My Tour Diary/ माझे प्रवास वर्णन

लहानपणापासून मी अनेक मोठ्या मोठ्या लेखकांची प्रवास वर्णने वाचत आलो आहे. नंतर नंतर खूप कंटाळा यायला लागला आणि प्रवास वर्णनांची चीड यायला लागली. मधली काही वर्षे तर मी काहीच प्रवास वर्णने वाचली नाहीत. नंतर नेट आल्यावर मग भरपूर जणांची प्रवास वर्णने वाचायला लागलो तरी सुद्धा जेवढे पाहिजे तेवढे आवडत नाही. पण नवीन जागा / नवीन माहिती असेल तर वाचायला नक्की आवडते. लहानपणी विचार केला होता कि आपण पण आपला प्रवास वर्णन लिहावे पण मध्यंतरीच्या काळात त्या गोष्टीचा कंटाळा यायला लागला होता त्यामुळे दुर्लक्ष झाले होते. ऑफिस च्या कामामध्ये फिरताना काही नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या पण त्या माझ्या जुन्या ब्लॉग मध्येच टाकल्या आहेत.

काही दिवसापूर्वी ठाण्यामध्येच फिरताना काही नवीन मंदिरे , जुन्या वस्तू दिसल्या तेव्हा अचानक विचार आला. आपले पण प्रवास वर्णन लिहायचे पण वाचन बोरिंग न करता फोटो लावून मोजक्या शब्दातच लिहायचे. त्या जागेबद्दल असलेली माहिती लिहियाची. मग त्या अनुषंगाने नवीन ब्लॉग लिहायचा विचार आला. ब्लॉगला नाव सुचता सुचता आणि ते ब्लॉगर वर मिळेपर्यंत एक महिना गेला. शेवटी कॉम्प्रोमाईज करत My Tour Diary हे नाव मिळाले. आणि श्री गणेश झाला. त्याची थीम आणि टेम्प्लेट करेपर्यंत दोन आठवडे गेले आणि फायनली पहिला ब्लॉग चालू झाला. तो पर्यंत ५० विझिट हि मिळाल्या...बहुतेक शोधाशोध करणारे आले असावेत.

असो फायनली ब्लॉग चालू झाला. ह्यात हेडिंग मध्ये लिहिल्याप्रमाणे अगदी घराच्या एक किलोमीटर अंतरापासून प्रवास चालू करणार आहे. ह्यात साहजिकच माझी बाईक आणि बायकोची मला चांगली साथ मिळणार  आहे.

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top