ठाणे वज़्रेश्वरी ठाणे- बुलेट सफारी.

ठाणे वज़्रेश्वरी ठाणे
बुलेट घेतल्यापसून कुठे तरी बाहेर पिकनिक ला जायचा खूप विचार चालू होता. पण तशी संधी आणि वेळ मिळत नव्हता. शेवटी 25/26 जानेवारी ची सुट्टी लागून आली त्यामुळे जवळ कुठे तरी फिरून यायाचा प्लान ठरत होता. ठाण्यापासून जवळ असलेली सगळी ठिकाणे बघून झाली होती. त्यामुळे कुठे जायचा हा प्रश्न होता. अशातच वज्रेश्वरी चे नाव समोर आले.  खूप लहान असताना म्हणजे 20 वर्षेपूर्वी वज्रेश्वरीला गेलो होतो. त्याच्या धूसर आठवणी डोळ्यासमोर होत्या. ठाण्यापासून घोडबंदर मार्गे वसई विरार करत गेलो तर गूगल मॅप प्रमाणे ते अंतर 62 किमी होते. आणि भिवंडी मार्गे अंदाजे 45 किमी होते. विचारांती असे ठरले की जाताना घोडबंदर मार्गे जायचे.

मेदुवडा सांबर 
सकाली 7.15 निघलो.. बुलेट दोन दिवसपूर्वीच सर्विस करून आणली होती त्यामुळे तो आपल्याच खुशीत चमकत होती. एकाच किक मध्ये स्टार्ट होऊन तिने आपली पसंती दर्शवली. सातशे रुपयाचे पेट्रोल घालून तिचे पोट भरून घेतले. मग तर ती अजून खुश झाली. घरातून निघताना किलोमीटर ची नोंद करून ठेवली होती....2292 किमी दाख

वत होते. सुजीतला पिक अप करून पुढे मानपाड़ा नाक्यावर जिगरला भेटलों. दोघे पण स्वेटर/जैकेट घालून आले होते. आणि मी दीड शहण्यासारखे हाल्फ़ पेक्षा पण हाल्फ़ स्लिम फिटिंग चे शर्ट घटले होते. आधी थंड हवा चांगली वाटली पण जसे शहर संपुन घोडबंदर चे जंगल चालू झाले तशी थंडीची लहर अंगातून घुसून अंगभर नाचायला लागली. मध्ये मध्ये कोवळे उन अंगावर पडले की बरे वाटत होते. घोडबंदर संपुन पुढे अहमदाबाद हायवेला लागलो. आजूबाजूचे निसर्ग बघत हॉटेल शोधायला चालू केले. नाश्ता आणि चहाची खूप गरज होती. बहुतांशी हॉटेल आणि ढाबे अजून उघडले नव्हते. एक सव्वा तासाचे रनिंग झाल्यावर एक बरयापैकी गर्दी असलेले हॉटेल दिसले. आम्ही सहसा गर्दी वालेच हॉटेल बघतों कारण तिथे ताजे अन्न मिळते. अपेक्षेप्रमाणे नाश्ता चांगला होता. मिसळ पाव, इडली वडा सांबर आणि मैसूर डोसा खाऊन एक स्पेशल चाय पिउन पोटाच्या टाक्या फूल केल्या. पण नेमके हॉटेल चा फोटो काढायला विसरलों. हॉटेल चे नाव अन्नपूर्णा- व्हेज हॉटेल.
मिसळ पाव

वज्रेश्वरी ला जायचा रस्ता
गूगल मॅप चेक केले आणि किती अंतर बाकी आहे ते बाघितले...अजून खूप पल्ला गाठायचा होता. स्पीड वाढवायचे ठरवले. पुढे गाड्या सुस्साट पळवल्या. बरेच अंतर मागे टाकल्यावर तुंगारेश्वर फाटया जवळ उजवी कडे वळून वज्रेश्वरीचा रस्ता पकड़ला. विना द्विभाजक असलेला ह्या रोड वर गाड़ी टाकताच शहरी हवा संपुन गावची शुद्ध थंडगार हवा अंगाला जाणवू लागली. ह्या रस्त्यावर बुलेट पळवायला जी मजा आली ती हायवे वर येत नाही. बुलेट सफारीचा खरा आनंद ह्या रस्त्यावर भेटला.  ह्या रस्त्याला समांतरच तानसा नदी वाहत असते त्यामुळे हवेत थंडपणा आणि वेगळाच ताजेपणा होता. मुख्य हाइवे पासून अंदाजे 14 किमी अंतर कापल्यावर गणेशपुरीला जायचा रास्ता येतो. तिथे सिद्धपीठचे दर्शन घेऊन पुढे नित्यानन्द महाराजांच्या समाधि जवळ गेलो. शिवलिंगचे दर्शन घेऊन पाण्याचे गरम कुंड बघायला गेलो. तिथे असलेली गर्दी पाहून काढता पाय घेतला. परत 2 किमी मागे येऊन वज्रेश्वरी मंदिरचा रस्ता पकड़ला. मंदिरासमोर असलेल्या छोट्या रस्त्यावर आधीच ट्राफीक जमले होते. एका हार वाल्याच्या दुकानात गाड्या पार्क करून मंदिरात गेलो. दर्शनसाठी ही भली मोठी रांग होती. देवालयाला बाहेरुन प्रदिक्षिणा घातली मंदिरच्या मागे झाड़ाखली निवांत बसलों. 

वज्रेश्वरी ला जायचा रस्ता

नित्यानंद स्वामीचा मठ

नित्यानंद स्वामीचा मठ


श्री वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थान

श्री वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिराच्या पायऱ्या 

पूजा सामानाचे दुकान 

शिवलिंग

वज्रेश्वरी देवीची मंदिर 

वज्रेश्वरी देवीचे मंदिर. 

शिवलिंग 

शिवलिंग 

शिव 

जय हनुमान

शिवलिंग 

वज्रेश्वरी मंदिराच्या पायऱ्यावरून 
निघताना मंदिराच्या बाहेरच एक पड़का वाडा होता. कधी काळी त्या वाडयाने नक्कीच वैभव पहिले असणार आज तो पडिक होऊन जीर्ण अवस्थेत उभा असला तरी त्याच्या अंगाखांद्यावर गतवैभवाच्या खाणाखुणा दिसत होत्या. तो पडिक वाड़ा पाहून उगाचच नोस्टाल्जिक झाल्या सारखे वाटले. पुढे मागे जर स्वत:चे मोठे घर कधी बनवायाला भेटले तर नक्कीच असे घर बनवेन. 

पडका वाडा 
बाजारातून लाल टप्पोरी बोरे घेतली. उसाचा रस प्यायलों आणि परतीचा रस्ता धरला. जाताना तुंगारेश्वर जंगलातून निघून भिवंडी रोड मार्गे परतायचे ठरले. देपिवली गावात मित्राचा एक प्लॉट होता तिथे एक ब्रेक घेऊन ठाण्याच्या रस्त्याला लागलो. रस्त्याची हालत अगदीचं बेकार होती. गाड़ी 30 च्या वरती पळवता येत नव्हती. एक तास गाड़ी पळवल्यानंतर एका वळणावर  एक मोठ्या वटवृक्षाच्या सावलीत विसावलो. पाणी ढोसून फ्रेश झालो. थोड़े फोटो सेशन केले आणि पुढच्या प्रवासाला लागलो.  हा रोड तुमचे 15 ते 20 किमी चे रनिंग वचावतों. पण रस्ता खराब असल्याकारणामुळे कमीत कमी पाउण तास जास्त लागतो. जस जसे तुंगारेश्वर नॅशनल पार्क मधून बाहेर येतो तस तसे भिवंडी चा औद्योगिक एरिया चालू होतो.... शुद्ध हवेतून एकदम अशुद्ध हवेत प्रवेश होतो. भिवंडीच्या ट्रक आणि टेम्पो च्या ट्राफीक मधून बाहेर पडत काल्हेर कशेली चा रस्ता पकड़ला. पुढ़च्या 20 मिनिटात ठाण्यामध्ये एका हॉटेल समोर गाड्या उभ्या केल्या....4.30 वाजले होते. हॉटेल मध्ये जेवणाचा  बंदोबस्त होईल का विचारले आणि पोट्भर जेवून घेतले.
लाल टपोरी बोरे 

उसाचा रस 

बुलेट 

वटवृक्ष 


घरापासून घरापर्यंत 128 किमीचे रनिंग केले. बुलेट सफारीचा मस्त आनंद लूटला. कॉंक्रीटच्या रस्त्यापासुन, डांबराचे, मातीचे, दगड़ाचे सगळ्या प्रकारचे रस्ते अनुभवायाला मिळाले. प्रवासचा पूर्ण आनंद घेतला.

CONVERSATION

2 comments:

  1. Mast lekh ashish...aamchi pan picnic zaali he wachun.

    ReplyDelete
  2. भन्नाट सफर
    लय भारी फोटो
    भारतात आल्यावर करावीशी वाटणारी बुलेट सफर

    ReplyDelete

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top