सचिनची शंभरावी सेन्चुरी
![]() |
सचिनचे शंभरावे शतक |
ज्यांना सचिन तेंडूलकर काय चीज आहे हे माहित नाही त्यांनी गेले काही दिवसात खूप बकबक केली. त्या सगळ्यांना आज उत्तर मिळाले असेल ही अपेक्षा.
वाईट एका गोष्टीचे वाटते की आज इंटरव्यू देताना त्याला हे सांगावे लागले की मी केलेली ९९ शतके कोणी बघितली नाही पण माझे १०० वे शतक होत नाही म्हणून सगळ्यांनी (मानसिक) त्रास दिला.
सचिन मला माहिती आहे की तू ह्या बकबक कडे लक्ष देणार नाहीस. तू असच खेळत राहा. अजून क्रित्येक वर्षे तुला क्रिकेट खेळताना बघायचे आहे.
भोवऱ्याकडून तुझे शंभरवेळा अभिनंदन.
ता.क : तुम्ही सचिनची नवीन हेअरस्टाईल बघितली आहे का? मला तर आवडली .
सगळ्यांचे अभिनंदन...आनंदोत्सव साजरा करा !
उत्तर द्याहटवा