एका भन्नाट माणसाचा सीव्ही
===============
शैक्षणिक रेकॉर्ड
१९४८, पंजाब विश्वविद्यालय - मैट्रिक परीक्षा - प्रथम श्रेणी
१९५०- मध्यवर्ती पंजाब विश्वविद्यालय - विश्वविद्यालय मध्ये प्रथम श्रेणीत प्रथम स्थान.
१९५२- बी.ए. अर्थशास्त्र (ऑनर्स), पंजाब विश्वविद्यालय - द्वितीय श्रेणी पण विश्वविद्यालय मध्ये प्रथम स्थान
१९५४ - एमए अर्थशास्त्र, पंजाब विश्वविद्यालय - विश्वविद्यालय मध्ये प्रथम श्रेणीत प्रथम स्थान.
१९५७ -आर्थिक त्रय्पोस [प्रथम श्रेणी ने उत्तीर्ण], कैम्ब्रिज विश्वविद्यालय
१९६२ - डी. फिल. न्युफिल्ड कॉलेज, ऑक्सफोर्ड चे विश्वविद्यालय
विषय- भारताचे निर्यात धोरण आणि विकास (Clarendon प्रेस, ऑक्सफोर्ड, १९६४ द्वारा प्रकाशित)
१९५२ - विश्वविद्यालय पदक, पंजाब विश्वविद्यालय, चंडीगढ़- बी.ए. (अर्थशास्त्र) मध्ये प्रथम येण्यासाठी.
१९५४- उत्तर चंद कपूर पदक, पंजाब विश्वविद्यालय, एमए (अर्थशास्त्र),- पंजाब विश्वविद्यालय, चंडीगढ़ मध्ये प्रथम येण्यासाठी.
१९५६ - एडम स्मिथ पुरस्कार, कैम्ब्रिज विश्वविद्यालय, ब्रिटेन मध्ये सन्मानित.
१९५५ - प्रतिष्ठित प्रदर्शन साठी राइट पुरस्कार ने सम्मानित - सेंट जॉन कॉलेज, कैंब्रिज, ब्रिटेन
१९५७ - वरेन्बरी (Wrenbury) विद्वान म्हणून निवड, कैम्ब्रिज विश्वविद्यालय, ब्रिटेन
१९७६ - मानद प्रोफेसर, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय, नई दिल्ली
१९८२ - निर्वाचित मानद फैलो, बैंकरों चे भारतीय संस्थान
१९८२ - निर्वाचित मानद फैलो, सेंट. जॉन्स कॉलेज, कैम्ब्रिज,
१९८५ - निर्वाचित प्रेसिडेंट, भारतीय आर्थिक संघ
१९८६ - राष्ट्रीय फैलो, राष्ट्रीय शिक्षा संस्थान, एनसीईआरटी
१९८७ - भारत च्या राष्ट्रपति हस्ते पद्म विभूषण पुरस्कार
१९९३ - एशिया मनी Asiamoney पुरस्कार, १९९३ वर्ष चे वित्त मंत्री
१९९३ - युरोमनी Euromoney पुरस्कार, वर्ष के वित्त मंत्री
१९९४ - मानद फैलो, ऑल इंडिया मैनेजमेंट एसोसिएशन
१९९४ - निर्वाचित मानद फैलो, Nuffield कॉलेज, ऑक्सफोर्ड विश्वविद्यालय, ऑक्सफोर्ड, ब्रिटेन
१९९४ - Asiamoney पुरस्कार, ह्या वर्षचे वित्त मंत्री
१९९४ - निर्वाचित गणमान्य फैलो, लंदन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, एशिया अर्थव्यवस्था, राजनीति आणि समाजाचे केंद्र
१९९४ - Asiamoney पुरस्कार, वर्ष चे वित्त मंत्री
वर्ष १९९४-९५ साठी- १९९५ चा जवाहरलाल नेहरू भारतीय विज्ञान कांग्रेस एसोसिएशन चा जन्म शताब्दी पुरस्कार
१९९६ - मानद प्रोफेसर, दिल्ली स्कूल ऑफ इकोनॉमिक्स, दिल्ली विश्वविद्यालय, दिल्ली
१९९७ - में क्षेत्रीय विकास साठी Nikkei एशिया पुरस्कार दैनिक Nihon Keizai Shimbun (Nikkei) इंक, जापान च्या प्रमुख व्यापार प्रकाशक तर्फे पुरस्कृत
१९९७ - न्यायमूर्ति के.एस. हेगड़े फाउंडेशन पुरस्कार वर्ष १९९६ करिता
१९९७ - टिळक स्मारक ट्रस्ट, पुणे तर्फे लोकमान्य टिळक पुरस्काराने सम्मानित
१९९९ - में भारताचे पूर्व राष्ट्रपति और संरक्षकश्री आर वेंकटरमण कडून एचएच कांची श्री परम्चार्या पुरस्कार उत्कृष्टता प्राप्त
१९९९ - कृषि विज्ञान, नवी दिल्ली कडून राष्ट्रीय अकादमी ची फैलोशिप
२००० - W.LG. तर्फे अन्नासाहेब चिरमुले पुरस्कार ने सम्मानित (यूनाइटेड वेस्टर्न बैंक लिमिटेड, सातारा, महाराष्ट्र)
१९५७-५९ : अर्थशास्त्र मध्ये वरिष्ठ व्याख्याता
१९५९-६३: अर्थशास्त्र विषयासाठी रीडर
१९६३-६५ : अर्थशास्त्र चे प्रोफेसर
१९५७-१९६५ : प्रोफेसर पंजाब विश्वविद्यालय, चंडीगढ़
१९६६: आर्थिक मामले चे अधिकारी
१९६६-१९६९: UNCTAD, संयुक्त राष्ट्र सचिवालय, न्यूयॉर्क. व्यापार अनुभाग साठी मुख्य वित्त पोषण,
१९६९-१९७१: आंतरराष्ट्रीय व्यापार चे प्रोफेसर, दिल्ली स्कूल ऑफ इकोनॉमिक्स, दिल्ली विश्वविद्यालय, भारत
१९७१-१९७२: आर्थिक सल्लागार, विदेश व्यापार मंत्रालय, भारत
१९७२-१९७६: मुख्य आर्थिक सल्लागार, वित्त मंत्रालय भारत,
नोवेंबर.१९७६ - एप्रिल १९८०: सचिव, वित्त मंत्रालय, आर्थिक बाबी विभाग,भारत सरकार सदस्य [वित्त], परमाणु ऊर्जा आयोग, भारत सरकार.
अंतरिक्ष आयोग, भारत सरकार
एप्रिल १९८०-१९८२ सप्टेंबर: सदस्य सचिव, योजना आयोग, भारत
१९८२ सप्टेंबर - जानेवारी १९८५: राज्यपाल( गवर्नर), रिजर्व बैंक ऑफ इंडिया
जानेवारी १९८७ -जुलै १९८५ अध्यक्ष, योजना आयोग भारत
ऑगस्ट १९८७ - नोव्हेंबर १९९०: महासचिव आणि आयुक्त, दक्षिण आयोग.
डिसेंबर १९९० - मार्च १९९१: आर्थिक मामले. सल्लागार - भारत प्रधानमंत्री सल्लागार
मार्च १९९१ - जून १९९१: अध्यक्ष, विश्वविद्यालय अनुदान आयोग
सप्टेंबर, १९९१: राज्य सभेचे सदस्य म्हणून नियुक्ती.
जून, १९९५: सहा वर्षासाठी पुन: राज्य सभा सदस्य म्हणून नियुक्ती
२१ जून १९९१ - १५ मे, १९९६: भारताचे अर्थ मंत्री
१ ऑगस्ट, १९९६ - ४ डिसेंबर, १९९७: अध्यक्ष, वाणिज्य संबंधी संसदीय स्थायी समिति, राज्य सभा
जून, २००१: सहा वर्षासाठी पुन: राज्य सभा सदस्य म्हणून नियुक्ती
२१ मार्च, १९९८ - मे २२,२००४: विपक्ष नेता, राज्य सभा (राज्य परिषद) संसद
(तूम्हाला आता अंदाज आला असेल की हा रीज्युमे कोणाचा आहे. पुढे वाचत राहा )
१. “India’s Export Trends and Prospects for Self-Sustained Growth”. [Clarendon Press, Oxford University, 1964] पुस्तकाचे लेखक
२. आर्थिक पत्रिकांमध्ये अर्थशास्त्रावर विपुल लेखन.
कामाचा अनुभव आणि पदे
१९५९-६३: अर्थशास्त्र विषयासाठी रीडर
१९६३-६५ : अर्थशास्त्र चे प्रोफेसर
१९५७-१९६५ : प्रोफेसर पंजाब विश्वविद्यालय, चंडीगढ़
१९६६: आर्थिक मामले चे अधिकारी
१९६६-१९६९: UNCTAD, संयुक्त राष्ट्र सचिवालय, न्यूयॉर्क. व्यापार अनुभाग साठी मुख्य वित्त पोषण,
१९६९-१९७१: आंतरराष्ट्रीय व्यापार चे प्रोफेसर, दिल्ली स्कूल ऑफ इकोनॉमिक्स, दिल्ली विश्वविद्यालय, भारत
१९७१-१९७२: आर्थिक सल्लागार, विदेश व्यापार मंत्रालय, भारत
१९७२-१९७६: मुख्य आर्थिक सल्लागार, वित्त मंत्रालय भारत,
नोवेंबर.१९७६ - एप्रिल १९८०: सचिव, वित्त मंत्रालय, आर्थिक बाबी विभाग,भारत सरकार सदस्य [वित्त], परमाणु ऊर्जा आयोग, भारत सरकार.
अंतरिक्ष आयोग, भारत सरकार
एप्रिल १९८०-१९८२ सप्टेंबर: सदस्य सचिव, योजना आयोग, भारत
१९८२ सप्टेंबर - जानेवारी १९८५: राज्यपाल( गवर्नर), रिजर्व बैंक ऑफ इंडिया
जानेवारी १९८७ -जुलै १९८५ अध्यक्ष, योजना आयोग भारत
ऑगस्ट १९८७ - नोव्हेंबर १९९०: महासचिव आणि आयुक्त, दक्षिण आयोग.
डिसेंबर १९९० - मार्च १९९१: आर्थिक मामले. सल्लागार - भारत प्रधानमंत्री सल्लागार
मार्च १९९१ - जून १९९१: अध्यक्ष, विश्वविद्यालय अनुदान आयोग
सप्टेंबर, १९९१: राज्य सभेचे सदस्य म्हणून नियुक्ती.
जून, १९९५: सहा वर्षासाठी पुन: राज्य सभा सदस्य म्हणून नियुक्ती
२१ जून १९९१ - १५ मे, १९९६: भारताचे अर्थ मंत्री
१ ऑगस्ट, १९९६ - ४ डिसेंबर, १९९७: अध्यक्ष, वाणिज्य संबंधी संसदीय स्थायी समिति, राज्य सभा
जून, २००१: सहा वर्षासाठी पुन: राज्य सभा सदस्य म्हणून नियुक्ती
२१ मार्च, १९९८ - मे २२,२००४: विपक्ष नेता, राज्य सभा (राज्य परिषद) संसद
(तूम्हाला आता अंदाज आला असेल की हा रीज्युमे कोणाचा आहे. पुढे वाचत राहा )
प्रकाशन
२. आर्थिक पत्रिकांमध्ये अर्थशास्त्रावर विपुल लेखन.
व्यक्तिगत माहिती
वडिलांचे नाव - श्री गुरमुख सिंह
जन्म तारीख - २६ सप्टेंबर, १९३२
१९५८ मध्ये श्रीमती गुरुशरण कौर ह्यांच्याबरोबर लग्न
नाव : मनमोहन सिंग
२००४ पासून भारत देशाचे पंतप्रधान म्हणून कार्यरत
====================
एवढा हुशार पंतप्रधान क्वचितच कुठल्या देशाला लाभला असेल. डॉ. मनमोहन सिंग हे खरच एक हुशार, प्रतिभावान, उच्चशिक्षित, विचारवंत आणि एक उत्कृष्ट अर्थतज्ञ आहे. भारताचे नशीब चांगले म्हणून देशाला असे पंतप्रधान भेटले आहे. पण तेव्हढेच नशीब बाईट ते चुकीच्या वेळेला ते पंतप्रधान झाले. कदाचित वेळेशी त्यांना काही फरक नसता पडला. पण त्यांना चांगले मंत्रिमंडळ मिळालेच नाही. एखाद दुसरा मंत्री सोडला तर सगळेच मॅडमच्या मागे. सगळ्यांची इमानदारी आणि निष्ठा मॅडमच्या आणि गांधी घरांच्या चरणी वाहलेली. त्यामुळे एक जगप्रसिद्ध आणि नावाजलेला अर्थतज्ञ पंतप्रधान म्हणून लाभलेला आपला भारत देश सध्या सर्वात महागडी जीवनशैली असलेला देश बनत चालला आहे. त्यांच्यासारखा अर्थतज्ञ असून ही महागाई कमी होत नाही, चलन फुगवटा वाढत आहे, पेट्रोल आणि गॅस चे भाव गगनाला भिडत चालले आहेत, गृहकर्जे, वाहन कर्जे महाग होत चालली आहे, देशात भयंकर घोटाळे झाल्यामुळे सरकारच्या हातात पैसा उरत नाही आहे. गेले कित्येक दिवसातून चांगल्या योजना आल्या नाहीत. केंद्रात एक अस्थिर सरकार बनत चालले आहे. देशावर आर्थिक आणीबाणी ओढवली आहे. असे का ?
अनेक छोटे छोटे देश त्यांचे आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी डॉ. मनमोहन ह्यांच्याशी सल्लामसलत करतात. जगातील अनेक अर्थतज्ञ त्यांनी मांडलेले सिद्धांत मानतात. असे जगातील एक प्रसिद्ध अर्थतज्ञ आपल्या देशाचे सर्वात मोठे पद चालवत असून आपल्या देशात आर्थिक आणीबाणी सारखी परिस्थिती का यावी? मागे एकदा राजीव गांधी म्हणाले होते आम्ही केंद्रातून जर १०० रुपये एका योजने मागे देत असू तर ते शेवटच्या भारतीय व्यक्ती पर्यंत पोचेस्तोवर १० रुपयेच पोचतात. असे का होते ?
जेव्हा १९९० मध्ये भारत मोठ्या राजकीय आणि आर्थिक संकटात सापडला होता. त्यावेळेला डॉ मनमोहन सिंग हे अर्थमंत्री झाले होते. पी व्ही नरसिंह राव त्यावेळेस पंतप्रधान होते. ह्या दुकलीने स्वत: धोके पत्करून भारतात परदेशी कंपनींना प्रवेश दिला. भारताचा ग्लोबल विकास चालू केला. आयात निर्यातीवरच्या बंदी शिथिल झाल्या. भारतात ग्लोबलायजेशनचे वारे वाहू लागले. आज आपला जो आर्थिक विकास झाला आहे. आज अनेक प्रगत तंत्रज्ञान जे भारतात आले आहे ते डॉ. मनमोहन ह्यांच्या यशस्वी प्लानिंग मुळेच झाले आहे. ह्या गोष्टी त्यावेळेस जर झाल्या नसत्या तर भारतात अजून इंटरनेट, मोबाईल सेवा वगैरे तरी आल्या असत्या का? असे ह्याची शंका आहे. भारताची जीवन शैली आणि विकास करण्यात डॉ. मनमोहन ह्यांचा सिंहाचा वाटा आहे. असा हुशार माणूस असून सुद्धा फक्त साधीशी महागाई ताब्यात ठेवू शकत नाही. असे होणारच नाही. नक्की कुठेतरी पाणी मुरतेय!!!
अण्णांनी जेव्हा लोकपालची मागणी लावून धरली होती. त्यावेळेस डॉ. मनमोहन ह्यांचे एक स्टेटमेंट आले होते की पंतप्रधानांना लोकपाल कक्षेत आणायला काहीच हरकत नाही पण अत्यावश्यक निर्णय घेण्यासाठी त्यांना मुभा असली पाहिजे. त्यांनी पंतप्रधानांना लोकपाल कक्षेत आणायला विरोध कधीच केला नव्हता. मग तरी सुद्धा अण्णांना १३ दिवस उपोषण का करावे लागले ही विचार करण्यासारखी गोष्टी आहे. मला तर वाटतेय की नक्कीच त्यांना फक्त कठपुतली बनवण्यात आले आहे. प्रणव मुखर्जी आणि कपिल सिब्बल ह्या दोघांची निष्ठा मॅडम कडे जास्त आहे. पुढे मागे राहुल पंतप्रधान होईपर्यंत त्यांना काही काळासाठी पंतप्रधान बनण्याची संधी चालून येऊ शकते. त्यामुळे त्यांचे लक्ष देशाकडे नाही. म्हणूनच अण्णांच्या वेळेला एवढी हलगर्जी झाली.
ह्या सर्व लोकांनी पंतप्रधानांना लोकपाल कक्षेत आणायला विरोध अशासाठी केला असावा की पुढे मागे राहुल पंतप्रधान बनणार आहे त्यावेळेला त्याची सगळी माहिती आणि गुपिते उघडकीस येतील. त्याला दुसऱ्या देशात झालेली अटक, त्याचा मित्र परिवार, त्याचे शैक्षणिक पराक्रम हे सगळे उघडकीस येतील. म्हणून पंतप्रधानांना लोकपाल कक्षेत आणण्यासाठी विरोध झाला असावा.
टू जी चा घोटाळा आज पर्यंत झालेला देशातील सर्वात मोठा घोटाळा. ह्यात ह्या हुशार माणसाचे नाव गुंतले गेले. का ? तर त्यांनी ए राजाने पाठवलेल्या एका ऑफिस नोट वर सही केली. पुढे न्यायालयीन चौकशी झाली तेव्हा पंतप्रधानांच्या कार्यालयातून ए राजाला असे न करण्याबाबत एक पत्रही गेले होते. म्हणजे जे काही होणार होते ते चुकीचे होते हे डॉ. मनमोहन ह्यांना माहित होते. मग तरी सुद्धा त्यांनी शेवटी चार पाच वेळेला परत पाठवलेल्या ऑफिस ऑर्डर वर सही का केली असावी? अर्थशास्त्रावर जाडे जाडे ग्रंथ लिहिणारा माणूस एखादी ऑफिस ऑर्डर न वाचता किंवा चुकीच्या ऑफिस ऑर्डरवर सही करेल का ? की त्यांना जबरदस्तीने सही करायला लावले गेले असेल? टू जी चा घोटाळा बाहेर काढणारे सुब्रामण्यम स्वामी हे सर्वाना माहीतच असतील. हे सुब्रामण्यम स्वामी डॉ. मनमोहन ह्यांचे चांगले मित्र. मग त्यांनीच हा घोटाळा बाहेर काढून पंतप्रधानांवर आरोप का करावे? देशाच्या इतिहासात कदाचित प्रथमच पंतप्रधानांना सुप्रीम कोर्टात हजर राहण्याची ऑर्डर का यावी? वैचारिक आणि वैयक्तिक पातळीवर चांगले मित्र असणारे स्वामी, डॉ मनमोहन ह्यांना का जवाबदार धरत आहे. डीएमके च्या राजाने केलेले पराक्रम काँग्रेस मधील वरच्या पातळीमध्ये मध्ये सगळ्यांना माहित असावेत. सगळ्यांचा काहीनाकाही फायदा आणि वाटा ही असावा. तसेच डीएमके ला दुखावून काँग्रेस ला जमणारे नव्हते. त्यामुळेच डॉक्टरांना लक्ष्य बनवले गेले असावे आणि सही करण्यास मजबूर केले गेले असावे.
मला तर वाटते की डॉ. मनमोहन हे आतल्या आत घुसमटत असतील. एवढा मोठा फ्रॉड आपल्या डोळ्यादेखत झाला आहे तरी आपण गप्प कसे बसावे? देशाच्या जनतेचा घामाचा पैसा आपल्याला लुटण्याचा काय अधिकार आहे? असे त्यांचे मन त्यांना खात असावे म्हणूनच त्यांनी सुब्रमण्यम स्वामींना पुढे करून सगळा घोटाळा उघड करावयास लावला असावा. एव्हढे आरोप करून सुद्धा त्यांनी सुब्रमण्यम स्वामींना एका शब्दाने सुद्धा जाहीररीत्या प्रत्युत्तर दिले नाही. ह्याचा अर्थ काय असावा? नाहीतर एका राजकारणी माणसावर दुसऱ्याने आरोप केला तर दुसरा त्याला पत्रकार सभा बोलावून नक्की उत्तर देणार. आपले राज आणि उद्धवचेच बघा ना ! पण स्वामींच्या एकाही आरोपाला डॉक्टरांनी उत्तर दिले नाही. ह्यातच काय ते समजायचे.
मागे त्यांच्या गुडघ्याचे ऑपरेशन करायचे होते तेव्ह्या त्यांना कितीजणांनी परदेशी जाण्याचे सल्ले दिले होते त्यावेळेस त्यांनी भारतीय डॉक्टरांवर भरवसा ठेवत दिल्ली मध्ये ऑपरेशन केले. सोनियाबाईनी त्यांच्या ऑपरेशन साठी डायरेक्ट अमेरिका गाठली.
असो ! देव करो न्यायालय त्यांना टुजी प्रकरणात क्लीन चिट देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि आम्हाला त्यांच्यासारखे हुशार नेतृत्व मिळो हीच अपेक्षा. भले मग काँग्रेस सरकार असेल तरी चालवून घेऊ.
ह्यापुढे कोणाला सरदार म्हणून चीडवायाच्या आधी विचार करा.
(ह्या वरील सर्व फोटो नेट वरून साभार)
0 comments:
Post a Comment
आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!