कोरोनाच्या प्रसाराला, लोकांच्या मृत्यूला जेवढे आपण राज्य किंवा केंद्र सरकारला दोषी धरतोय तेवढेच दोषी हे लोकं पण आहेत
ज्यांनी औषधांचा काळाबाजार केला. ज्यांनी रेमदेसीविर सारखी इंजेक्शने मार्केट मधून गायब करून तुटवडा निर्माण केला आणि इंजेक्शने मग चढ्या भावाने विकली
ज्यांनी ऑक्सिजनचा पण तुटवडा केला आणि ऑक्सिजनचा सप्लाय थांबून ठेवला, ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर स्टॉक करून चढ्या भावात विकले.
ते हॉस्पिटल पण जवाबदार आहेत ज्यांनी माईल्ड पेशंटला सुद्धा ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर चा बेडवर ठेवले आणि गरजू लोकांना बेड उपलब्ध करून दिले नाहीत.
असे हॉस्पिटल ज्यांनी कुटुंबीय पैसा भरत आहेत म्हणून वीस-पंचवीस दिवस लोकांना ॲडमिट करून ठेवले आणि गरजू लोकांसाठी बेड राहिले नाहीत.
जी लोक लस घेण्यासाठी पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यात पात्र होते पण त्यांनी लस घेतल्या नाहीत. दुसरे घेऊ दे मग आपण बघू असा चुकीचा दृष्टिकोन ठेवला.
अशी आईबापाची मुलं, जेव्हा साठ वर्षाच्या वरती लोकांसाठी लसीकरण चालू झाली होती आणि लसीकरण केंद्रावर गर्दी नव्हती अशा वेळेला आपल्या आई बापाला लस दिली नाही आणि नंतर त्यांच्यासाठी बेड मिळवण्यासाठी वणवण भटकत होते.
केंद्राच्या कोविड टीमला पण तेवढेच जवाबदार धरले पाहिजे ज्यांनी दुसऱ्या देशाच्या लस प्रस्तावाला डिसेंबर पासून थांबवून ठेवले... सुरुवातीचे लसीकरण व्यापक न करता फक्त सरकारी हॉस्पिटल वर अवलंबून राहिले आणि मग आग लागल्यावर विहिरी खोदयाला लागले.
ते लोक पण जबाबदार आहेत ज्यांना गृह विलगीकरण केले होते पण ते सगळीकडे तोंड मारत फिरत होते.
त्या सगळ्या पॅथॉलॉजी लॅबोरेटरी पण जबाबदार आहेत ज्यांनी पॉझिटिव्ह चे निगेटिव्ह आणि निगेटिव्ह चे पॉझिटिव्ह रिपोर्ट करून दिले
ती राजकारणी मंडळी ज्यांनी आपल्या वॉर्ड साठी ऑक्सिजन औषधाचा जास्तीचा साठा वळवून घेतला. आम्ही सरकारला इंजेक्शन चा साठा उपलब्ध करून दिला हे दाखवण्यासाठी फार्मा कंपनीना स्टॉक पुरवठा करू दिला नाही. स्वतः चार्टर्ड विमानाने जाऊन स्टॉक घेऊन आले पण सरकारला तो मार्ग उपलब्ध करून दिला नाही.
ते मूर्ख लोक सुद्धा जवाबदार आहेत ज्यांनी रेमेडिसविर इंजेक्शन मध्ये पाणी भरून गरजूंना विकले. आणि लोकांचे प्राण नाही वाचू शकले.
ते तंत्रज्ञ पण जबाबदार आहेत ज्यांनी केलेल्या चुकांमुळे/निष्काळजी पणांमुळे हॉस्पिटलमध्ये आग लागून लोक जळून/ गुदमरून मेलेत.
मीडिया चॅनल वाले पण जबाबदार आहेत ज्यांनी बोंबाबोंब करून ब्रेकिंग न्युज च्या नावाखाली त्याच त्याच करोनाच्या बातम्या दाखवून लोकांना अटॅक ने मारले.
ते पत्रकार आणि मोठमोठी मीडिया हाउस जबाबदार आहेत ज्यांनी पंतप्रधान मोदींना, PMO ऑफिस ला डायरेक्ट प्रश्न विचारायची हिंमत दाखवली नाही.
ते पोलिस पण जबाबदार आहेत ज्यांनी लॉक डाऊन च्या काळात पाच पन्नास रुपये घेऊन करोना पेशंट ला प्रवास करायला परवानगी दिली.
ते लोक पण जवाबदार आहेत ज्यांनी मास्क ना लावता किंवा हनुवटीवर मास्क लावून बोंबलत फिरले.
ते निवडणूक आयोग पण तेवढेच जबाबदार आहे ज्यांनी कोरोनाच्या कठीण काळामध्ये सुद्धा निवडणुका लावल्या आणि मोठमोठ्या सभांना प्रचाराला परवानगी दिली. निवडणुका लागल्या तर काय घरात बसून थोडीच प्रचार होणार आहे.
ते पीएमओ ऑफिस पण तेवढेच जबाबदार आहे त्यांनी पीएम केअर मध्ये पुरेसे पैसे असतानासुद्धा राज्यांना ऑक्सीजन प्लांट उभारण्यासाठी किंवा आरोग्य सुविधा उभारण्यासाठी वेळेत निधी उपलब्ध करून दिला नाही.. देशाची लोकसंख्या पाहता योग्य लसीची ऑर्डर सुद्धा केली नाही.
ते लस निर्मात्या कंपन्या सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत ज्यांची भारतामध्ये सगळ्यात मोठी लस उत्पादन करण्याची क्षमता असून सुद्धा आजच्या तारखेला दुसऱ्या देशात जाऊन लस बनवण्याचे प्लांट टाकणार आहेत.तिथे जाऊन सेट होऊन लस कधी बनणार आणि पुरवठा कधी होणार.
कोणाकोणाला अजून जबाबदार पकडणार ???
0 comments:
Post a Comment
आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!