द आदर साईड ऑफ मी - रसग्रहण
खूप दिवसांनी एक चांगले पुस्तक वाचल्याचे समाधान भेटले. सिडने शेल्डन
चे आत्मकथा असलले पुस्तक 'द आदर साईड ऑफ मी'.
सहसा मला आत्मकथा जास्त वाचायला आवडत नाहि.
सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद आणि लाल बहादूर शास्त्री असे क्वचित व्यक्ती सोडल्या तर मी खूप कमी आत्मकथा वचतो.
कुठले पुस्तक वाचायचे हे कळत नव्हते म्हणून लायब्ररी वाल्याला सांगितले तुला जे आवडेल ते पुस्तक आणून दे. त्याने सिडने शेल्डनची आत्मकथा -'द आदर साईड ऑफ मी'
हे मराठी अनुवाद केलेले
पुस्तक घरपोच आणून दिले. ते आत्मकथा आहे समजल्यावर त्याला परत फोन लावला कि मला
आत्मकथा वाचायला आवडत नाही हे पुस्तक घेऊन जा. पण त्याला फोन लागला नाही. त्याला
मेसेज करून ठेवला कि मला दुसरे पुस्तक दे. तोपर्यंत नेमके
काय आहे ह्या पुस्तकात म्हणून म्हटले एक पान वाचून बघूया आणि सिडने शेल्डन च्या ओघवत्या
शैलीने त्याचा दिवाना झाला. एक पान वाचायचे म्हणून ठरवले होते पण रात्री
झोपेपर्यंत ४५ पाने वाचून झाली होती. दुसर्या
दिवशी लायब्ररी वाल्याने फोन केला कि दुसरे पुस्तक आणू का? त्याला
म्हटले नको हेचं वाचून संपवणार.
आत्मकथा असून हि ३५७ पानाचे पुस्तक
वाचताना कधीच कंटाळा आला नाही की एखादा पाराग्राफ सोडून द्यावासा वाटला नाही.
दिवसाला जवळपास पन्नास पाने करत एका आठवड्यात पुस्तक वाचून झाले. सिडने शेल्डन
बद्दल आधी फक्त ऐकून होतो. त्याची इंग्लिश पुस्तके खूप वेळा पुस्तकांच्या दुकानात
बघितली होती. त्याचा ‘Sidney Sheldon’ नावाचा
फोन्ट डोळ्यासमोर होता पण कधी पुस्तके वाचली नव्हती. हे पुस्तक हातात पडे पर्यंत
सिडने मला एका मुलीचे नाव वाटत होते. पुस्तकाचे मलपृष्ट बघितल्यावर समजले की
सिडने शेल्डन हा पुरुष आहे.

त्याचे आत्मकथन म्हणजे उपदेशाचे डोस, तत्वज्ञान वगैरे काहीच नाही. एकदा मित्र जसा खूप दिवसांनी भेटल्यावर गप्पा मारतो तसा समोर बसून गप्पा मारल्या आहेत. जेव्डे अनुभव त्यांच्या गाठीशी होते तेव्हढे दुसऱ्या कोणाच्या असते तर त्याने नक्कीच उपदेशाचे डोस पाजले असते. पण सिडने असे काही न करता सहज सोप्या भाषेत आपले आत्मकथन सांगितले आहे.
खूप चांगले पुस्तक वाचल्याचे नक्कीच समाधान आहे. माधव कर्वे ह्यांनी
सुद्धा पुस्तकाचे अप्रतिम रित्या अनुवाद करून चांगले लेखन केले आहे. नक्कीच वाचण्यासारखे आहे हे पुस्तक
2 comments:
Post a Comment
आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!