च्यायला !!! कधी कधी डोकेच फिरते..जेव्हा कोणी सारखे सारखे बॉम्बे बॉम्बे करत बसले कि. माझ्या समोर जेवढे जण बॉम्बे बोलतात त्या सर्वाना मी टोकतो आणि मुंबई बोलायला सांगतो. काही जण त्यावरहि वाद घालत बसतात. जास्त डोक्यात शिरला की मग ओरडून बोलायचे मग साले लाईनवर येतात. हे लोक साले आपल्या भावनांचा आदर का नाही ठेवत. किती वेळा एकच गोष्ट ओरडून सांगायची.

कलकत्त्याचे जेव्हा कोलकाता केले होते तेव्हा त्याच दरम्यान मी माझ्या कोलकाता ऑफिस मध्ये एका रे आडनावाच्या माणसाला फोन केला होता. तेव्हा माझ्या तोंडून बोलताना कलकत्ता निघाले तेव्हा लगेच त्याने मला सांगितले कि आता कोलकाता नाव केलेले आहे तेव्हा तेच नाव घे. मग लगेच त्याच्या बोलण्याचा आदर ठेवून लगेच दुरुस्ती केली आणि जेव्हा जेव्हा त्याच्याबरोबर बोलणे झाले तेव्हा तेव्हा आवर्जून कोलकाता बोललो. त्याने सुद्धा माझ्याशी ह्या गोष्टीवरून चांगली दोस्ती केली.
तीच गोष्ट चेन्नई च्या बाबतीत होते तेथे चुकूनहि लोक मद्रास बोलत नाही आणि दुसरा बोलला तर लगेच त्याला चूक दुरुस्त करायला लावतात. मराठी लोकांमध्ये अशी अस्मिता केव्हा जागणार? कोचीन चे कोची केले गेले, तंजोर चे तंजावर केले गेले, वाईझाग चे विशाखापट्टनाम केले गेले. तेथील कोणीही लोक जुने नाव घेत नाही आणि घेऊ देत नाही. त्यांच्या राज्यात नाहीच नाही पण आपल्या राज्यात हि नाही घेऊ देत. बघा अनुभव घ्या कधी !!!आणि आपण साले एक बॉम्बे चे मुंबई बोलू शकत नाही ???
साऊथ लोकांना अस्मिता शिकवावी लागत नाही किंवा भाषेच्या अस्मितेचा आव आणावा लागत नाही. आम्ही आपले 'मराठी अस्मिता', 'मराठी बाणा' असेल शब्द वापरून ब्लॉग लिहिणार, साईट बनवणार, मोठ्या मोठ्या गप्पा मारणार, शिवरायांच्या फोटो सोबत 'मी मराठी' मराठी बाणा वगैरे शब्द लिहून टी शर्ट घालणार, छान छान मराठी वोलपेपर डेस्कटोप वर लावणार पण बोलताना बॉम्बेच बोलणार. आम्ही मराठी मोडणार पण वाकणार नाही. अरे पण आपण आपल्याच घरात घाण करतोय हे का दिसत नाही ह्यांना? अशा काही लोकांमुळेच परप्रांतीयांचे चालते आणि ते आपल्या डोक्यावर येऊन पोळ्या थापाताहेत.
मध्ये करण जोहर च्या एका सिनेमा मध्ये बॉम्बे वापरले गेले होते. राज साहेबांनी आवाज दिल्यावर करण जोहर ने येऊन माफी मागितली होती. त्यावर राज साहेबांवर किती टीका झाली होती. समांतर सरकार चालवायचा प्रयत्न करताहेत, काही मराठे राज्यकर्ते तर म्हणत होते, करण जोहर ने जर सुरक्षा मागितली असती तर आम्ही दिली असती. आता काय बोलणार ह्या षंढ राजकारण्यांना ? जेव्हा मराठीचा, महाराष्ट्राचा किंवा मुंबईचा मुद्दा येतो तेव्हा तरी आपले मतभेद विसरून सर्वानी एकत्र यायला हवे ना ?
मध्ये करण जोहर च्या एका सिनेमा मध्ये बॉम्बे वापरले गेले होते. राज साहेबांनी आवाज दिल्यावर करण जोहर ने येऊन माफी मागितली होती. त्यावर राज साहेबांवर किती टीका झाली होती. समांतर सरकार चालवायचा प्रयत्न करताहेत, काही मराठे राज्यकर्ते तर म्हणत होते, करण जोहर ने जर सुरक्षा मागितली असती तर आम्ही दिली असती. आता काय बोलणार ह्या षंढ राजकारण्यांना ? जेव्हा मराठीचा, महाराष्ट्राचा किंवा मुंबईचा मुद्दा येतो तेव्हा तरी आपले मतभेद विसरून सर्वानी एकत्र यायला हवे ना ?
आता तरी सुधरा रे बाबांनो !!! \
मराठी असल्याचा नुसता गर्व नकोय तर माज असला पाहिजे.
मराठी असल्याचा नुसता गर्व नकोय तर माज असला पाहिजे.
आतापर्यंत आपल्या देशात ह्या शहरांची नावे बदलली गेली आहेत. मुंबई (आधी बॉम्बे, नवीन नाव १९९५ पासून) चेन्नई (आधी मद्रास, नवीन नाव १९९६ पासून) कोलकाता (आधी कलकत्ता, नवीन नाव २००१ पासून) विजयवाडा (आधी बेजवाडा) विशाखापट्टनम (आधी वाल्तर, त्याही आधी विझाग) कडपा (आधी कडप्पाह, नवीन नाव २००५ पासून) शिमला (आधी सिमला ) कानपूर (आधी कावन्पोर, नविन नाव १९४८) थीरुवनांतपुरम (आधी त्रिवेंद्रम, नवीन नाव १९९१) पुणे (आधी पुना) कोची (आधी कोचीन, नवीन नाव १९९६) सागर (आधी सौगोर) जबलपूर (आधी जब्बलपोर ) नर्मदा (आधी नरबुद्दा) पुडुचेरी (आधी पोन्दिचेर्री, नवीन नाव २००६) इंदोर (आधी इंदूर) कोझिकोडे (आधी कालिकत ) उदगमंडलाम (आधी ओतकामुंद ) तिरुचिरापल्ली (आधी त्रिचीनोपोली) तंजावर (आधी तंजोर) जास्त माहिती ह्या लिंकवर विकिपेडिया |
व्वा छान ... बॉम्बे नाही मुंबईच म्हणणार ( सावरकरांनी केलेले आव्हान )
उत्तर द्याहटवाधन्यवाद निखिल
हटवा