऊ शकते कि तुम्ही आपल्या भावी पत्नीला विचारात असाल तर ती लाजेल सुद्धा, अशावेळी तिला सरळ प्रश्न न विचारता विश्वासात घ्यावे आणि गप्पांच्या ओघात तिच्या मनाचा कल जाणून घ्यावा.
- हनिमून चे ठिकाण ठरवताना तिथल्या वातावरणाची, ऋतू, तिथले सण/उत्सव ह्याची सुद्धा माहिती घ्यावी. कारण जर थंडीच्या दिवसात तुम्ही हिल स्टेशन ला गेलात तर तिथली थंडी तुम्हाला सहन होत नाही. आता पूर्ण कपडे घालून हनिमून कसा करणार ? काही शहरामध्ये तिथले धार्मिक उत्सव चालू असतात अशा वेळी जर आपण तिथे हनिमून ला गेलो तर राहण्यासाठी हॉटेल मिळत नाही, शहरात गर्दी असल्यामुळे हनिमून ला लागणारा एकांतहि मिळत नाही. उदाहरण द्यायचे झाले तर दसऱ्याच्या सुमारास जर मैसूर ला गेलात तर राहायला हॉटेल्स नाही मिळत. राजवाड्यातून निघणारी मिरवणूक बघण्यासाठी खूप पर्यटक येतात.
- स्थळ जेवढे शांत, रमणीय आणि सुंदर असेल तितकाच तुमचा हनिमून मादक आणि बेभान होतो. त्यामुळे तुम्ही निवडलेल्या ठिकाणावरच तुमचा ५०% हनिमून सक्सेस होतो.
- हनिमून पॅकेज देणाऱ्या अनेक कंपनी किंवा खाजगी टूरिस्ट वाले असतात. सगळ्यांची पॅकेज चांगली बघून घ्यावी पूर्ण माहिती काढावी मगच निर्णय घ्यावा. जर नेट वरून बुकिंग करणार असेल तर आधी जाऊन आलेल्या लोकांचे कमेंट नक्की वाचावे. कधी कधी हॉटेल चे फोटो खूप चांगले लावलेले असतात पण प्रत्यक्षात हॉटेल्स तेवढे चांगले नसतात.
- ठरवलेले ठिकाणी जाण्यासाठी वाहतुकीचे सर्व पर्याय (रस्ता,रेल्वे,हवाई) बघावे. जर रस्ता प्रवासाने जाणार असेल तर बस ची कंडीशन नक्की बघून घ्यावी. कारण प्रवासात नंतर त्रास होतो. रेल्वेने जाणार असेल तर तिकीट कन्फर्म असेल तरच जावे. नवीन नवरीला घेऊन उभ्याने प्रवास केला तर आयुष्यभर बायकोचे ऐकावे लागेल. हवाई प्रवास असेल तर पहाटेचे विमान पकडावे जेणेकरून तुम्ही दिवसा नवीन ठिकाणी पोहोचाल आणि काही शोधायचे असेल तर दिवसा शोधणे सोपे असते. नवीन ठिकाणी रात्रीचे उतरल्यावर हॉटेलपर्यंत पोचण्याचा त्रास होऊ शकतो. कारण आपल्या देशातली जास्तीत जास्त विमानतळे (काही मुख्य शहरातील अपवाद सोडला तर) हि शहरापासून दूर आहेत.
- शक्य असल्यास कमीत कमी ७/८ दिवसांचे ते १५ दिवसापर्यंतचे पॅकेज बुक करावे. चार पाच दिवसांचे पॅकेज स्वस्त असले तरी वेळ खूप कमी भेटतो आणि हनिमून चा आनंद घेतल्या सारखा वाटत नाही.
- बजेट जेमतेम असेल आणि वेळ कमी असेल तर जाताना रेल्वेचा प्रवास करू शकता आणि येताना विमानाने प्रवास करू शकता. येताना थकला असता ना !
- विमानाने प्रवास करताना काही लिक़्विड वस्तू जसे लोशन, हेअर क्रीम वगैरे घेऊन जाऊ नका. नेलकटर, शेविंग किट अगदी बिसलेरीचे पाणी हि घेउन जायला परवानगी नसते. त्यामुळे जेवढ्या गरजा आहेत तेवढेच सोबत घ्या.
- काही महत्वाच्या वस्तू म्हणजे माउथ फ्रेशनर, परफ्यूम, डीओ जेणेकरून तुम्ही तुमच्या पार्टनर बरोबर राहताना एकदम फ्रेश राहाल.
- हनिमून ची तारीख पक्की करण्याआधी भावी वधूची मासिक सायकल पण लक्षात घेणे जरुरी आहे. जर तुम्ही ह्या गोष्टीवर तिच्याशी बोलू शकत नसाल तर आपल्या घरातील कोणी बायका मंडळीना सांगून माहिती करून घ्या. नाहीतर तुमचा मधुचंद्र पूर्ण वाया जाऊ शकतो. जर हि गोष्ट लक्षात नाही राहिली आणि तुम्ही आधीच बुकिंग करून ठेवलं असेल आणि मुलीची तारीख पण त्याच दरम्यान असेल तर डॉक्टरचा सल्ला जरूर घ्या आणि मुलीच्या तारखा पुढे ढकलण्यासाठी गोळ्या हि घेऊ शकता.
- हनिमून हा आयुष्यभर लक्षात राहण्यासारखी गोष्ट आहे त्यामुळे आपल्या पार्टनरला अशी एखादी त्याची आवडती वस्तू द्या कि ती त्याने आयुष्यभर आठवणीत ठेवली पाहिजे. पण हि वस्तू हनिमून ला जाण्यापूर्वी घेतलेली चांगली कारण नवीन ठिकाणी जाऊन तुम्ही शोधणार कुठे ? आणि पार्टनरला सरप्राईज हि राहणार नाही.
- ह्या वस्तू मध्ये तुमच्या ऐपती प्रमाणे अगदी गुलाबाचे फुल पासून सोन्याचा एखादा दागिनाहि घेऊ शकता. ह्यात फुले, एखादा सुंदर ड्रेस, साडी, पर्स, छोटे दागिने, एखादे आवडते पुस्तक, मुव्हीची सीडी (जो तुम्ही लग्न आधी एकत्र बघितलेला असू शकतो), मोबाईल, घड्याळ, अंतर्वस्त्रे (लिन्जेरी), स्वत: लिहिलेले प्रेमपत्र वगैरे गोष्टी देऊ शकता. महाग वस्तू घेतली असेल तर जास्त आकडू नका नाहीतर पार्टनर ला वाटेल कि पैशाने प्रभावित करतोय आणि एखादी स्वस्त वस्तू घेतली असेल तर पार्टनरला त्या मागच्या तुमच्या भावना समजावून सांगा अन्यथा असे वाटेल कि आपला पार्टनर किती कंजूष आहे.
- हनिमून चा अर्थ हा बहुतेकजण फक्त मौजमजा, फिरणे आणि शारीरिक संबंध एवढाच घेतला जातो. माझ्या मते हा समज काढून टाकावा हनिमून कडे एक आपल्या सुंदर वैवाहिक जीवनाची सुरुवात म्हणून बघावे. पहिले मनाचे मिलन झाले पाहिजे मग शरीराचे मिलन सहज होते.
- हनिमून च्या आठवणी कायम राहण्यासाठी कॅमेरा किंवा विडीओ शुटींग हि करू शकता. पण आपल्या खाजगी क्षणांची शुटींग करणे टाळावे. करण्यात काही अडचण नसते पण भीती हीच असते कि ती तुमच्याकडून गहाळ किंवा चोरली गेली तर आपले खाजगी जीवन बाहेर पडू शकते. काही जण मोबाईल मध्ये आपल्या पार्टनर ची शुटींग करतात आणि मोबाईल चोरी ला गेला किंवा दुरुस्तीला दिला कि प्रॉब्लेम होऊ शकतो आणि आपले खाजगी क्षण सहज पब्लिक क्षण होऊन जातात. कोणी आपल्याला ब्लॅकमेल हि करू शकतो.
- प्रवासात लागणाऱ्या तसेच नवीन ठिकाणी लागणाऱ्या वस्तूची शक्यतो यादी बनवून ठेवा जेणेकरून आयत्यावेळेला घाई होणार नाही आणि वस्तू विसरणारहि नाही.
ह्या झाल्या काही बेसिक गोष्टी ज्या हनिमून ला जाण्यापूर्वी विचारात घेऊ शकता. हनिमून ला गेल्यावर काय काळजी घ्यावी ह्या पुढच्या भागात लिहिल्या आहेत.
CONVERSATION
Valentine Hearts
माझ्या ब्लॉगवर अपडेट केलेली Valentine theme बघितलीच असेल. हि थीम जर तुम्हाला पण लावायची असेल. तर ह्या ब्लोगरमिंट च्या साईट वर टिचकी मारा. Falling Heart wiget वर टिचकी मारा. ती लिंक तुम्हाला तुमच्या ब्लॉगर पेज वर घेऊन जाईल. तेथे लॉगिन करा. मग ती लिंक तुम्हाला Add Page Element वर घेऊन जाईल. तेथे तुमचा ब्लॉग निवडा आणि Add Widget वर टिचकी मारा.
आणि आता ब्लॉग चेक करा
Soooo Cooooollllll na !!!!
आता तुमच्या पार्टनर ला तुमचा ब्लॉग चेक करायला सांगून सरप्राईज करा.
प्रेमदिवसाच्या शुभेच्छा....
आणि आता ब्लॉग चेक करा
Soooo Cooooollllll na !!!!
आता तुमच्या पार्टनर ला तुमचा ब्लॉग चेक करायला सांगून सरप्राईज करा.
प्रेमदिवसाच्या शुभेच्छा....
(image: net) |
CONVERSATION
चंद्र / The moon
CONVERSATION
ताज हॉटेल, मुंबई / Taj Hotel, Mumbai
CONVERSATION
ताज हॉटेल, मुंबई / Taj Hotel, Mumbai
CONVERSATION
गेटवे ऑफ इंडिया, मुंबई / Gateway Of India, Mumbai
CONVERSATION
गेटवे ऑफ इंडिया, मुंबई / Gateway Of India, Mumbai
CONVERSATION
काळाघोडा फेस्टिवल २०११
दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा काला-घोडा फेस्टिवलची जोरदार सुरुवात झाली. मी शनिवारीच जाऊन बघून आलो. पण ब्लॉग वर अपडेट करायला दुसरा शनिवार उजाडला. खर तर पुढचे सात दिवस ऑफिस मधून सुट्टी काढून दिवसभर तिथे राहायला पाहिजे. पण काय करणार जमण्यासारखे नाही आहे. खरच ज्याला कले मध्ये खूप इंटरेस्ट आहे त्याने नक्कीच इथे भेट दिली पाहिजे. काही काढलेले निवडक फोटो खालील फोटोब्लॉग लिंक वर देत आहे.
CONVERSATION
Kalaghoda Festival 2011 part 2
CONVERSATION
Subscribe to:
Posts
(
Atom
)
Total Pageviews
Popular Posts
-
लहानपणी शाळेत चांगले मार्क मिळाले पाहिजे म्हणत बालपण गेले, हायस्कूल मध्ये वयाची १५ वर्षे गेली. चांगली नोकरी लागली पाहिजे म्हणून चांगला अभ्या...
-
हॅल्लो ! ! हॅल्लो कोण ? हा मी दादा बोलतोय. हा दादा बोला. अरे तो ' पॅंथर ' ' वाघाच्या ' गुहेत गेला ऐकलेय ? हो ना ! दाद...
-
लेना होगा जनम तुम कई कई बार..... one and only .....Dev Anand एवर-ग्रीन देवानंदला आपल्याकडे बोलावून देवाला पण आनंद झाला असेल. केसाचा ...
-
हो नाही करत शेवटी अर्ध्या दिवसासाठी का होईना येऊरला जायचे ठरले. माझ्या घरच्या मागेच येऊर च्या डोंगररांगा आहेत. हा भाग संजय गांधी नॅशनल पा...
-
जयवंत दळवी यांचे परममित्र हे पुस्तक वाचनात आले. हे पुस्तक म्हणजे जवळपास 300 पानांचे एक वेगवेगळ्या काळी लिहिलेले छोटे छोटे व्यक्तिचित्रणात्...
Like us
Tweet Tweet
Blog Archive
-
▼
2011
(79)
-
▼
February
(18)
- Sleeping Girl
- Girl Standing in a Balcony
- श्रीगणेशा..
- श्री घाटण देवीचे मंदिर
- My Tour Diary/ माझे प्रवास वर्णन
- हनिमूनला गेल्यावर...
- हनिमुनला जाण्यापुर्वी
- Valentine Hearts
- चंद्र / The moon
- ताज हॉटेल, मुंबई / Taj Hotel, Mumbai
- ताज हॉटेल, मुंबई / Taj Hotel, Mumbai
- गेटवे ऑफ इंडिया, मुंबई / Gateway Of India, Mumbai
- गेटवे ऑफ इंडिया, मुंबई / Gateway Of India, Mumbai
- काळाघोडा फेस्टिवल २०११
- Kalaghoda Festival 2011 part 2
- Kalaghoda Festival 2011 part 1
- भारतीय टपाल खात्याचा नविन उपक्रम
- माझ्यासाठी एक सुवर्णयोग....
-
▼
February
(18)
2 comments:
Post a Comment
आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!