प्रथमा...

बरोबर एक वर्षापूर्वी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर भोवरा ब्लॉग चालू केला होता (नव्या नावाने). तसा ब्लॉग जुनाच आहे पण भोवरा नावाने लिखाण चालू करायला मागच्या वर्षीच्या अक्षय तृतीयाला सुरुवात केली होती. आज त्याला एक वर्ष होत आहे. ह्या एक वर्षात म्हणावी तशी प्रगती झाली नाही आहे पण जी काही झाली आहे ती समाधानकारक तरी आहे.

गेल्यावर्षी ब्लॉग चालू झाला होता तेव्हा आधीच्या ६००० पेज भेटींवर पाणी सोडावे लागले होते. मागच्या अक्षय तृतीयाला पेज काउंटर शून्यावर होते आज ही पोस्ट लिहिताना १०६८८ पेज भेटी मिळाल्या आहेत. अर्थातच त्या सुद्धा स्वत:च्या पेज भेटी ब्लॉक करून. 


ह्या एक वर्षाच्या काळात फक्त २१ ब्लॉग लिहून झाले. टार्गेट ५० चे होते. पण गेल्या ७ महिन्यात आयुष्यात झालेल्या प्रचंड उलथापालथी मध्ये मनासारखे काही लिहिताच आले नाही. अगदी मनात वेगवेगळे विषय असताना सुद्धा.

ह्या काळात लिहिलेले ब्लॉग


वरील ब्लॉगज मधील ये पब्लिक सब जानती हैसुटलो बुवा एकदा!!Some free and useful softwaresयुनियन्सचे अयशस्वी लढेएका भन्नाट माणसाचा सीव्हीहै कोई माय का लाल वगैरे सारखे ब्लॉग्ज अभ्यासपूर्ण होते. त्यासाठी आधी खूप माहिती जमा केली, खात्री केली आणि मगच लिहिले आहेत.I hate Autowalasआज ११.११.११कंडोमFirst Flashmob of Mumbaiलेना होगा जनम तुमे कई कई बार...बुढ्ढा कोन है बे? श्री स्वामी समर्थ  वगैरे ब्लॉग्ज हे दैनंदिन घडणाऱ्या घटना आणि येणाऱ्या अनुभवांवर लिहिले आहेत.

नकळत एकदा... आणि खेळ मांडियेला  हे दोन आवडते पोस्ट सत्यकथे वर लिहिले आहेत. 

खाली ब्लॉगरचे Stats पेज चे स्क्रीन शॉट लावले आहेत. कंडोम  ही आतापर्यंत सर्वात जास्त वेळा भेट दिलेली पोस्ट आहे. अर्थातच वाचकांनी वाचली असेल की नाही ते काही माहित नाही. पण पुरुष वाचक नक्कीच वाचल्या शिवाय राहणार नाही.त्या मागोमाग नकळत एकदा...  आणि ह्या गोष्टी करायच्या बाकी आहेत. पोस्ट सर्वात जास्त वाचल्या गेल्या आहेत. कंडोम  सगळ्यात जास्त वाचून सुद्धा त्याला एकही कमेंट मिळाली नाही. तर ह्या गोष्टी करायच्या बाकी आहेत. पोस्टला सर्वात जास्त १५ कमेंट मिळाल्या आहेत. १५ तसा काही जास्त आकडा नाही पण आमच्या सारख्या छोट्या मोठ्या ब्लॉगर साठी खूप आहे.

दुर्दैव एकाच गोष्टीचे वाटते की जे ब्लॉग्ज अभ्यासपूर्ण करून लिहिले आहेत त्यांना वाचकही कमी आणि कमेंट ही कमी. एक सक्षम चर्चा होतच नाही. त्यामुळे मी लिहिले आहे ते बरोबर की चुकीचे ते समजायला मार्गच नाही.

असो. अजून एक गोष्ट जाणवली म्हणजे आपले मराठी ब्लॉगर दुसऱ्यांचे ब्लॉग वाचतील भरपूर मनातल्या मनात कौतुकही भरपूर करतील. पण कमेंट लिहायला, कौतुक करायला जाम कंजुषी करतात. का ते समजत नाही? अर्थात सर्वच ब्लॉगर तसे नाहीत. 

ह्या गेल्या एका वर्षात भोवऱ्याला १० मित्र पण भेटले. त्यांचे आभार. त्यांना हा ब्लॉग वाचावासा वाटला आणि फॉलो करावासा वाटला त्याबद्दल त्यांचे आभार.

१०६८८ वाचकांचे सुद्धा आभार. कमेंट करणाऱ्या आणि न करणाऱ्या ब्लॉगरचे सुद्धा आभार. तसेच मराठीब्लोग.नेट,  मराठी ब्लॉग वर्ल्ड  मराठी कॉर्नर , मराठी सूची, मराठी ब्लॉगर्स   ह्या साईट चालवणाऱ्या मंडळींचे ही आभार अन्यथा हा ब्लॉग ह्या महाजालावरच्या कोपऱ्यात कुठे पडून राहिला असता ते समजले पण नसते. ह्या मंडळींमुळेच १० हजारी आकडा पार करणे शक्य झाले.

पुढील वर्षात २१ पोस्ट वरून कमीत कमी ७५ पोस्ट करण्याचा तरी मानस आहे. अर्थातच ब्लॉगच्या संख्येपेक्षा ब्लॉगच्या दर्जाला जास्त महत्व देईन. भारंभार ब्लॉग लिहिण्यापेक्षा मोजकेच पण चांगले ब्लॉग लिहायचा प्रयत्न करीन. 

भोवऱ्याला तुम्ही ट्विटर वर येथे, गुगल प्लस वर येथे आणि फेसबुक वर येथे फॉलो करू शकता. नक्की येथे येत राहा. भेटी देत राहा. कमेंट नाही केले तरी चालतील पण भेटी नक्की दया.

पहिल्या वाढदिवसाचा केक कापायला नक्की या!!!

धन्यवाद .....सगळ्यासाठी.!!!


CONVERSATION

0 comments:

Post a Comment

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top