आमची दिवाळी !!

साहेब का लावता आपल्याच सणाला दूषण,
खरंच करते का हो दिवाळी प्रदूषण???

वर्षभर वातानुकूलित घरात राहून खाजगी गाड्यांमध्ये फिरता,
आणि का हो फक्त दिवाळीलाच दोषी धरता??

नका करू हो खोट्याची पाठराखण,
बालगोपाळांच्या आनंदावर का घालता विरजण??

दिवाळीच्या चार दिवसात प्रदूषणात जर खरंच एवढी वाढ होते,
मग औद्योगिक प्रदूषणावर, लाळचाटू पुरोगाम्यांची का बर दातखीळ बसते????

तुम्हाला फक्त हिंदूंच्या सणांनाच पर्यावरण दिसते
अन इतर धर्माच्या वेळी मात्र सर्वच चालते

ऑपेनहायमर सारख्या अनुबॉम्ब च्या निर्मात्याला पण हिंदू संस्कृती भावते,
पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या तुम्हाला मात्र वेद,धर्म,सण वगैरे थोतांड वाटते.

अश्या लोकांबाबत एक घोर विडंबन घडते,
मेल्यानन्तर यांचे कुटुंबिय त्या देहावर अग्निसंस्कारच करते.
- मनोज भोसले



CONVERSATION

0 comments:

Post a Comment

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top