किल्ल्याचे भौगोलिक परिस्थिती आणि रचना पाहता किल्ल्याला वेढा देऊन एक ते दोन वर्षात किल्ला सहज जिंकता येणारा असावा पण तरी सुद्धा हा किल्ला इतिहासात अजिंक्य राहिला. ह्याची कारणे शोधायचा थोडा प्रयत्न केला.
जंजिरा किल्ला अजून पर्यंत अजिंक्य कसा राहिला?
माझ्या अंदाजाप्रमाणे खालील कारणे असू शकतात.
१. हबशी लोक जे मूळ आफ्रिकन वंशाचे होती ते जेवढे क्रूर होते तेवढेच शूर हि होते.
२. किल्ल्यावर गोड्या पाण्याचा चांगला साठा होता जो भर उन्हाळ्यात हि भरलेला असायचा जेणेकरून किल्ल्याला वेढा पडला तरी त्यांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासायची नाही.
३. किल्ल्यात खाण्यापिण्याची चांगली व्यवस्था होती. गोदामात २ वर्षे पुरतील एवढे धान्य भरलेले असायचे. त्यामुळे वेढ्यात उपासमार होत नव्हती.
४. सिद्दींनी काळानुसार आदिलशाही, निजामशाही, मुघल ह्यांच्या बरोबर संधी केलेली होती. ज्याचे राज्य आणि पॉवर जास्त त्या राज्याबरोबर त्यांनी त्या त्या वेळेला संधी केलेली होती.
५. हि लोकं किल्ल्याला वेढा पडला असता मागून हल्ला करून शत्रूचे लक्ष विचलित करत असावे आणि वेढ्या दरम्यान त्यांना रसद पुरवठा करत असावे.
६. किल्ल्याचे उत्कृष्ट आणि मजबूत बांधकाम ह्या किल्ल्याचा दरारा टिकवून होते. मराठी फौजेचा, इंग्रजी आणि पोर्तुगीज आरमाराचा आणि त्यांच्या तोफेचा ह्या किल्ल्याच्या बुरुजांनी यशस्वी रित्या सामना केला.
७. किल्ल्याची बांधणी अश्या प्रकारे केली होती कि बाहेरून शत्रूला किल्ल्यात काय चालले आहे वा किल्ल्याच्या आतील रचना कशी आहे ते कधीच समजू शकले नाही. त्यामुळे शत्रूला चांगली योजना आखता आली नसावी.
८. किल्ल्यामधून असलेला भुयारी मार्ग जो किनाऱ्याला जाऊन मिळत होता. कदाचित ह्या गुप्त रस्त्याद्वारे हेरगिरी, इतर मुसलमान राजांना निरोप पोहचवणे, रसद पोचवणे शक्य असावे.
८. किल्ल्यावर असलेल्या अतिजड आणि लांब पल्ल्याच्या तोफा. 'चावरी', 'लांडा कासम' आणि सर्वात मोठी अशी ' कलाल बांगडी' ह्या सारख्या तोफांनी शत्रूची नजरेत येणारी कितीतरी जहाजे उध्वस्त केली असावी. त्यामुळे शत्रूला कधीच जवळ येत आले नाही.
९.सिद्धीचे प्रबळ आरमार हे एक महत्वाचे कारण असू शकेल. किल्ल्याला चांगल्या लढाऊ आणि मजबूत जहाजांचा नेहमी वेढा असावा जेणेकरून किल्ल्यावर समोरून कधीच चढाई करता आली नसावी.
१०. आज पर्यंतच्या इतिहासात बघितले असेल तर मोठमोठाली राज्ये आणि मजबूत किल्ले हे फक्त फितुरी मुळे पडली आहेत. अनेक महाराष्ट्रातील किल्ले, रायगड, देवगिरीचा किल्ला, टिपू सुलतानाचा मैसूरचा किल्ला, विजयनगरीचे साम्राज्य वगैरे मोठे राज्ये फितुरी मुळेच पडली आहेत. फितुरी करणारे गद्दार आत मधून किल्ल्याचे दरवाजे उघडून द्यायचे अथवा किल्ल्याच्या चोर वाटांची माहिती द्यायचे. सिद्दीच्या नशिबाने त्याला तसे फितुरी करणारे गद्दार मिळाले नव्हते. त्यामुळे हा किल्ला अजिंक्य राहिला असावा.
११. राजे संभाजी ने जेव्हा ह्या किल्ल्याला वेढा दिला होता तेव्हा त्याने काही काळ लढाई थांबवली होती कारण मोठ्या मेहनतीने आणि कौशल्याने आपला एक माणूस किल्ल्यात घुसवला होता. ह्या माणसावर किल्ल्यातील दारूगोळ्याचा साठा शोधून त्याला उडवायची कामगिरी दिली होती पण सिद्धीच्या एका दासीला संशय आल्याने त्याची चौकशी केली गेली आणि तो पकडला गेला. त्याच वेळेला मुघलांनी मागून मराठी राज्यावर हल्ला करायला सुरुवात केली आणि त्यामुळे संभाजीला हा वेढा उचलून परतावे लागले. बहुतेक शिवरायांना सुद्धा ह्याच कारणामुळे किल्ला जिंकता आला नसावा. शिवरायांनी ह्याच किल्ल्याच्या वायव्येस पद्मदुर्ग उभारला. संभाजीने ह्या किल्ल्याला शह देण्यासाठी मग तेथून जवळच्या बेटावरच कासा किल्ला बांधला. आता त्या किल्ल्यावर जायला पुरातत्व खात्याची परवानगी घ्यावी लागते.
१२. सिद्दीला तेथील स्थानिक लोकांचे सहाय्य मिळत असावे जेणेकरून त्याच्या विरुद्ध कधी बंड किंवा फितुरी झाली नाही.
वरील काही कारणे असू शकतात ज्यामुळे जंजिरा कधी पडला नसावा.
बाकी काहीही असो ह्या किल्ल्याने डोळ्याचे पारणे फेडले. असा मजबूत, देखणा किल्ला वर्षोन वर्षे उन पाऊस, समुद्राच्या लाटा, खाऱ्या वाऱ्याचा सामना करत आपले पाय घटत रोवून आपल्या महाराष्ट्रात उभा आहे हेच अभिमानाची गोष्ट आहे.
खाली काही किल्ल्यावर काढलेले मोजके फोटो दिलेले आहेत. साडे तीनशे फोटो मधून मोजकेच फोटो निवडणे किती कष्टाचे काम असते?
१२. सिद्दीला तेथील स्थानिक लोकांचे सहाय्य मिळत असावे जेणेकरून त्याच्या विरुद्ध कधी बंड किंवा फितुरी झाली नाही.
वरील काही कारणे असू शकतात ज्यामुळे जंजिरा कधी पडला नसावा.
बाकी काहीही असो ह्या किल्ल्याने डोळ्याचे पारणे फेडले. असा मजबूत, देखणा किल्ला वर्षोन वर्षे उन पाऊस, समुद्राच्या लाटा, खाऱ्या वाऱ्याचा सामना करत आपले पाय घटत रोवून आपल्या महाराष्ट्रात उभा आहे हेच अभिमानाची गोष्ट आहे.
खाली काही किल्ल्यावर काढलेले मोजके फोटो दिलेले आहेत. साडे तीनशे फोटो मधून मोजकेच फोटो निवडणे किती कष्टाचे काम असते?
बोटीत कोंबलेली माणसे |
भरभक्कम बुरुज |
भर भक्कम बुरुज |
सिद्दीचा राजवाडा |
सिद्दीचा राजवाडा. येथून आत जायला बंदी आहे. |
किनाऱ्यावर असलेला सिद्दीचा राजवाडा. |
त्यावेळेची मुख्य मशीद पण आता बंद असते. फक्त ईद च्या दिवशी प्रवेश असतो |
भग्न झालेल्या भिंती, येणारे पर्यटक पडू नये म्हणून नव्याने बांधलेले कठडे. दोन्ही बांधकामामध्ये किती तफावत आहे ते पहा |
|
टेकडीवरून दिसणारा गोड्या पानाचा तलाव |
हे बहुधा धान्याचे कोठार अथवा दारू गोळ्याचे कोठार असावे. थोड्या वरच्या बाजूला बांधलेले आहे. |
दुरवर समुद्रात असणारा हा सुळका. कसा काय तिथे निर्माण झाला असेल काय माहिती ? |
टेकडी वरून दिसणारा किल्ला आणि समुद्र, खाली सफेद रंगात असलेली मशीद |
हे काय होते ते समजले नाही बहुतेक ही भिंत नंतर टाकून हे बंद केले असावे. |
बुरुज बांधताना चौकोनी दगडांना असे होल पडायचे. वरच्या दगडाचा बाहेर आलेला खुंटा ह्या दगडात बरोबर बसायचा त्यामुळे बुरुजाच्या भिंती एकमेकांत अडकून मजबूत राहिल्या (इंटर्लोकिंग पद्धती प्रमाणे) |
बरुजावरून एकदम खाली |
बरुजावरून एका कोनातून दिसणारा महाल |
सागाचे दरवाजे खिडक्या काढून नेल्यामुळे किल्ल्यावरील घरांची अशी हलत झाली. |
किल्ल्यावरील झरोक्यातून दिसणाऱ्या बोटी. शत्रू पण असाच दिसत असावा. |
भरलेल्या होडीला एका बांबूने फक्त दिशा देतात. |
कासा खडकावर पद्मदुर्ग आहे .
ReplyDelete