मराठी कॉर्नर....एक नवी सुरवातमराठी ब्लॉग च्या दुनियेत अजुन एक साईट दरवाजे ठोठावते आहे.मराठी कॉर्नर. कुठल्याहि सामाजिक गोष्टी वर चर्चा करण्यासाठि हे चांगले व्यासपिठ आहे. अद्वैत कुलकर्णी जो ह्या साईट चा संचालक सदस्य हि आहे, त्याच्या बरोबर माझा इमेल संवाद झाला. तेव्हा त्याच्याकडुन ह्या साईट बद्दल माहिती मिळाली. ति इथे देत आहे. ह्या साईट वर तुम्ही तुमचे ब्लॉग हि जोडु शकता. कमी वेळेत ह्या साईट ने 100 च्या वर सदस्य जोडणी केली आहे. ह्या साईट वरचे नियम आणी अटी वाचा आणि तुम्ही सुद्धा ह्या साईट चे सभासद होउ शकता.
"....
थोडक्यात माहिती
१. साईटचं नाव: Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम
२. साईटच्या मालक-चालकाचं नाव: सौ. पल्लवी कुलकर्णी
३. साईटचा उद्देश व कार्यपद्धती: एकदम सहज, साधी, सोपी आणि मुख्यतः मराठीसाठी काम करणारी अशी ही वेबसाईट आहे. केवळ मराठीसाठी म्हणून इतर भाषांचा अपमान करणे वा इतर भाषांचा तिरस्कार करणे या मताचे आम्ही नाही. हे संकेतस्थळ सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश असा की आज मराठी ब्लॉगर "ब्लॉगिंग" या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सक्रिय होत आहेत जे खरोखरच खुप चांगले आहे. त्यामुळे अशा सर्वांना कोठेतरी एकत्र आणणे गरजेचे आहे जेणे करून सर्व मराठी लोक एका छताखाली एकत्र येतील, एकत्र विचरांचे आदान-प्रदान करतील, त्यांची मते मांडतील, गप्पा गोष्टी करतील, २ क्षण आनंदात घालवतील. थोडक्यात इंग्रजीत म्हणायचे झालेच तर "virtual online gate to gather". इथे कोणत्याही प्रकारे राजकीय, जातीय वा अश्लील लेखनाला जागा मिळणार नाही!
४. साईटचं स्वरूप व्यावसायिक की हौशी : या संकेतस्थळाला व्यवसायिक म्हणता येणार नाही. इथे कोणताही गोष्टीचा प्रचार केला जात नाही. केवळ मराठी ब्लॉगर्स व मराठी जनांना एकत्र एका छताखाली आणणे हाच आमचा उद्देश आहे. त्यामुळे याला हौशी म्हणणे हेच योग्य ठरेल!
५. लेखकांना स्वत:च्या ब्लॉगव्यतिरिक्त या साईटवर लेखन केल्याचा फायदा कशाप्रकारे होऊ शकतो.
एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा "ब्लॉगिंग" platform नाही! इथे तुम्ही असे लेख प्रसिद्ध करावेत ज्यामुळे इतर लोक त्यावर चर्चा करू शकतील, त्यांची मते मांडू शकतील. उदा: सध्या एका सभासदांनी "महिला राज" हा विषय मांडला आहे ज्यावर खरच खूप बोलता येते, चर्चा करता येते!
याशिवाय आम्ही "तुमचा ब्लॉग जोडा" हा विभाग चालू केला आहे जिथे सभासदांचे ब्लॉग आम्ही मराठी कॉर्नरशी जोडतो की जेणेकरून त्यांच्या ब्लॉग्सना जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळेल.
६. लेखकांच्या साहित्याची सत्यासत्यता पडताळणी व सुरक्षा उपाययोजना (लेखक केवळ याच साईटवर स्वलिखित प्रसिद्ध करत असतील आणि या साईटवरून लेखन चोरीला गेल्यास लेखकाने काय करायचं याची माहिती)
लेख कोणत्याही वेबसाईटवरून चोरीला जाऊ शकतात. त्यामुळे याला आळा घलता येत नाही. आणि ते शक्यही नाही! आणि आधीच सांगितल्याप्रमाणे हा ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म नाही! ही संकल्पनाच मुळात नवी आहे, unique आहे.
पण चोरीचे लेख इथे प्रसिद्ध केले जाणार नाहीत याची खात्री देऊ.आम्ही सर्व लेख बारकाइने वाचतो. जर तरिही कोणाला काही अक्षेप आले तर ते आम्हाला कधीही PM (Private Message) पाठवू शकतात अथवा अम्हाला मेल करू शकतात. आम्ही त्याची गांभीर्याने दखल घेऊ.
७.आपला ब्लॉग कसा जोडायचा?
आपला ब्लॉग मराठी कॉर्नरशी जोडण्यासाठी इथे क्लिक करा: http://www.marathicorner.com/memberblogs/ इथे "तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!" या बटणावर क्लिक करून दिलेल्या अटी व नियम वाचून व त्यांची कृती करून मगच दिलेला अर्ज/form भरून submit करावा. आम्हाला तुमची माहिती मिळेल. form भरल्यानंतर २४ तासांच्या आत तुम्हाला आमच्याकडून confirmation अथवा आवश्यक दुरूस्ती कळवणारा मेल येईल आणि मग आपला ब्लॉग जोडला जाईल.
...."

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top