Bullock Cart / बैल गाडी
CONVERSATION
नकळत एकदा...
आजपण नेहमीप्रमाणे आईने त्याला औषधाच्या गोळ्या काढून दिल्या. आईला नको म्हणून समजावून सांगून सुद्धा तिने गोळ्या आणि पाण्याचा ग्लास आणून दिला. तिला सांगून तरी काय फायदा कि आता ह्या गोळ्यांचा काहीच उपयोग होणार नाही आहे. त्यांनी जे काम करायचे ते त्यांचे करून झाले आहे. आता ह्यांचा काही उपयोग नाही पण जाऊदेत तिला तरी कशाला दुखवायचे. म्हणून त्याने गपचूप गोळ्या खावून घेतल्या.आईने त्याच्या बारीक कापलेल्या केसावरून प्रेमाने हात फिरवला. गोळ्या खाल्ल्यावर ती निघून गेली.
आज त्याला नेहेमीपेक्षा खूप थकल्यासारखे वाटत होते. मोठ्या बहिणीकडून त्याने आपले सर्व जुन्या फोटोचे अल्बम काढून घेतले होते. शाळेतील सर्टिफिकेट काढून ठेवली होती. लहानपणापासून आतापर्यंत खेळात मिळालेली सर्व मेडल्स आणि ट्रॉफीज काढून बिछान्याच्या बाजूला लावून ठेवल्या होत्या. आपली आवडती क्रिकेटची बॅट, पायाला बांधायचे पॅड्स, हेल्मेट सर्व त्याने जवळ आणून ठेवले होते. मोठ्या बहिणीने आतापर्यंत कधी हातात असलेली वस्तूही दिली नव्हती, कधी भांडली नाही असा एक दिवस गेला नव्हता. पण आता एकदम शहाण्यासारखी वागत होती. गेले महिनाभर तरी ती भांडली नव्हती. तो जे जे मागत होता ते ते हातात आणून देत होती.
घरातले सर्व झोपी गेले तसे ह्याने आपल्या रूम मधली लाईट लावली आणि सर्व जुने फोटो चाळायला सुरुवात केली. लहानपणापासूनचे आईवडिलांबरोबर काढलेले फोटो, वाढदिवसाचे फोटो, कॉलेज मधील फोटो, क्रिकेटच्या मैदानावर जिंकल्यावर टीमसोबत काढलेला फोटो, पहिली सेन्चुरी मारल्यावर बॅट उंचावताना काढलेला फोटो, त्यावेळेला झालेला आनंद, टीमच्या प्रशिक्षकांनी हात उंचावून वाजवलेल्या टाळ्या, मोक्याच्या क्षणी मारलेल्या शतकामुळे आनंदित झालेले सर्व टीम चे खेळाडूं सर्व सर्व डोळ्यासमोर तरळून गेले. क्रिकेट त्याचा जीव कि प्राण होता. तेंडूलकर, गावस्कर हे त्याचे देव होते. सचिन तेंडूलकर बरोबर काढलेला फोटो तर त्याच्या आयुष्यातली अमूल्य वस्तू होती. तोच फोटो मोठा करून त्याने आपल्या रुमच्या दरवाज्यावर ही लावला होता. कॉलेज, अभ्यास सांभाळून त्याने क्रिकेटचे वेड जीवापाड जपले होते. पुढच्या महिन्यात सुरु होणाऱ्या रणजी सामन्यासाठी त्याचे नाव प्रशिक्षकांनी निवड समितीला सुचवले होते. निवड समितीने पण त्याचा खेळ पाहून त्याला रणजी सामन्यात मुंबई कडून खेळवण्याचे आश्वासन दिले होते. तसे पेपर वर्क ही पार पडले होते. पण बहुतेक नशिबाला त्याचा हा आनंद बघायचा नव्हता म्हणूनच त्याच्या आयुष्याला असे वळण मिळाले होते.
फोटो बघताना त्याला तो दिवस आठवला आणि तो भूतकाळातील कटू आठवणीत गेला. त्यादिवशी दादरच्या शिवाजी पार्क मध्ये नेट सराव करून मित्राबरोबर तो घरी निघाला होता. रेल्वेगाडी तून स्टेशनला उतरल्यावर फ्लॅटफॉर्म वरून चालताना अचानक डोके दुखून त्याला चक्कर आली आणि काही कळायच्या आताच तो खाली पडला. डोक्याला थोडी दुखापतही झाली. जखमेतून रक्त वाहायला लागले. नशीब सोबत मित्र होता म्हणून, त्याने इतरांच्या मदतीने त्याला जवळच्या दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टर ने जखमेवर मलमपट्टी केली आणि चक्कर येण्याचे कारण विचारले. त्याने सांगितले काही माहित नाही पण आजकाल अचानक डोके दुखून येते आणि कधी कधी चक्कर पण येते. डॉक्टरने त्याला सिटी स्कॅन पण करायला सांगितले. दुसऱ्या दिवशी सिटी स्कॅन चा रिपोर्ट डॉक्टर कडे घेऊन गेल्यावर डॉक्टरने हसत सागितले, काही नाही.... सर्व काही नॉर्मल आहे. पण तुझ्या वडिलांना पाठवून दे त्यांच्याशी काही बोलायचे आहे.
त्याने वडिलांना निरोप सांगितला. त्याचे वडील आपल्या कामात काही जास्तच बिझी असायचे. दिवसभर काम करून थकवा यायचा, वैताग व्हायचा, चीडचीड व्हायची म्हणून दररोज रात्री थोडीशी दारू पिऊनच यायचे. दारू पिल्यावर सर्व टेन्शन, त्रास विसरायला होतो असे त्यांचे म्हणणे असायचे. थोडीशी दारूची सवय कधी जास्त झाली ते त्यांना सुद्धा कळले नाही. डॉक्टर चा निरोप भेटल्यावर सुद्धा ते एका आठवड्यानंतर गेले ते सुद्धा संध्याकाळी...दारूच्या नशेतच.
डॉक्टर ने सांगितले कि तुमच्या मुलाला 'ब्रेन ट्युमर' झाला आहे आणि तो क्रिटीकल स्टेज ला पोहोचला आहे. आताच जर त्याचे ऑपरेशन केले तर तो कदाचित वाचू शकतो नाहीतर जास्तीत जास्त तो २/३ महिनेच जगेल. वडिलांनी नशेत काय ऐकले ते माहित नाही. ते तसेच परत दारूच्या बार मध्ये जाऊन बसले आणि भरपूर दारू ढोसून घरी येऊन झोपले.
दुसऱ्या दिवशी उठून ते कामालाही निघून गेले. डॉक्टर ने काय सांगितले ते त्यांच्या लक्षात ही राहिले नाही. त्यांनी घरी पण सांगितले नाही आणि आपल्या मुलाला पण सांगितले नाही. असे काही आठवडे निघून गेले. त्याची डोकेदुखी प्रचंड वाढत होती. अशक्तपणा येत होता. त्याला काही करायला सुचत नव्हते. असेच स्टेशन वरून येताना प्रचंड डोके दुखून चक्कर यायला लागली म्हणून तो परत डॉक्टर कडे गेला. डॉक्टर ने त्याच्यावर काहीच उपाय झाले नाहीत म्हणून आश्चर्यचकित होऊन विचारले कि तुला तुझ्या वडिलांनी काही सांगितले नाही का? त्याने विचारले काय सांगायचे होते? मला सांगा. तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवू नका. डॉक्टर ने सांगितले कि तुला ब्रेन ट्युमर झाला आहे आणि तो क्रिटीकल स्टेजला ही पोचला आहे. तुझ्यावर या आधीच उपचार झाले पाहिजे होते. खूप उशीर केला आहेस.
ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. मोठा धीर करून त्याने विचारले कि डॉक्टर हा आजार ठीक होणार नाही का ? डॉक्टर म्हणाले कि काही गॅरेंटी देऊ शकत नाही. ऑपरेशन क्रिटीकल असते आणि सक्सेस होईल कि नाही ह्याची शक्यता कमीच असते. तो काय समजायचे ते समजून गेला. त्याने उदास होऊन विचारले कि, 'डॉक्टर आता माझ्यापाशी किती दिवस शिल्लक आहेत?' डॉक्टरला काय बोलावे ते सुचलेच नाही. त्यांनी तसेच त्याला ऍड्मिट करून घेतले. घरच्यांना निरोप पाठवून बोलावून घेतले. परत सिटी स्कॅन करून घेतले. ट्युमर अर्ध्याहून जास्त वाढला होता. चांगले एक्स्पर्ट डॉक्टर बोलावून त्याला तपासून घेतले. सर्वानीच सांगितले की खूप उशीर झाला आहे. ऑपरेशन करणे रिस्की आहे आणि ते सक्सेस होण्याचे चान्सेस खुपच कमी कदाचित फक्त १० टक्केच असतील. ऑपरेशन ला खर्च ही बराच आला असता तेव्हढी आई वडिलांची ऐपत नाही हे ही त्याला ठावूक होते. त्याने मोठ्या हिमतीने ऑपरेशनला विरोध केला. आईची, बहिणीची रडून रडून हालत झाली होती आणि तो त्यांना धीर देत होता. त्याच्याकडे आता खुपच कमी दिवस शिल्लक होते.
डॉक्टरांची परवानगी घेऊन त्याने आपले शेवटचे दिवस घरात घालवण्याची इच्छा व्यक्त केली. डॉक्टरांनी काही पेन किलर देऊन त्याला घरी जायची परवानगी दिली. त्याला फक्त एक दिवसाआड चेकअप साठी यायला सांगितले. डॉक्टरांनी त्याला अंदाजे किती दिवस शिल्लक आहेत ते ही सांगितले. ते त्याने आपल्यापर्यंतच ठेवले घरात कोणाला सांगितले नाही. शेवटच्या दिवसात त्याने एकेक करत सर्व मित्रांची भेट घेतली सर्वाना आपल्याकडून काहीना काही छोट्या मोठ्या भेटी दिल्या. शेवटचे सर्व दिवस अशक्तपणामुळे घरातच बसून काढावे लागले.
आईच्या चेहऱ्याकडे बघून त्याची खूप तडफड व्हायची. ती पण त्याच्यासमोर एकही अश्रू येऊ द्यायची नाही. पण एकांतात बसून खूप रडायची. तिचे सुजलेले डोळे आणि गालच ती खूप रडली आहे ते सांगायची. बहिणीची पण हालत काही वेगळी नव्हती. वडिलांना तर खूप मोठा धक्काच बसला होता.आपल्या दारूच्या वेडापायी आणि छोट्याश्या चुकीमुळे आपण किती मोठ्या गोष्टीला मुकणार आहे ते त्यांना समजून गेले होते. त्या दिवशीपासून दारू त्यांना कडू लागायला लागली होती आणि ते मनापासून दारूचा तिरस्कार करू लागले होते. आपल्या मुलाचे ऑपरेशन ही आपण करू शकत नाही ही गोष्ट त्यांना जास्त खटकत होती. आयुष्यभर कमावून काहीच हाती लागले नव्हते. आपल्या मुलाचा अंत आपल्या डोळ्यांनीच आपल्याला बघावा लागणार होता. त्यांना जिवंतपणी मेल्यासारखे झाले होते.
त्याला सर्वांचे दु:ख माहित होते पण तो काही करू शकणार नव्हता. मी लवकरच ठीक होईन असा खोटा दिलासा पण देऊ शकणार नव्हता. डोळ्यातून पडणाऱ्या अश्रुने तो भानावर आला. आपल्या बिछान्यावर एक नजर फिरवली. आयुष्यात आतापर्यंत कमावलेले सर्व त्याने आपल्या बिछान्यावर मांडून ठेवले होते. आजच सकाळी चेकअप ला गेल्यावर डॉक्टर ने त्याला सांगितले होते कि तुझ्याकडे शेवटचे २ ते ३ दिवसच शिल्लक आहेत. तुझा मेंदू कधीही काम करण्याचे थांबू शकतो. मनातून खूप हताश झाला होता. आयुष्यात घडलेले सर्व चांगले क्षण आठवण्याचे प्रयत्न केले. शाळेचे दिवस, सुट्टीतील मजा,कॉलेजातील सोनेरी क्षण, जीव तोडून खेळलेले क्रिकेट, वेड्यासारखे बाळगलेले क्रिकेटचे वेड, सचिन तेंडूलकर ला भेटलेले क्षण. सर्व काही त्याच्या डोळ्यासमोर तरळून जात होते. आपली क्रिकेटची बॅट त्याने जवळ घेतली. सचिन बरोबर काढलेला फोटो त्याने हृदयाशी धरला आणि शांत डोळ्याने बेड वर पडून राहिला.
...
सकाळी आईने नेहमी प्रमाणे खिडकी उघडून पडदे बाजूला सरकवले. त्याला उठवण्यासाठी आवाज दिला.... तुझ्या आवडीचा नाश्ता केला आहे. लवकर तोंड धुवून घे !!!..... तो पर्यंत तिने त्याची खोली आवरली. परत आवाज देवून सुद्धा तो उठला नाही म्हणून तिने त्याच्या अंगावरची चादर ओढली. तो शांतपणे क्रिकेटची बॅट आणि सचिन बरोबरचा फोटो घेऊन झोपला होता. चेहऱ्यावर मंद स्मित होते. खावून पिवून तृप्त झालेले बाळ कसे शांतपणे झोपते तसेच काहीसे निरागस भाव त्याच्या चेहऱ्यावर होते. लहानपणी सुद्धा तो असाच खेळणी पोटाशी घेऊन झोपायचा. तिला एकदम भरून आले. त्याच्या केसावरून हात फिरवण्याची तिला लहर झाली. ती त्याच्या बाजूला बेड वर बसली. हात फिरवल्यावर तो उठेल आणि त्याचा असा निरागस चेहरा पाहता येणार नाही म्हणून तृप्त नजरेने त्याला बघून घेतले आणि पुढे वाकून त्याच्या केसावरून हात फिरवत तिने त्याला हाक मारली...पण ....त्याला स्पर्श होताच ती दचकली. त्याचे सर्व अंग थंडगार पडले होते. तिने त्याला हलवून उठवायचा प्रयत्न केला पण त्याच्याकडून काहीच प्रतिसाद आला नाही.तिने जोरात किंकाळी फोडून घरातल्या सर्वाना बोलावून घेतले. त्याला कदाचित गाढ झोप लागली असेल म्हणून तिने त्याचे खांदे धरून गदगदा हलवले पण तो थंडच होता....त्याच्याकडून काहीच प्रतिसाद नव्हता....येणार ही नव्हता....चेहऱ्यावरचे निरागस भाव कधीच विस्कटणार नव्हते.....तृप्त मनाने त्याने सर्वांच्या नकळत ह्या जगाचा निरोप घेतला होता....चेहऱ्यावरचे मंद स्मित कधीच पुसले जाणार नव्हते. क्रिकेट त्याचा जीव कि प्राण होता....सचिन त्याचा देव होता. त्या दोघांच्या सोबतच त्याने आपला छोटासा जीवन प्रवास संपवला होता.
आयुष्यात कमावलेले सर्व काही त्याने आपल्या बेड वर मांडून ठेवले होते. आयुष्यात काहीच करता आले नाही ह्याची त्याला खंत राहिली होती पण सचिनच्या फोटोने कदाचित थोडी कां होईना त्याची भरपाई केली होती. जन्माला आलेले सर्वच मरणार पण आपण कधी मरणार हे दिवस, तारखेसकट माहित असून जगणे किती कठीण असते ते त्याने नक्कीच अनुभवले होते. मरणाला सामोरे जायची कदाचित त्याची इच्छा नसेल किंवा ताकत ही नसेल म्हणूनच त्याने झोपेतच आपला मृत्यू यावा अशी नशिबाला विनंती केली असणार. नियतीने सुद्धा त्याला ह्या वेळेला दगा दिला नाही त्याची शेवटची इच्छा समजून त्याला त्रास न देता अलगद एक दिवस आधीच त्याला झोपेतच उचलून नेले.....कोणालाही नकळत.
CONVERSATION
Girl in saree
CONVERSATION
Shy girl
CONVERSATION
Getting married
CONVERSATION
टिटवाळ्याचा सिद्धिविनायक महागणपती
ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात टिटवाळा नावाचे एक छोटे शहर वजा एक खेडे आहे. एक प्राचीन आणि पुरातन असे सिद्धिविनायक महागणपतीचे मंदिर आहे. ह्या गणपतीला विवाह गणपती असेही म्हणतात. १२ ते १३ एकर वर पसरलेले हे मंदिर कालू नदीच्या तीरावरच वसलेले आहे. ह्या मंदिराचा उल्लेख हजारो वर्षापूर्वीच्या ग्रंथात आणि साहित्यातही सापडतो. मधल्या काळात ह्या स्थळाचे वर्णन कुठेच आढळत नाही थेट माधवराव पेशवांच्या काळात ह्या मंदिराचा उल्लेख येतो.
टिटवाळयाचा सिद्धिविनायक महागणपती |
प्राचीन साहित्यांच्या आधारे हे शहर त्यावेळेला दंडकारण्यात येत होते. (दंडकारण्याचा परिसर काही साहित्याप्रमाणे आत्ताचा पूर्ण (?) महाराष्ट्र (कदाचित कोंकण सोडून) आणि मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, आत्ताचे छत्तीसगड, बिहार ह्या राज्याचा काही भाग. आता बहुतांशी भाग हा नक्षलवादींच्या हाताखाली आहे.) कण्व ऋषी ह्या परिसरात आश्रम बांधून राहत होते. कण्व ऋषीं ऋग्वेद आणि अंगिरस ह्या वेदांचे लेखक मानले जातात. ह्या ऋषींनी शकुंतला नामक मुलीला तिच्या आई वडिलांनी त्याग केल्यावर दत्तक घेतली होती. शकुंतला हि ज्येष्ट ऋषी विश्वामित्र आणि अप्सरा मेनका ह्यांच्या संबधातून जन्माला आलेली होती. तिच्या जन्मानंतर तिच्या आई वडिलांनी तिच्या त्याग केल्यावर कण्व ऋषींनी तिला दत्तक घेऊन तिचा सांभाळ केला.
एकदा गांधार देशाचा राजा दुष्यंत लढाईच्या मार्गावर असताना ह्या परिसराच्या बाजूने जात होता. त्यावेळेला त्याने सुंदर शकुंतलेला पहिले आणि तो तिच्या प्रेमात पडला. तीच गोष्ट शकुंतलेच्या बाबतीत ही घडली. पुढे त्या दोघानी गंधर्व पद्धतीने विवाह केला. काही काळ एकत्र व्यतीत केल्यावर राजा दुष्यंताला आपल्या राज्यात परतावे लागले. जाताना त्याने आठवण म्हणून आपली राजेशाही खानदानी अंगठी तिला दिली आणि त्याने परत येऊन तिला घेऊन जाण्याचे वचन देऊन तो निघून गेला. काही काळाने एकदा आश्रमात दुर्वास ऋषी आले. दुर्वास ऋषी अत्यंत तापट स्वभावाचे म्हणून प्रसिद्ध होते. शकुंतला दुष्यंताच्या विचारात मग्न असल्यामुळे तिने त्यांचे यथायोग्य स्वागत केले नाही म्हणून त्यांनी रागाने तिला शाप दिला कि तू ज्या आवडत्या व्यक्तीच्या विचारात राहून माझे स्वागत केले नाहीस तोच व्यक्ती तुला तुझ्या आठवणींसकट विसरून जाईल. शकुंतलेने माफी मागितल्यावर त्यांनी दया येऊन तिला उ:शाप हि दिला कि त्याने दिलेले प्रेमाचे प्रतिक त्याला दाखवल्यावर त्याला सर्व आठवेल.
दुष्यंत शकुंतला राजा रवी वर्म्याच्या नजरेतून |
दुर्वास ऋषींनी दिलेल्या शापानुसार सर्व घडत गेले. राजा दुष्यंताने शकुंतलेला ओळखले नाही व तिचा स्वीकार हि केला नाही. कण्व ऋषींनी शकुंतलेची दशा पाहून तिला विघ्नहर्त्या सिद्धिविनायक गणेशाची स्थापना करून पूजा करायला सांगितली. सिद्धिविनायकची भक्ती केल्यानंतर तिच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील आणि राजा दुष्यंत तिचा स्वीकार करेल. कण्व ऋषींनी सांगितल्याप्रमाणे तिने सिद्धिविनायकाचे मंदिर बांधले आणि गणेशाची भक्ती केली. नंतर काळानुसार दुष्यंताने तिचा स्वीकार केला. दुष्यान्तापासून तिला मुलगा हि झाला. त्याचे नाव भारत ठेवले गेले. महाभारतातील कौरव पांडव हे ह्या भारत राजाचेच वंशज होते.
पुढे काळाच्या ओघात ते मंदिर पाण्याखाली गेले असावे. कारण मधल्या कुठल्याच काळात त्याचे अस्तित्व सापडत नाही. पेशवांच्या काळात एकदा दुष्काळ पडला असताना त्या दुष्काळावर मात करण्यासाठी पेशव्याचे सरदार रामचंद्र मेहेंदळे ह्यांनी तलावाचे उत्खनन करायला चालू केले असता त्यांना मंदिराचे अवशेष सापडले. पुढे स्वप्नातील दृष्टांतानुसार त्यांना पुढे गणेशाची मूर्ती सापडली. पेशव्यांनी लगेचच मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले. पुढे वसईची स्वारी जिंकून आल्यानंतर त्यांनी गणेशाच्या मूर्तीची प्रतिस्थापना केली.१९६५-६६ सालापर्यंत पेशव्यांनी बांधलेल्या मंदिराची पडझड झाली होती. लाकडाचे बांधकाम असलेल्या सभामंड हि छोटा पडू लागला होता. म्हणून १९६५-६६ साली मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला
पेशव्यांनी ३ एकर जागा देऊन हे मंदिर बांधले होते. नंतर मंदिराचे पारंपारिक पुजारी जोशी ह्यांनी आपल्याकडची १३ एकर जागा देऊन ह्या मंदिराचा विस्तार केला. नुकतेच महापालिकेने तलावाचे बांधकाम करून सारा परिसर सुशोभित केला.
ह्या गणेशाला विवाह गणपती सुद्धा म्हणतात.विवाह न होणाऱ्यांसाठी आणि विवाह इच्छुक जोडप्यांनी ह्या गणेशाची आराधना केल्यावर त्यांच्या मनासारखा विवाह घडून येतो. तसेच घटस्फोटीत जोडपे हि आपले वाद मिटवण्यासाठी ह्या गणपतीचे दर्शन घेतात. गणपतीची मूर्ती हि हि ३.५ ते ४ फुट उंचीचा ओटा बांधून त्यावर विराजमान झालेली आहे. त्यामुळे सभा मंडपात बसून हि देवाचे चांगले दर्शन होते. सभामंडपाच्या वर असलेल्या गॅलेरी मधून सभामंडपाचे आणि गणेशाच्या मूर्तीचे दर्शन होते.
सुरक्षेच्या कारणास्तव आता ह्या मूर्तीचे फोटो काढता येत नाही. वर लावलेला मूर्तीचा फोटो हा नेट वरून घेतलेला आहे. ह्या मंदिरात जायला मध्य रेल्वेवरच्या टिटवाळा स्टेशन वर उतरावे लागते. तेथून टांग्याने किंवा ऑटो करून ५ मिनिटात मंदिरात जाता येते. सकाळी लवकर गेल्यास ऑटो न करता आजूबाजूचा निसर्ग पाहत रमत गमत चालत जायचे. चालत २५ ते ३० मिनिटात मंदिरात पोहोचता येते. मंदिरात दर्शन करून अर्धा तास बसायचे आणि मग आरामात परतीला लागायचे.
CONVERSATION
आता काय करायचे ??
हॅल्लो !!
हॅल्लो कोण ?
हा मी दादा बोलतोय.
हा दादा बोला.
अरे तो 'पॅंथर' 'वाघाच्या' गुहेत गेला ऐकलेय ?
हो ना ! दादा, त्यांची बोलणी चाललीय असे ऐकलेय. पुढच्या निवडणुकीत ते एकत्र शिकार करणार आहेत असे वाटतेय.आपली चांगलीच गेम होणार आहे. इथे 'अपना हात' आपल्याच मागे हात धुवून लागला आहे. आपण ना घर के ना घाट के अशी हालत झाली आहे.
अरे पण काय उपाय काढला आहे का त्यावर ?
नाही दादा काय सुचतच नाही.
अरे काय झालं काय तुम्हाला? तुमचे 'घड्याळ्याचे' सेल डाऊन झालेत काय ? काका साहेबाना समजले तर काय म्हणतील एक राज्य सांभाळता येत नाही हे अख्खे जंगल कसे सांभाळणार?एक काम कर आपल्या प्राणी सहकारी बँकेतून पैसे काढ आणि इतर प्राण्यांना वाटून त्यांना निवडणुकीआधीच कर्जे बिर्जे काय पाहिजे असेल ते देऊन टाक
पण दादा ???
अरे आता काय ? बाकीच्या संचालक मंडळाची काळजी करू नको. ते आपल्या हाताखालीच आहेत. त्यांना मी बघेन.
पण दादा ?? ऐका तरी ...
अरे काय ऐका ? तू सांगितले ते कर आधी बघू. सगळी घड्याळे पटापट चालली पाहिजेत.
अहो पण दादा. बँक आता आपल्या ताब्यात नाही आहे. मोठ्या बँकेने ती कधीच ताब्यात घेतली.
अरे काय बोलतोस काय ? पण मला काही नोटीस पण नाही आली.
अहो साहेब पण आता नव्या नियमानुसार मोठ्या बँकेला आपल्याला नोटीस द्यायची गरजच नाही. ती आपली बँक डायरेक्ट बरखास्त करू शकते. तुम्हाला नवीन नियम माहित नाही का?
ठीक आहे ठीक आहे ! मला माहित होते. मी तुझी परीक्षा घेत होतो
अं !! (?)
अरे पण काकांना पण माहित नव्हते का ? त्यांनी तर आपल्या जंगलाच्या अर्थ खात्याकडे सेटिंग लावली होती ना ?
हो दादा.पण ते तरी किती दिवस गप्प ठेवू शकणार.? कधी ना कधी बाहेर पडणारच ते.
ठीक आहे ठीक आहे ...ते जाउदेत ह्या पॅंथर चे काय करायचे ? नेमकी निवडणूक आली आणि तो बांद्र्याच्या गुहेत गेला.आपली एकगठ्ठा शिकार जाणार.
हो दादा !........पण आपण एक काम केले तर ?
काय रे ?
साहेब ह्या वाघाच्या बछ्द्यावर हल्ला चढवला तर?
आयडिया तर चांगली आहे. वाघ एकदा बिथरला की काही तरी बडबड करेल आणि मिडीयाला पण चांगला विषय मिळेल आणि आपल्यावरचे आरोपांकडे दुर्लक्ष होईल. अशी तशी पब्लिक म्हणजे शोर्ट टर्म मेमरी लॉसच आहेत.
साहेब उद्या आपली सभा आहे तुम्ही वाघाला चीथवा..मग बघू काय करायचे.
============================================================
हॅल्लो !! ! साहेब तुम्ही तर वाघाच्या गुहेत जाऊन वाघावरच हल्ला केला.
हॅल्लो कोण ?
हा मी दादा बोलतोय.
हा दादा बोला.
अरे तो 'पॅंथर' 'वाघाच्या' गुहेत गेला ऐकलेय ?
हो ना ! दादा, त्यांची बोलणी चाललीय असे ऐकलेय. पुढच्या निवडणुकीत ते एकत्र शिकार करणार आहेत असे वाटतेय.आपली चांगलीच गेम होणार आहे. इथे 'अपना हात' आपल्याच मागे हात धुवून लागला आहे. आपण ना घर के ना घाट के अशी हालत झाली आहे.
अरे पण काय उपाय काढला आहे का त्यावर ?
नाही दादा काय सुचतच नाही.
अरे काय झालं काय तुम्हाला? तुमचे 'घड्याळ्याचे' सेल डाऊन झालेत काय ? काका साहेबाना समजले तर काय म्हणतील एक राज्य सांभाळता येत नाही हे अख्खे जंगल कसे सांभाळणार?एक काम कर आपल्या प्राणी सहकारी बँकेतून पैसे काढ आणि इतर प्राण्यांना वाटून त्यांना निवडणुकीआधीच कर्जे बिर्जे काय पाहिजे असेल ते देऊन टाक
पण दादा ???
अरे आता काय ? बाकीच्या संचालक मंडळाची काळजी करू नको. ते आपल्या हाताखालीच आहेत. त्यांना मी बघेन.
पण दादा ?? ऐका तरी ...
अरे काय ऐका ? तू सांगितले ते कर आधी बघू. सगळी घड्याळे पटापट चालली पाहिजेत.
अहो पण दादा. बँक आता आपल्या ताब्यात नाही आहे. मोठ्या बँकेने ती कधीच ताब्यात घेतली.
अरे काय बोलतोस काय ? पण मला काही नोटीस पण नाही आली.
अहो साहेब पण आता नव्या नियमानुसार मोठ्या बँकेला आपल्याला नोटीस द्यायची गरजच नाही. ती आपली बँक डायरेक्ट बरखास्त करू शकते. तुम्हाला नवीन नियम माहित नाही का?
ठीक आहे ठीक आहे ! मला माहित होते. मी तुझी परीक्षा घेत होतो
अं !! (?)
अरे पण काकांना पण माहित नव्हते का ? त्यांनी तर आपल्या जंगलाच्या अर्थ खात्याकडे सेटिंग लावली होती ना ?
हो दादा.पण ते तरी किती दिवस गप्प ठेवू शकणार.? कधी ना कधी बाहेर पडणारच ते.
ठीक आहे ठीक आहे ...ते जाउदेत ह्या पॅंथर चे काय करायचे ? नेमकी निवडणूक आली आणि तो बांद्र्याच्या गुहेत गेला.आपली एकगठ्ठा शिकार जाणार.
हो दादा !........पण आपण एक काम केले तर ?
काय रे ?
साहेब ह्या वाघाच्या बछ्द्यावर हल्ला चढवला तर?
आयडिया तर चांगली आहे. वाघ एकदा बिथरला की काही तरी बडबड करेल आणि मिडीयाला पण चांगला विषय मिळेल आणि आपल्यावरचे आरोपांकडे दुर्लक्ष होईल. अशी तशी पब्लिक म्हणजे शोर्ट टर्म मेमरी लॉसच आहेत.
साहेब उद्या आपली सभा आहे तुम्ही वाघाला चीथवा..मग बघू काय करायचे.
============================================================
हॅल्लो !! ! साहेब तुम्ही तर वाघाच्या गुहेत जाऊन वाघावरच हल्ला केला.
अरे मग उगीचच लोक मला दादा म्हणत नाही.
पण साहेब आता राडा होणार.
अरे आपली माणसे काय उगाचच पोसतोय. करू दे साल्यांना. फोडू देत एकमेकांची टाळकी. मिडिया वाल्यांना पण काहीतरी खुराक मिळेल आणि आपल्याला दुसरी लफडी निस्तरता येतील.
अरे आपली माणसे काय उगाचच पोसतोय. करू दे साल्यांना. फोडू देत एकमेकांची टाळकी. मिडिया वाल्यांना पण काहीतरी खुराक मिळेल आणि आपल्याला दुसरी लफडी निस्तरता येतील.
ते ठीक आहे साहेब पण वाघ ह्या जंगलातला सर्वात जुना आणि वयाने मोठा आहे. त्याच्यावर हल्ला करायला नाय पाहिजे होता. त्याच्या एका डरकाळीवर अख्खे जंगल जागे होते..
अरे घाबरतोस काय त्याला? ह्या जंगलात फक्त दोनच गोष्टी चालतात एक बाळासाहेब आणि दुसरे बाबासाहेब. दोघांपैकी एकाची जरी कळ काढलीस कि बस फक्त बघत बसायचे.
तसे नाही साहेब पण.....
अरे सोड पण बिन....तू अजून हल्ला करायच्या तयारीला लाग. एक काम कर पॅंथर त्या वाघाकडे गेला आहे ना ! त्या दोघांमध्ये फुट पाड. मग बघ कसा पॅंथर परत घड्याळाकडे येतो.
हो दादा पण ते कसे करणार. ह्यावेळेला पॅंथर पण भडकला आहे आपल्या काका साहेबांवर. म्हणूनच तो तिकडे वाघाच्या गुहेत गेला आहे ना.
एक काम कर पॅंथर च्या दुखत्या रगेवर असा बाण मार कि वाघ आणि पॅंथर दोघेही भडकून उठले पाहिजेत.
पण दादा कसे ?
उद्याच घोषणा करून टाक. आम्ही दादर चे नाव बदलून चैत्यभूमी करणार आहोत आणि पुढच्या अधिवेशनामध्ये सर्व प्राण्याच्या बैठकीत आम्ही हा प्रस्ताव मांडणार आहे.
अहो दादा, पण दादर हे जुने नाव आहे खूप वर्षापासून चालत आले आहे.
अरे असुदेत तुला काय फरक पडतोय रे. आपल्याला फक्त मताचे राजकारण तर करायचे. कोणाच्या भावनांशी आपल्याला काय मतलब. आपण दादर चे चैत्यभूमी केले तर वाघाला आवडणार नाही पण तो ओरडू शकणार नाही कारण आतच पँथर बरोबर त्याची मैत्री झाली आहे आणि पठार च्या गटातले लोकही आपल्यावर खुश होतील. जास्तीत जास्त काय होइल इंजिन येईल बोम्बलत. आपल्याला काय फरक नाही पडत. जसे पुण्याच्या लाल महालतून आपण दादोजींचा पुतळा हलवला तसेच एका रात्रीत नाव बदलून टाकायचे.
ठीक आहे दादा ..आता तुम्ही म्हणताहेत तर करतो तसे .
===========================================================
अहो ! दादा. राडे चालू झाले आहेत.
अरे होऊ देत अजून वातावरण गरम होऊदेत मग बघ अजून कसे तेल ओततोय. आपल्या सर्व पोलीस ठाण्यावर फोन करुन् सांगून ठेव. राडे आपल्या माणसांनी केले कि काही कारवाई करायची नाही आणि जरा वाघाच्या माणसांनी केली तर लगेच एकेकाला आत टाकुन फोडुन काढायचा. अगदी रक्ताची लघवी होइपर्यंत मारायचे.
हो साहेब ! आताचा फोन करतो.
======================================================
दादा काय झाले काय समजले नाही. वाघाने एक दोन डरकाळी फोडल्या , पण त्याने न फोडता त्याच्या प्रवक्त्यांनीच जास्त फोडल्या...वाघाचा बछडा पण मुंबईत नाही आहे. वातावरण एकदम शांत झाले आहे .
हा रे !! मला पण काही समजत नाही. इंजिनाने ने पण एक दोनदा शिट्टी वाजवली आणि तो पण गप्प बसला. वाघाला चिथवुन सुद्धा तो गप्प कसा आहे.
दादा मला आतली खबर मिळाली आहे कि काका साहेबांनी बहुतेक वाघाला फोन केला आहे, काका साहेबांनी सांगितले कि मी पुतण्याला आवरतो तुम्ही घड्याळाकडे लक्ष देऊ नका. तुम्ही हाताच्या मागे हात धुवून लागा. मी दादर चा मॅटर सुद्धा थोडा वेळ साइडला करायला सांगतो. तुम्ही फक्त हाताच्या मागे लागा. आणि आपल्या सर्व मंत्र्यानी सुद्धा त्याला पाठिंबा दिला आहे.
च्यायला हे काका आपलाच बुच लावायला बसले आहेत का ? चांगला मोका होता एका दगडात दोन तिन पक्षी मारण्याचा..... साला चांगला चान्स गेला आता.
आता काय करायचे दादा !!!
आता काय एखादी सभा घेऊन शक्ती प्रदर्शन करुया आणि काय घड्याळ्याचे सेल बदलत राहायचे.
CONVERSATION
तो येतोय......तो आलाच
आज काय वाटले काय माहित? ऑफिस मध्ये बॉस नव्हता लवकर निघावेसे वाटले. कोणालाच न विचारता पाच वाजता निघालो....मित्राच्या बाईक वरून आलो आणि ट्राफिक लागायच्या आधी निघालो त्यामुळे अर्ध्या तासात ठाण्यात पोहोचलो. पार्किंग मधून माझी बाईक काढली आणि घरी यायला निघालो. येताना समोरच्या डोंगरावर तो मला दिसला.... हळू हळू मंद पावलानी पुढे सरकत होता....तशी त्याने यायची वर्दी आधीच दिली होती.....काल परवा त्याने केरळमध्ये हजेरी लावली होती...काल सोलापूर, तळ कोकणात त्याने आपली चुणूक दाखवली होतीच.....अंदाज होता कि त्याला मुंबईत येईपर्यंत सोमवार उजाडेल पण डोंगराच्या टोकावर मला तो दिसला आणि मनात आनंदाचे तरंग उठले....तो आज येईल काय??? एक मन सांगत होते...अरे तो आलाय पण तर दुसरे सांगत होते अरे अजून वेळ आहे...पण पहिले मन जिंकत होते.....
गाडी पार्क केली वर बघितले....नारळाच्या झाडाची झावले आपल्याच मस्तीत डोलत होती...रस्त्यावर कडकडीत उन पडले होते.....म्हटले तो येतोय कि नाही?...तेवढ्यात नारळाच्या झावळ्या जोरात सळसळल्या.
घरी आलो भयंकर उकडत होते. खिडकीतून गरम वाफा येत होत्या....अंघोळ करून गादीवर पडलो...कधी डोळा लागला समजलंच नाही...अचानक थंड वाऱ्याची झुळूक लागली आणि जाग आली....खिडकीतून बाहेर बघितले तर माडाच्या झावळ्या जोरजोरात सळसळत होत्या ....उन् थोडे शांत झाल्या सारखे वाटत होते.... आज काहीतरी वेगळे दिसतेय....बहुतेक तो येणारच आहे....नारळाच्या झावळ्या एका विशिष्ट पद्धतीने डोलत होत्या....कोणी नोटीस केले आहे कि माहित नाही पण कदाचित नारळाच्या झाडांना त्याच्या येण्याची खबर बहुतेक आधीच मिळते...ते आपल्याच धुंदीत डोलत असतात नेहमी पेक्षा वेगळेच चैतन्य त्यांच्या फांद्या फांद्यात वळवळत असते ... बिछान्यावर पडल्या पडल्याच बायकोला म्हणालो अग बहुतेक तो आज येणारच.....
अरे कोण येणार ?
अग तो बघ.....तो येतोय ...पक्षी कसे किलबिलाट करताहेत.....झावळ्या बघ कश्या डोलताहेत ...आकाशात बघ एक वेगळाच पिवळसर रंग आला आहे...आज नेहमीपेक्षा लवकर अंधार पडणार आहे...
ती समजली....म्हणाली जा उठ खिडकीच्या कट्ट्यावर बस...त्याची वाट बघ.....मी मस्त पैकी चहा टाकते...झोपायचे होते...पण अंगात एक वेगळेच चैतन्य आले आणि उठलो...खिडकीच्या कट्ट्यावर लोळायला लागलो...आज किती सुंदर वातावरण आहे....खूप दिवस ब्लॉग पण नाही लिहिला आहे आज सुरुवात करुया...लॅपटॉप चालू केला...लिहायला सुरुवात करणार....तेवढ्यात.....
तेवढ्यात...तो आलाच....खिडकीच्या वर असलेले पत्रे ताड ताड वाजू लागले....खाली खेळणारी मुळे ओरडत ओरडत घरी पळू लागली....कट्ट्यावर बसलेल्या बायका धावत धावत घरात पाळल्या...बघता बघता त्याने जोर धरला आणि वातावरणात झटपट बदल होत गेले.....गरम वाफांचे थंडगार झुळूकीत रुपांतर झाले...लॅपटॉप बंद केला आणि परत खिडकीच्या कट्ट्यावर जाऊन कॅमेरा घेऊन बसलो.... म्हटला आज त्याला कॅमेरात कैद केल्याशिवाय सोडायचे नाही....असा पण कॅमेराचा पहिलाच प्रसंग होता त्याला कैद करण्याचा .....तो घेतल्यापासून त्याचा हा पहिलाच पाऊस होता...वारा घाबरून इकडून तिकडून सुसाट वाहू लागला....खिडक्या आपटू लागल्या....पाने सळसळू लागली.....झाडे सर्व आनंदाने नाचू लागली.....मातीला पण त्याच्या येण्याचीच आस होती....ती ही नटून थाटून सुगंधित होऊन घुमु लागली....घरट्याकडे फिरणारे पक्षी ही थांबून त्याच्या स्वागतासाठी थबकले......कोरड्या झालेल्या विहिरी सुद्धा आनंदाने दोन्ही हात पसरून स्वागतासाठी तयार झाल्या...
क्षणात आसमंत भरून आले. मातीला सुगंध फुटला....पूर्ण आसमंतात दरवळू लागला. श्वासागणिक तो रोमरोमांत फिरू लागला. झाडे झुडूपांनी अंगावरची धूळ झटकून टाकली आणि त्याच्या स्वागतासाठी तयार झाल्या. खारुताई, साळुंकी, चिऊताई आनंदाने किलबिल करू लागल्या. घाबरून घरात गेलेली मुले जरा धीर करून डोके बाहेर काढून बघायला लागली. तेव्हढ्यात एक पोरगा आपले शर्ट काढून ओरडत बाहेर आला. त्याला बघून बाकीच्यांना धीर आला. आई ओरडत असूनही एकेक करत सर्व बाहेर पडले. नवीन लग्न झालेली जोडपी खिडकीतून बाहेर डोकावू लागली.
तो पण अगदी जोरात आला...नेहमीसारखा थोडाच येऊन फसवून नाही गेला...आला तो चांगला एक दीड तास राहिला....खिडकी पूर्ण उघडून मीही त्याला घरात घेतले....त्याच्याशी हस्तांदोलन केले.....बायकोने मस्त चहा करून आणला...खिडकीत ठेवला....त्याने पण तो चाखून बघितला.....त्याला कॅमेरात कैद करत चहाचे मस्त झुरके घेत त्याच्याबरोबर मनसोक्त गप्पा मारल्या....नेहमीप्रमाणे लाईट गेली. अगदी अंधार होईपर्यंत त्याच्याबरोबर गप्पा मारल्या....त्याला पण घाई नव्हती...मनसोक्त आला..बसला..खेळ खेळ खेळला...सर्वाना आनंद दिला...सर्वांशी गळा भेट केली आणि मग परतीच्या प्रवासाला निघाला. ते सुद्धा परत लवकरच येईन असे आश्वासन देवूनच गेला.....
CONVERSATION
Subscribe to:
Posts
(
Atom
)
Total Pageviews
Popular Posts
-
वृत्तपत्रे। ऐंशी / नव्वदीच्या दशकातल्या आठवणी । मिलिंद धुरीच्या फेसबुक भिंती वरच्या एकेक आठवणी मनाला भूतकाळात नेऊन सोडतात. अशीच एक आठवण ऐंश...
-
ऐंशी नव्वद च्या दशकामध्ये मी चाळीमध्ये राहायला होतो. दोन खोल्यांची कॉमन गॅलरी असलेली चाळ होती. वडीलांचा आणि चाळीतल्या जवळपास सगळ्यांचाच पगार...
-
झाडाझडती | विश्वास पाटील खूप दिवसांपूर्वी मित्राने सुचवलेले पुस्तक... कधी तरी वाचू ह्या विचाराने मनाच्या कोपऱ्यात कुठे तरी नोंदवून ठेवलेल...
-
घटना पहिली जवळपास अठरावीस वर्षांपूर्वी एका मित्राच्या शेजारच्या कुटुंबामध्ये एक अपघात झाला होता. त्या कुटुंबाचा एकुलता एक मुलगा रॉयल एनफील्...
-
कोरोनाच्या प्रसाराला, लोकांच्या मृत्यूला जेवढे आपण राज्य किंवा केंद्र सरकारला दोषी धरतोय तेवढेच दोषी हे लोकं पण आहेत ज्यांनी औषधांचा काळाबा...
0 comments:
Post a Comment
आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!