घारापुरीच्या लेण्या- Elephanta Caves


कधी कधी प्लान करून ठरवलेल्या पिकनिक पेक्षा अचानक ठरवलेल्या पिकनिक जास्त आनंद देऊन जातात. असाच प्लान काही दिवसापूर्वी ठरला.…. घारापुरीच्या लेण्या बघण्याचा.…….

घारापुरीच्या लेण्या म्हणजेच एलिफंटा गुंफा..इथे जायचे लहानपणापासून मनात होते. पण एवढी वर्षे मुंबईत राहून सुद्धा तिथे जाण्याचा योग आला नाही. आणि काही दिवसापूर्वी अचानक ठरलेल्या प्लान मुळे जायचा योग आला.
घारापुरीच्या लेण्या बद्दल इथे काही माहिती लिहिणार नाही आहे. ती विकीपेडिया वर सहज उपलब्ध आहे.

इथे फक्त मोबाईल मधून काढलेले फोटो लावणार आहे. DSLR कॅमेरा घेऊन गेलो नव्हतो म्हणून सगळे फोटो मोबाईल मधून काढलेले आहेत त्यामुळे DSLR ची क्वालिटी ह्या फोटोंना नाही.



घारापुरी लेण्यांना /एलिफंटा गुंफाला जायचे कसे ?

लोकल ट्रेनने किंवा बसने सीएसटी स्टेशन/ चर्चगेट स्टेशन वर पोहोचावे. तिथून बस किंवा टॅक्सी करून अपोलो बंदर इथे पोहोचावे. टॅक्सीवाल्याला अपोलो बंदर नाही समजले तर गेटवे ऑफ इंडिया सांगावे. तिथे पोलिस चौकी समोरच तिकीट बुकिंग चे ऑफिस आहे.

तिथे बोटीतून जाण्या येण्याचे एकच तिकीट मिळते आणि एलिफंटा किंवा घारापुरीच्या लेणी पाहण्याचे तिकीटही मिळते. ते इथेच घेतले तर परत पुढे लाईन लावायची गरज नाही पडत.

तिकिटाचा दर १८.०५. २०१६ रोजी बोटीच्या प्रवासाचा रुपये १८० आणि लेण्या पाहण्याचा दर रुपये ३० प्रत्येकी आहे.

पुरातत्व विभागाने सगळ्या लेण्या आपल्या अख्यतारित ठेवले असल्यामुळे बऱ्यापैकी स्वच्छता आहे. योग्य त्या ठिकाणी लाकडाची चौकोनी फ्रेम बनवून पर्यटकांना मूर्तीला हात लावण्यापासून रोकण्यात आले अहे.

लहानपणापासून हि मूर्ती अभ्यासाच्या पुस्तकात, वर्तमान पत्रात, विविध सरकारी मुखपत्रात, चित्रपटात, वेबसाईट वर, फोटोग्राफ मध्ये बघितली होती. आज एवढ्या वर्षांनी ह्या त्रिमुर्तीला बघण्याचा योग आला. हि त्रिमूर्ती मुंबईची एक  प्रकारे ओळखचिन्ह बनून गेली आहे.










 सुंदर कलेची परकीय आक्रमणांनी केलेली (पोर्तुगीजांनी मुखत्वे) केलेली वाताहत बघवत नाही.










ह्या कातळ खाली पाण्याचे छोटेखानी तलाव आहे.














भयंकर गर्मीमुळे आणि सहाच्या आत बोटीने परतण्यासाठी सगळ्या लेण्या पूर्णपणे बघत आल्या नाहित.

पण पावसाळ्यात ह्या लेण्या, त्यांच्यावर चढलेल्या हिरव्या गालीच्या मुळे आणि पाण्याच्या धबधब्यामुळे नक्कीच प्रेक्षणीय असतील.

पावसाळ्यात सहसा फेरी बोटी चालू असतात. फक्त पावसामुळे आणि वाऱ्याच्या जोरामुळे पोहोचायला एका ऐवजी दोन तास लागतात आणि बोटींची संख्या नेहमी पेक्षा कमी असते.










मुंबईच्या किनाऱ्यावरचा सूर्यास्त.




आपल्यासारखे महामूर्ख पर्यटक ह्या जगाच्या पाठीवर कुठे नाहीत. ह्या हिरोने आधीचा फोटो मूर्ती वर पाय काढला होता. अरे तुम्ही देव मानत नसाल पण निदान त्या कलेची कदर करून तरी त्या कलाकाराच्या निर्मितीवर पाय ठेवू नका.

काही बायका आणि मुली तर शंकराच्या पिंडी वर पाय टेकवून फोटो काढत होत्या. सिक्युरिटी गार्ड ओरडल्या नंतर उलट त्या गार्डलाच बडबड करत बाजूला झाल्या .


ह्या लेण्या सोमवारी बंद असतात.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!