श्री घाटण देवीचे मंदिर

मंदिराचा बोर्ड

मागच्या महिन्यात नाशिक सेक्युरीटी प्रेस बघायचा योग आला होता. मुंबई नाशिक हायवे वरून जाताना मानस रेसोर्ट च्या आधी एका ठिकाणी काही गाड्या थांबलेल्या दिसल्या. पास होता होता एक वाकडा झालेला बोर्ड बघायला मिळाला. " श्री घाटण देवी मंदिर" मनात लगेच विचारचक्र चालू झाली हे नाव कुठे ऐकले आहे. नंतर आठवले माझ्या बायकोच्या तोंडून हे नाव ऐकले आहे. हि घाटण देवी तिच्या गावाचे कुलदैवत. तीने सांगितले होते कि कधी नाशिक ला जायला मिळाले तर नक्की त्या देवीचे दर्शन करून ये. ते आठवेपर्यंत गाडी ९० च्या स्पीड ने खूप पुढे निघून गेली होई. ड्रायवर ला सांगून ठेवले होते कि येताना ते मंदिर आले तर सांग मला दर्शनाला थांबायचे आहे.येतेवेळी त्याने आठवणीने मानस रेसोर्ट आल्यावर सांगितले गाडी बाजूला थांबवून मी तिथे उतरलो.


श्री घाटण देवीचे मंदिर 
सुंदर छोटेसे मंदिर रस्त्याच्या बाजूला उभे होते. ते बहुतेक नवीन बांधलेले होते कारण आधीचे मंदिर जुन्या रस्त्याच्या खूप जवळ होते आणि खूप छोटे होते. रस्ता रुंदीकरणात ते मागे घेऊन नवीन मोठे देऊळ बांधले आहे.  बुटे काढून आत आलो तर समोर सुंदर देवीची मूर्ती दिसली काही माणसे दर्शन घेत उभी होती. रात्री गस्त घालणारे हायवे पोलीस साष्टांग नमस्कार घालत होते. मोठ्याने आवाज देत होते,'देवी सर्वांचे रक्षण कर, आज कुणाचा अपघाताची बातमी नको येउदे'. नमस्कार घालून ते निघून गेले.

मी मंदिर रिकामे होईपर्यंत बाहेर थांबलो कारण मला फोटो काढायचे होते. दरवाज्यातच देवीचा सोनेरी रंगातला सिंह होता. लाल रंगाच्या साडीतली देवीची मूर्ती छान दिसत होती. बघून प्रसन्न वाटले.

ह्या मंदिरानातर मुंबईकडे येताना कसारा घाट चालू होतो. पूर्वीचा घाट खूप अरुंद होता आणि अपघाताचे प्रमाण खूप होते. त्यामुळे ह्या हायवे वरून जाणारे ट्रक ड्रायवर, एसटी ड्रायवर ह्या देवीला पाया पडल्याशिवाय पुढे जात नव्हते. आता हि लोक कसारा घाट चालू व्हायच्या आधी ह्या देवीचे दर्शन केल्याशिवाय पुढे जात नाही. ह्या देवीची दर दसऱ्याला मोठी जत्रा भरते.आजूबाजूच्या गावातले सर्व गावकरी मोठ्या उत्साहाने जत्रा साजरी करतात.
कधी नाशिक हायवे वरून पास होत असाल तर नक्की ह्या देवीचे दर्शन घ्या.

श्री घाटण देवी
श्री घाटण देवी
श्री घाटण देवी
मंदिर बाहेरचा परिसर


CONVERSATION

1 comments:

  1. he wow he amch kuldaivat ahe. chan ale ahet photos

    ReplyDelete

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top