Hopeless !!
जळगाव रेल्वे प्लॅटफॉर्म...
एक दाढीवाला मुस्लिम म्हातारा तोंडात तंबाखू कोंबून मोबाईल स्पीकर वर ठेवून मोठ्या कर्कश्श आवाजात एक कव्वाली ऐकतोय....बाजूच्या बाकड्या वर एक माणूस भयंकर दारू पिऊन लाल डोळ्यांनी इकडे तिकडे बघत जबरदस्तीने जागे राहायचे प्रयत्न करतोय.....तिकडे एक आई आपल्या लहान मुलाला नुन्नी पकडून प्लॅटफॉर्म वर कशी सु सु करायची ते शिकवते आहे.. उजव्या बाजूला एक दारुडा आपल्या दुसऱ्या दारू पिलेल्या मित्राला जीवनाचे ज्ञान देतोय...आणि त्याचा मित्र तोंडातील पानाची लांब पिचकारी मारून 'अरे तुले काय मायित बेे?' असे विचारतोय.... प्लॅटफॉर्म वरचे पोलीस खांद्या वर हात टाकून कुठे तरी वरचा पैसा कसा कौशल्याने कमावला त्याचे अनुभव शेअर करताहेत... एक सून आपल्या म्हातारीची बडबड ऐकत पाय गुढघ्यात घेऊन शून्यात नजर लावून बसलीय....एक अती उत्साही अल्पवयीन मुलगा कानात हेडफोन लावून प्लॅटफॉर्म वर येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक मुलगीला न्याहाळून पाहतोय....एक कळकट फाटके कपडे घातलेला मध्यवयीन पुरुष भिकारी आपल्या मळकट गोणींमध्ये प्लॅस्टिक जमा करत फिरतोय...एक म्हातारी भिकारी कुठून तरी बांधून आणलेले अन्न खाऊन तिथेच हात धुवून...चूळ भरून... प्लॅटफॉर्म वरच झोपायची तयारी करतेय.... दोन गावाकडच्या बायका आपल्या पिल्लांबरोबर प्लॅटफॉर्मवरच खाली फतकल मारून बसल्या आहेत...उशीर झालेल्या ट्रेनला खान्देशी भाषेत शिव्या घालत आता घरी कधी पोचणार ह्या काळजीत आहेत...त्यांची पिल्ले एकमेकांबरोबर एक चॉकलेट वरूनभांडत आहेत...त्या बायका मध्येच पोरांच्या पाठीत धपाटे घालून त्यांना दूर करत आहेत.... अजून शंभर एक माणसे तरी आहेत ह्या प्लॅटफॉर्म वर....एकाकडेही नवीन उमेद नाही...नवीन काही करायचा उत्साह नाही... एक वेगळे अस्तित्व तयार करायची इच्छा नाही..... सगळे आला दिवस ढकलताहेत ...आणि उद्याची वाट बघताहेत...
मी...
मी पण ह्यातलाच एक होऊन उशीर झालेल्या ट्रेनची वाट बघतोय..
ठ्ठलवि...ठ्ठलवि....ठ्ठलवि...
1 comments:
Post a Comment
आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!