इम्पोर्टेड सीतामाई?

काही दिवसापूर्वी आपल्या एका नेत्याने एक अप्रतिम शोध लावला होता..सीतामाई हि इम्पोर्टेड अर्थात परकीय देशातून आली होती आणि जर त्यांना तुम्ही मानता तर आमच्या मॅडमला का नाही?

अतिशय कीव वाटली त्या हुशार माणसाची. त्याने कदाचित प्राचीन भारताचा अभ्यास केला नाही वाटते.
त्यांना म्हणावे भारतवर्ष अगदी इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान पासून वर चीनचा काही प्रदेश समावेश करून अगदी रशिया पर्यंत पोहोचला होता. तर इकडे नेपाल भूतान म्यानमार पर्यंत पसरला होता. असेही म्हटले जाते की वेदांची निर्मिती अफगानिस्तानच्या डोंगररांगात झाली होती.

तरी नशीब त्यांनी उदाहरण दाखल सीतामाईचा उल्लेख केला. पतिव्रता, त्यागी गांधारीचा उल्लेख नाही केला (ती पण गांधार देशातून म्हणजे आताच्या अफगाणिस्तानातून आली होती ना)

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top