भारतीय टपाल खात्याचा नविन उपक्रम


            मागच्या आठवड्यात नाशिक प्रेस ला भेट दिली होती. त्यावेळेला पोस्टाच्या उच्च अधिकाऱ्यांशी भेट झाली होती. हे मागच्या ब्लॉग मध्ये नमूद केले. त्यात एक गोष्ट सांगायची राहून गेली. ते म्हणजे पोस्ट एक नवीन योजना चालू करत आहे. "माय पोस्ट". ह्या योजने अंतर्गत आपण आपला फोटो पोस्टाचे तिकिटावर लावू शकतो. आतापर्यंत आपण देशाच्या नेत्यांचेच फोटो बघत आलो आहे पण आता आपले फोटो हि आपण स्टँप वर लावू शकतो. ह्या साठी पोस्टाने एक विशिष्ट प्रकारचे स्टँप बनवले आहेत. त्यात फोटोची जागा मोकळी ठेवली आहे. तुम्ही तुमचा फोटो दिला कि १० ते १५ मिनिटात आपला फोटो त्या रिकाम्या जागेवर लावून मिळतो आणि आपला स्टँप प्रकाशित होतो. इतर देशामध्ये हि प्रथा चालू आहे. आपल्या देशामध्ये तेलगी सारख्या माणसांमुळे अजूनहि सुरक्षेच्या कारणास्तव हि सेवा चालू झाली नव्हती. गेल्या काही वर्षापासून पोस्टाच्या तिकिटाचा खप कमी झाल्याने कदाचित हि योजना चालू करत आहेत. आता जर तुम्ही कोणाला पत्र पाठवणार असाल तर स्वत:चा स्टँप लावून पाठवायचा जेणेकरून पत्र स्वीकारणार्‍या व्यक्तीला पत्र उघडायच्या आधीच पत्र कोणी पाठवले आहे ते समजेल.
 दुसरी खास योजना म्हणजे, खादीचे स्टँप तिकीट. देशात पहिल्यांदाच खादी वर स्टँप तिकीट बनवले जात आहे. ह्या स्टँप साठी लागणारी खादी शोधण्यासाठी नाशिक प्रेसला खूप मेहनत करावी लागली. खादी वर प्रिंटींग करताना स्टँप ची शाई पसरून स्टँप खराब व्हायचा. त्यासाठी वेगवेगळ्या प्रदेशातले आणि देशातले कापूस मागवून खादी तयार करून बघितली गेली. शेवटी पश्चिम बंगाल मधील एक प्रदेशात चांगल्या प्रकारचा कापूस मिळाला जो धाग्यांना घट्ट पकडून शाई पसरण्यापासून वाचवत होता. मग त्या कापसाची खादी बनवून त्यावर महात्मा गांधीचे चित्र छापून पोस्टाचे तिकीट बनवण्यात आले.  हे तिकीट खूप अनमोल ठरणार आहे कारण ह्याच्या फक्त १ लाख प्रती छापल्या जाणार आहेत. ज्यांना मिळाल्या त्यांच्यासाठी पर्वणी.
भारतीय टपाल खाते एक अभिनव प्रदर्शन आयोजित करत आहे. हे प्रदर्शन  १२ ते १८ फेब्रुवारी दरम्यान दिल्लीच्या प्रगती मैदानावर आयोजित केले जाणार आहे. त्या प्रदर्शनात ह्या स्वत:चा फोटोवाले तिकीट आणि खादी तिकीट प्रकाशित होणार आहे. वरील तारखे दरम्यान दिल्लीत असाल तर ह्या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्या.

CONVERSATION

1 comments:

  1. खुप छान माहिती आहे :-)

    माझ्या ब्लॉग वर दिलेल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
    वाचक संख्या गेल्या महिन्यात २५००० च्या आसपास होती,या वरून एक गोष्ट कळली ती म्हणजे लोक वाचत आहेत..पण रिप्लाय द्यायला त्याना वेळ नसावा :-)
    बरेच जण सद्ध्या इथे लिहिलेल्या टिप्स आणि ट्रिक्स वापरत आहेत..कारण माझ्या जावा स्क्रिप्टचा वापर जिथे होतो ते तो ब्लॉग पाहिल्या पाहिल्या मला कळते :-)
    बहुतेक marathiblogs.net वर असलेले ब्लॉगर्स हे एकमेकाना खुप आधी पासून ओळखतात..त्या मुळे ते एकमेकाना प्रतिक्रिया देत असावेत. :-)

    ReplyDelete

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top