निसर्गचक्र

ह्या बाईला आणि तिच्या तान्ह्या बाळाला प्लॅटफॉर्म वर बघून, मागे एकदा बुलेट वरून जाताना सिग्नलवरच्या भिकारी बाईकडे हाताशी दोन आणि कडेवर असलेल्या एका तान्ह्या मुलाला बघून माझी बायको म्हणाली की "देवपण बघ ना किती क्रूर असतो, अशा बायकांना दहा दहा मुले देतो आणि ज्यांना खरच बाळाची गरज असते त्यांना काहीच देत नाही."

मग मी म्हटले देव एवढा निर्दयी कसा असू शकतो. जरा खोलात जाऊन विचार कर आणि त्यांच्या जीवनशैलीचे परीक्षण कर...मग तुला जाणवेल की या बायका निसर्गाच्या विरुद्ध कधीच जात नाहीत.

त्या गर्भनिरोधक गोळ्या घेत नाहीत..... "आत्ता एवढ्या लवकर मूल नको" म्हणून राहिलेल्या गर्भाचा स्वतःहून कधी गर्भपात करत नाही....करियर, कुटुंब, फिगर ला महत्व देऊन चाळीशी पर्यंत मुले नको असा विचार करत नाहीत....जेव्हा हार्मोन्स आणि शरीर  मुलाला जन्म देण्यासाठी तयार असते तेव्हाच  मुलांचा जन्म होतो.... त्या मासिक धर्म पुढे ढकलायच्या गोळ्या घेत नाही....फॅमिली प्लानिंग ची साधने वापरत नाही...अर्थात निसर्गाच्या चक्रात कधीच फेरफार करत नाहीत....त्यामुळे देव किंवा निसर्ग त्यांना दोन्ही हातांनी भरभरून देतो

आणि

आपण शिकली-सवरलेली माणसे काय काय करत नाही. निसर्गाची प्रक्रिया बदलण्यासाठी....निसर्गालाच आपल्या साच्यात ढाळण्यासाठी....आपल्या हिशोबाने आणि सोयीनुसारआपणच निसर्गाची चक्रे बदलतो आणि मग आपणच देवाला...नशिबाला दोष देत बसतो.

निसर्ग त्यांनाच दोन्ही हातांनी देतो जे निसर्गाची काळजी घेतात....निसर्गाचे नियम पाळतात.




CONVERSATION

0 comments:

Post a Comment

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top