माकडछाप !!!

खूप दिवसांनी ब्लॉग वर परतलोय. गेले दोन महिने काहीच मनासारखे लिहायला नाही भेटले. आधी बँकेच्या जेआयबी (JAIIB) च्या परिक्षा त्यातच प्रमोशन च्या परिक्षा मग इंटरव्यूची तयारी मग रिजल्ट चे टेन्शन. ह्या सगळ्यामध्ये काही लिहायला वेळच नाही भेटला. अभ्यास करावा लागत असल्यामुळे इतरांचे ब्लॉग हि वाचता आले नाही. आता थोडे फ्री झाल्या सारखे वाटतेय. 

जेआयबी आणि बँकेच्या अंतर्गत परीक्षा एकदम आल्यामुळे सगळे लक्ष अंतर्गत परिक्षांकडे केंद्रित करावे लागले आणि जेआयबी च्या परिक्षांचे पुस्तकाचे कवर सुद्धा बघायला मिळाले नाही. पण परिक्षेला पैसे भरले होते म्हणून  परिक्षा केंद्रावर जाऊन परिक्षा देवून आलो. त्याच बरोबर बँकेची अंतर्गत परिक्षा पण दिली. मे महिना पूर्ण परिक्षा देण्यातच गेला. अंतर्गत परिक्षा तर पास झालो. जेआयबी च्या निकालांची खात्री नव्हती. तसे जेआयबी देणारे एका फटक्यात कधीच पास होत नाही अगदीच पुस्तकी किडे असणारे पहिल्या फेरीत पास होतात. बाकी सगळे तीन ते चार फेऱ्या मारताच पास होतात. मला आणि माझ्या बरोबर बसलेल्या सगळ्या मित्रांना सुद्धा आशा नव्हती. आता पुस्तकच उघडून बघितले नाही म्हटल्यावर दुसरी काय अपेक्षा असणार? आणि आज अपेक्षेप्रमाणे निकाल हि लागला. 

सर्व विषयात नापास. माझ्या बरोबरचे सगळे मित्र पण नापास. कोणीच काही अभ्यास केला नव्हता कसे पास होणार ? त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट म्हणजे सर्व नापास होणाऱ्या मित्रांमध्ये मला जास्त मार्क मिळाले.  तेव्हढेच दु:ख कमी. तसे म्हटले तर अभ्यास न करता खूप चांगले मार्क मिळाले आहेत. ५० मार्कांची पासिंग होती. आणि मला ४७, ४५ असे मार्कस मिळाले आहेत. थोडक्या मार्कांसाठी नापास झालो आहे. जरा अभ्यास करायला वेळ मिळाला असता तर पहिल्या फेरीतच पास झालो असतो. जाऊदेत...काय करणार. 

परत डिसेंबर मध्ये परीक्षा असणार आता कारणे देऊन चालणार नाही. झक मारत अभ्यास करावा लागणार आहे. असो आता परत ब्लॉग कडे वळायचे आहे. अंतर्गत परीक्षेचे निकाल तर चांगले आले आता ट्रान्स्फर ऑर्डर  यायच्या बाकी आहेत. देव करो मुंबई मध्येच पोस्टिंग मिळो.

अर्थातच ब्लॉगचे हेडिंग आणि पोस्ट ह्याच्यात काही साम्य असणे जरुरी आहे का ?



CONVERSATION

0 comments:

Post a Comment

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top