कर्नाळाचा ट्रेक
Collage Gang |

मुंबई गोवा हायवे |
गुगल वर नकाशे, रस्ते सर्व बघून ठेवले. ठाणे बेलापूर रोड नुकताच नवीन केला होता त्यामुळे त्या रस्त्यावर ड्रायविंग करायला मजा येणार हे नक्कीच होते.सगळे मित्र आळशी आहेत आणि ठरल्या टाईमवर कोणी येणार नव्हते ह्याची खात्री होती. त्यामुळे सर्वाना आदल्या रात्रीच माझ्या घरी राहायला बोलावले होते. जेणेकरून सर्व टाईमवर निघू आणि उन्हं लागायच्या आधी तिथे पोहोचू. पण साल्यांनी टाईमपास करायचा तो केलाच. ७ वाजता निघायचे ठरवले होते. आम्ही ९ वाजता निघालो. गाडीचे टायर चेक केले. हवा भरली, ब्रेक चेक केले आणि सरळ ठाणे-बेलापूर रोड पकडला.
ठाण्यातून बाहेर पडलो कि विटावा गाव येते, ठाण्याची हद्द तेथे संपते, हद्द संपल्यावरच एक पेट्रोलपंप आहे. तेथे पेट्रोल जवळपास दोन ते तीन रुपये स्वस्त असते कारण ठाण्यात येतानाचा लागणारा जकात लागत नाही. गाडी ला पेट्रोल पाजले, टाकी फुल करून ठेवली. गरज नव्हती पण स्वस्त मिळते म्हणून भरून ठेवले. मध्ये कुठे ब्रेक न घेता सरळ बेलापूर पर्य़ंत प्रवास केला. पाउण तासातच सीटला मुंग्या आल्या म्हणून उतरावे लागले. जवळपास चहा घ्यायचा विचार होता पण चांगले हॉटेल काही दिसले नाही म्हणून ती आयडिया रद्द करत 10 मिनिटानी परत प्रवास चालू केला.
कर्नाळाचा बोर्ड |
कर्नाळा मुख्यत्वे त्याच्या रांगड्या पणासाठी प्रसिद्ध आहे. सरळसोट चढाई, सुंदर निसर्ग जवळपासच्या ट्रेकर्स ला नेहमीच खुणावत आला आहे. मानससरोवर ला घेऊन जाणारे टूरिस्टवाले सुद्धा लोकांना सराव करण्यासाठी म्हणून कर्नाळा चा ट्रेक करायला सांगतात. कर्नाळा हे पक्षी अभयारण्य म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. पक्षीप्रेमींची सुद्धा येथे मोठी वर्दळ असते. कर्नाळाच्या पायथ्याशी वनखात्याचे चेक पोस्त आहे. गाडी पार्किंग ला चांगली जागा केली आहे. बाईक असेल तर अजून थोडे वर पर्य़ंत जाता येते. इथे रस्त्यावर उभे राहूनच कर्नाळाच्या किल्ल्याचा सुळका आकाशांत उंच ढगामध्ये गेलेला दिसून येतो.
कर्नाळा किल्ल्याचा नकाशा |
हायवे वरुन दिसनारा सुळका- झुम फोटो
मित्रांची मस्ती
जुनी सवय दुसरांच्या गाडीच्या बाजूला उभे राहून फोटो काढायचे.
हॉटेल कर्नाळा |
हॉटेल कर्नाळा
हॉटेल मधून दिसणारा कर्नाळाचा सुळका |
नाश्ता करून पाण्याच्या बॉटल भरून घेऊन निघालो नि सरळ ट्रेक चढायला सुरुवात केली. वनखात्याच्या चेकपोस्ट वर आपल्या नावाची नोंदणी करावी लागते. इथे एन्ट्री फी भरावी लागते आणि आपल्याकडे जर प्लास्टिक च्या बॉटल असतील तर त्याचे डिपोजिट जमा करावे लागते आपण परत आल्यावर बॉटल दाखवून डिपोजिट परत घ्यायचे. जर संध्याकाळ पर्य़ंत गेलेली माणसे परत नाही आली तर वनखात्याच्या अधिकार्यांना भर जंगलात रात्रीचे शोधावे लागते म्हणून आपण परतताना त्यांना माहिती दिली तर चांगले.
जंगलाच्या पायवाटेवर चालत गेलो कि कुठेही चुकायला होत नाही. आधी गेलेले आणि परतणारे ट्रेकर्स आपल्याला भेटत राहतात. जर ट्रेकिंग ची सवय नसेल तर १० मिनिटातच दमायला होते. आम्ही मध्ये मध्ये थांबे घेत हळू हळू चढत राहिलो. जवळपास ३ तास च्या वर आम्ही चढत होतो. सुनिल आणि गणेश सोडला तर बाकि सगळय़ांची हवा टाईट झाली होती. पण किल्ला काही दिसायला तयार नव्हता. त्यात वरून येणारे लोक अजून अर्धा किल्ला पण नाही चढला आहात असे सांगून घाबरवत होते.
कसे बसे करत आम्ही पठारावर पोहोचलो आणि वरून जो काही नजरा दिसला तो बघून सर्व त्रास, झालेली सर्व दमछाक विसरून गेलो. पठारावर सुंदर हिरवीगार चादर पसरल्यासारखे हिरवळ पसरली होती. नुकताच हलका पावूस येऊन गेल्याने सर्व गवत ओले होते. भयंकर दमलो असल्यामुळे कपड्याचा काही विचार न करता सरळ हिरवळीवर लोळण घातली. पठारावरून दिसणारा सह्याद्रीच्या नजरा तर अप्रतिम होता. सह्याद्रीला बघून घट्ट मिठीत घ्यावेसे वाटत होते.
कसे बसे करत आम्ही पठारावर पोहोचलो आणि वरून जो काही नजरा दिसला तो बघून सर्व त्रास, झालेली सर्व दमछाक विसरून गेलो. पठारावर सुंदर हिरवीगार चादर पसरल्यासारखे हिरवळ पसरली होती. नुकताच हलका पावूस येऊन गेल्याने सर्व गवत ओले होते. भयंकर दमलो असल्यामुळे कपड्याचा काही विचार न करता सरळ हिरवळीवर लोळण घातली. पठारावरून दिसणारा सह्याद्रीच्या नजरा तर अप्रतिम होता. सह्याद्रीला बघून घट्ट मिठीत घ्यावेसे वाटत होते.
पठारावरून दिसणारा कर्नाळा किल्ला |
उतरायचे कसे ???? |
kahi sundar smriti astat kahi sundar diwas astat
ReplyDeletepan sarvat peksha jast sundar ekch vastu aste....
tocha navicharta na kalta na mangta bhetat asto
pratyek koprat pratyek veli pratyek shanat....
tuja sath....
mitramandali lai bhari aahe. aaho manje lai abhari aahe....jai maharastra....
to pic ver jatana je thrill aahe te kharach khucb sundar aahe...pratyek disah ne vaara aapla pratyek aanga var firun jato jasakay to "ringa ringa rosese" khelt asto. mast doni haat lambvun udaycha maan hot re..pan kay karnar pereshoot sath nahvta....tya veli kase te lok roz jaat astil te ek yaksh prashna j aahe...thank u karnala aamala shevti kalala ki "jiva pasun mahenat :karnara: yashashvi hoto- :karnala:
javun ya tangdi cha toda maron karun ya.....