बुलेट ट्रीप-२ अंबरनाथ

अंबरनाथ शिवमंदिर
मागची बुलेट पिकनिक यशस्वी झाल्यावर परत पुढच्या संडेला पण जायचे ठरले होते. ह्या वेळेस अंबरनाथ चे शिवमंदिर बघायचे ठरले. खूप वर्षापूर्वी अंबरनाथचे मंदिर बाघितले होते. खूप दिवस दर्शनची इच्छा होती. जिगर आणि सुजीतचा ओके आला आणि जायचे ठरले. ह्यावेळेला एक नवीन मेंबर होता...मिलिंद. सकाळी लवकर निघण्याएवजी आम्ही थोड़े उशिरा 8.30ला निघायचे ठरवले. पण सगळे भेटून, पेट्रोल भरून निघेपर्यंत साड़े नऊ वाजले. मुंब्रा बायपास पकड़त खिड़कली मार्गे निघलो. पाउन तास गाड्या पळवल्यानंतर पोटाची व्यवस्था बघण्यासाठी होटल शोधायला लागलो.
नवीन मेंबर मिलिंद
अंबरनाथ फाट्या जवळ एक होटल निसर्ग जरा बरे वाटले...गाड्या पार्क केल्या आणि हॉटेल मध्ये बसलों. मोठी टिकली आणि अंगभार दागिने घातलेली एक बाई काउंटर वर बसली होती. तिच्या एकंदर पोशखावरुन ती आगरी असावी असे वाटले. खुर्चीत बसून मिनिटे झाली तरी वेटर ने पाणी आणून दिले नाही. त्याबरोबर तिने तोंड उघडून आतल्या पोऱ्याला गावठी शिवी घातली आणि पाणी आणून द्यायला सांगितले. तिच्या आवाजावरून आणि भाषेवरून पक्के झाले की ती आगरी होती. मनात विचार आला इथला नाश्ता एकदम झणझणित असणार.

पोऱ्याला विचारले ताजे आणि गरम काय आहे..तो म्हणाला बटाटा वडावडा उसळ...मिसळपाव... त्याला तिथेच थांबवून वडा उसळ आणि मिसळपाव आण्याला सांगितले. एक प्लेट वडा उसळ आणि मिसळपाव खाऊन पोट तुडुंब भरले. एकेक कप स्पेशल चाय ढोसून आम्ही पुढच्या प्रवासाला निघलो. अर्ध्या तासात अंबरनाथ गावात पोहोचलों. शिवजयंतीची मिरवणुक निघाली होती त्यामुळे रस्त्यावरची वाहतूक फिरवली होती. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.


गरमागरम वडा उसळ सोबत एक्स्ट्रा रस्सा

वडा उसळ

झणझणीत मिसळ पाव 

गरम स्पेशल चाय
रस्ता विचारत विचारत मंदिरात पोहोचलों. मंदिर बघून मन तृप्त झाले. मंदिराचा जास्त इतिहास इथे लिहीत नाही...तो विकिपेडिया वर वाचता येईल. मंदिरात फोटो काढायला परवानगी नाही. बाहेरून काढलेले फोटो इथे देत आहे. 


भोलेनाथचे दर्शन करून बाहेर कट्ट्यावर बसून मंदिरच्या कलेचा आस्वाद घेत आराम केला आणि परतीच्या प्रवासला लागलो. येताना वाटेत मस्त रसरशीत कलिंगड च्या दुकानात थांबलो मस्त पोट भर कलिंगड खाल्ले वर एक थंडगार नीरा प्यायलों. आणि गाड्या सुसाट पळवत परत ठाण्यामध्ये आलो 

अंबरनाथ शिव मंदिर 

शिव मंदिर 

शिवमंदिर 

शिव मंदिरावरील कलाकुसर

शिव मंदिरावरील कलाकुसर

Add caption

शिव मंदिरावरील कलाकुसर

शिव मंदिर 

शिवजयंती निमित्ताने निघालेली मिरवणूक - मावळा 

शिवजयंती निमित्ताने निघालेली मिरवणूक  


शिवजयंती निमित्ताने निघालेली मिरवणूक


शिवजयंती निमित्ताने निघालेली मिरवणूक

मुंब्रा डोंगराखाली घेतलेला एक ब्रेक

निसर्ग निर्मित उत्तुंग कडा आणि मानव निर्मित अप्रतिम बुलेट


एक सेल्फी निरा विक्रेत्या बरोबर 

कलिंगड 

एक सेल्फी हॉटेल मध्ये


परतीच्या प्रवासात



आता पुढच्या बुलेट ट्रीप च्या तयारीला.....
एक स्लेफी तो बनती है 




CONVERSATION

3 comments:

  1. ब्लॉग आवडला. तुमचा ईमेल आयडी मिळू शकेल का?

    ReplyDelete

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top