आज ११-११-११


आज ११.११.११. आज काहीतरी ब्लॉग वर काहीतरी पोस्ट टाकावी असे ठरवले होते पण काहीच सुचलेच नाही. मी  मिडिया थोडीच आहे, कुठेतरी घुसून काहीतरी छोटी बातमी शोधून काढायची आणि उगाच मोठी करत...दहा दहा वेळा (आय मीन ११ वेळा) दाखवत बसायची.  गेल्या दोन/ तीन दिवसात खास असे काही घडलेच नाही. 

अण्णा काही बोलले नाहीत
दिग्विजय सिंग येड्यासारखे काहीतरी बरळले नाहीत.
ऐश्वर्याला बाळ झालेच नाही.
सचिन चे महाशतक झालेच नाही
अजित पवार आणि राज ठाकरे दोघेही शांत होते.
दहशतवादी पण सुट्टीवर गेलेत.
रिक्षावाले पण संपावर नाहीत.
रेल्वे पण रुळावर चालली आहे.
शिवसेनेचा ढाण्या वाघ पण गुहेत विश्रांती घेतोय.
बिग बॉस मध्ये (जे मी कधी बघत नाही) तिथेही बहुतेक डॉली बिंद्रा नाही आहे बहुतेक.
रा-वन वर कमेंट करण्यासारखे काहीच नाही

बोलता बोलता ११ कारणे पण लिहून झाली. (मोजून बघा..मी पण मोजली) मग म्हटले जाऊदेत...काही लिहिण्यासारखेच नाही. उगाच ओढून ताणून कशाला स्वत:ला आणि वाचकांना त्रास द्यायचा. पुढच्या वर्षी १२-१२-१२ येईल तेव्हा काहीतरी लिहूया.

Totally Confused....





Confused Bhovra




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या