I hate Autowalas


Really I hate Auto-walas....

मागे एका रिक्षावर लिहिले होते की ए नाही ओ रिक्षावाले म्हणाखरच कधी त्यांना आदराने 'ओ रिक्षावालेम्हणावेसे वाटते काय?

मला रिक्षावाले जराही आवडत नाही आणि त्यांना आदराने म्हणावेसे तर कधीच नाही.
051120072100-1
Auto Meter
कारणं अनेक आहेत...तरी सुद्धा जास्तीत जास्त ह्या कारणामुळे आवडत नाहीत.
  1.  ९०% रिक्षावाले कुठे येतो का विचारले कि सरळ नाही बोलतात.
  2. त्या ९० टक्क्यातील ९९ टक्के रिक्षावाले तोंडाने नाही सुद्धा बोलत नाही. ऐकल्यान ऐकल्या सारखे करत पुढे निघून जातात. जसे काही आम्ही भिकच मागत आहोत. काही जण तर सरळ पुढच्या रिक्षाकडे बोट दाखवतात जसे भिकाऱ्याला सांगितले जाते....'आगे जाव भाई'
  3. ७०% रिक्षावाले मीटर मध्ये फेरफार करतात आणि ग्राहकांकडून जास्त पैसे उकळतात.
  4. गरोदर स्त्री, म्हातारे, वयस्क, अपंग, आंधळी व्यक्ती, शाळेत जाणारी मुले, परीक्षेसाठी घाई करणारे विद्यार्थी, इंटरव्यू साठी जाणारे तरुण, हॉस्पिटलला जाणारे आजारी लोक, घाईत असणारे चाकरमानी .....कोणी कोणीही असोदेत. ह्या सगळ्यांना नाही बोलायचं हक्क ह्या रिक्षावाल्यांना आहे.
  5. जवळची भाडी नाकारायची असतात असा ह्यांचा अलिखित कायदा आहे.
  6. जरा पाउस पडला आणि रस्त्यावरून थोडे जरी पाणी वाहायला लागले तरी हे लोक डबल चार्ज लावतात, असे  का? तर 'उधरको बहोत पाणी भरा है कोई रिक्षावाला जा नाही रहा हैमे जा रहा हु... आपको चलना है तो बोलो....' प्रत्यक्ष्यात तेथे गेल्यावर काहीच पाणी नसते. विचारले तर सांगतात 'अरे अभी बारीश कम हुवा है बेह गया रहेगा.'.......खोटारडे कुठचे !!!
  7. सिग्नल कधीच मानत नाही. लाल सिग्नल ला तोडून पुढे गाडी पळावयाची हा त्यांचा मुलभूत अधिकार असतो.
  8. ह्या लोकांचे डाव्या बाजूला जायचे, उजव्या बाजूला जायचे इंडिकेटर कधीच चालू नसतात. गाडी उजव्या किंवा डाव्या बाजूला वळवताना हे लोक कधीच सिग्नल देत नाही आणि मागून येणारा ठोकला कि त्याच्यावरच दादागिरी करायला मोकळे...'क्या बे अंधा है क्या? देख कर नही चला सकता है...ये नुकसान कोन तेरा बाप भरके देगा ?'
  9. काही रिक्षावाले हात दाखवतील पण अगदी त्यांच्यापुरताच. मागून येणाऱ्याला कधीतरी चुकून माकून हाताची चार बोटे दिसतात. त्यावर समजून घ्यायचे कि बाबा ह्यांना ह्या बाजूला वळायचे आहे.
  10. ब्रेक मारल्यावर येणारा लाल इंडिकेटर (ब्रेक लाईट) ह्यांचा कधीच चालू नसतो.
  11. बसरेल्वे बंद झाली कि ह्यांची समाजसेवेची तळमळ दिसून येते.  १ / २ किलोमीटरच्या अंतरावर तर ते कधी येत नाही आणि आले तरी कमीत कमी शंभर रुपये घेतात. मुंबई मध्ये बेस्ट बस किंवा रेल्वेचा संप किंवा रेल्वेच्या सेवेत काही बिघाड असेल तर ह्या लोकांची दिवाळीच असते. मीटर सगळे गुंडाळून ठेवले जातात. मनाला येईल तसे भाडे आकारले जाते. अश्या वेळेला शेरिंग करायला पण देत नाहीत.
  12. ह्यांच्या युनियन्स फक्त ग्राहकांशी आणि वाहतूक विभागाशी भांडायलाच असतात. रिक्षावाल्यांना कधीच सौजन्यनियम शिकवत नाही.
  13. अर्ध्याहून जास्त रिक्ष्यावाल्यांकडे कायदेशीर परवाना आणि रिक्षा चालवायचे लायसन्स नसते. कितीतरी बोगस रिक्षा आणि त्यांचे लायसन्स बनवले जातात.
  14. ट्राफिकचे नियम हे तोडण्यासाठीच बनवलेले असतात अशी ह्यांची सर्वसाधारण भावना असते. चुकीच्या बाजूने रिक्षा चालवणे, रिक्षात तीन ऐवजी ६ माणसे बसवणे (ड्रायवर सोडून), वन वे मध्येच उलटी रिक्षा घुसवणे, सिग्नल तोडणे, मीटर मध्ये फेरफार करणे, जास्त भाडे आकारणे ह्या सर्व गोष्टी त्यांचे मुलभूत हक्क असल्यासारख्या बजावल्या जातात.
  15. रात्री बारा नंतर जर तुम्ही रिक्षा पकडली असेल तर नेहमीच्या भाड्यापेक्षा थोडासाच चार्ज जास्त लावायचा असतो. वाहतूक खात्याने दिलेल्या मीटर कार्ड वर पण फक्त जास्तीत जास्त दीड पट भाडे असते. पण हे आपल्याला मीटर कार्ड  दाखवता डबल चार्ज मारतात.
  16. ह्यांच्या कडे सुट्टे पैसे कधीच नसतात. जेव्हा किमान भाडे ९ होते तेव्हा दहाची नोट दिल्यावर हे लोक १ रुपया सुट्टा नाही म्हणून सांगत १ रुपया ठेवून घ्यायचे पण किमान भाडे ११ रुपये झाल्यावर तेच रिक्षावाले हक्काने १ रुपया मागून घ्यायला लागले. आपण सुट्टे नाही आहेत सांगितले तर बडबडायला सुरुवात करतात. १ रुपया साधा ठेवता येत नाही का ? ......अजबच न्याय ह्यांचा.
  17. शासनाने आणि वाहतूक खात्याने सर्व रिक्षा आणि टॅक्सी ह्या सीएनजी वर करायला सांगितल्या आहेत. तरी काही रिक्षावाल्यांनी अजून आपल्या रिक्षा सीएनजी वर केल्या नाहीत. ज्यांच्या गाड्यांवर पेट्रोल किंवा सीएनजी वर आहेत त्यांनी तसे मोठ्या अक्षरात रिक्षावर लिहायचे असते पण हे लोक सीएनजी लिहित नाही आणि पेट्रोल अगदी छोट्या अक्षरात कुठेतरी कानाकोपर्‍य़ात लिहिलेले असते. भाडे आकारताना ते पेट्रोलचे वेगळे मीटर कार्ड दाखवून जास्त भाडी आकारतात.
  18. सध्या जास्तीत जास्त रिक्षा सीएनजी वर केल्या आहेत. पण सरकार जेव्हा फक्त पेट्रोलचेच भाव वाढवते  तेव्हा ह्यांच्या युनियन्स रिक्षाचे भाडेवाढ का करायला सांगतात हेच मला समजत नाही.
  19. ऑफिस किंवा घरी जाताना आपण कोणाबरोबर रिक्षा शेरिंग करून जात असेल तर त्यांना चालत नाही. ते एकाच माणसाला बसवतात किंवा सरळ भाडे नाकारतात. अगदी आपण मीटर प्रमाणे पैसे दयाला तयार असेल तरीही.
  20. जेव्हा त्यांची दिवसभराची कमाई झाली नसेल तेव्हा स्वत:च आपल्या बाजूने रिक्षा घासत नेतील. बस स्टॉप वर मुद्दाम बस उभी करायच्या जागेवर रिक्षा आणून उभ्या करतील. जेणेकरून बस वाल्यांचे अधिकच फावते. थांब्यावर बस उभी केल्यासारखे करून डबल बेल मारून बस पळवून घेऊन जातात.
  21. हे ग्राहकाची वाट बघत जेव्हा उभे असतात तेव्हा टाईमपास व्हावा म्हणुन हे पान,गुटखा खात बसतात आणि रस्त्यावर थुंकुन रांगोळी काढतात. एखाद्या ठिकाणी थुंकून चिखल झाला असेल तर समजून जायचे हे कोणी केले असेल ते.
  22. हे रिक्षावाले आतमध्ये तीन चार तरी छोटे मोठे आरसे लावतात जेणेकरून मागच्या सीटवर बसलेल्या  सुंदर तरुणींना न्याहाळता येते, तसेच तरुण जोड्यांचे चाललेले प्रेमाचे चाळे सुद्धा चोरून बघता येते. ह्यात अगदी म्हातारे, आंबटशौकीन रिक्षावाले पुढे असतात. पण हे करत असताना त्यांचे अर्धे लक्ष मागे सीटवर चाललेल्या रोमान्स कडे असते आणि रस्त्यावर कमी असते. परिणामी अपघात होण्याचे चान्सेस जास्त असतात. ह्यात रिक्ष्यावाल्याचे, प्रवाशांचे आणि रस्त्यावरच्या वाहतुकीचे सर्वांचेच प्राण धोक्यात असतात. त्यांना हे समजत नाही.mindless mumbai-1
  23. हे सर्वात जास्त चाप्टरगिरी कधी करतात, जेव्हा आपण आपल्या ठिकाणावर थांबतो आणि त्याला विचारतो की बाबा किती रुपये झाले. तर ते मुद्दाम इकडे तिकडे बघत बसतात किंवा रिक्षाचे  गियर अँड्जस्ट करत बसतात आणि दाखवतात की रिक्षा बंद करायचा प्रयत्न करतोय. तो पर्यंत आपण पैसे काढून देणार मग ते आपल्या फुरसती प्रमाणे वळून रिक्षाचे मीटर बघणार तोपर्यंत मीटर मध्ये एक आकडा पडलेला असतो आणि आपण दिलेले पैसे ठेऊन वर अजून दोन रुपये द्या, अमुक अमुक झाले म्हणून सांगतील.
  24. आपण कधी जवळच्या रस्त्याने जायला सांगितले तर सांगतील की तो रस्ता खराब आहे किंवा तेथे काम चालू आहे किंवा त्या रोडला ट्राफिक आहे,मी आता तेथूनच आलो आहे वगैरे वगैरे. मुद्दाम लांबच्या रस्त्याने घेऊन जातील. जर तुम्हाला एरिया किंवा रस्ता माहित नसेल तर मग विचारूच नका.
  25. गरोदर स्त्री, वयस्कर माणूस, आजारी व्यक्ती जर कोणी रिक्षात असेल आणि आपण रिक्षा खड्डे, स्पीडब्रेकर सांभाळून हळू चालवायला सांगितली तरी हळू चालवणार नाहीत. आपण सांगितले तर म्हणतील अहो हे रस्तेच खराब आहेत अजून किती हळू चालवणार ?
  26. जर कधी आपल्याला घाई असेल तर नेमका हळू चालवणारा म्हातारा रिक्षावाला भेटेल जो गाडी २० किमीच्या वर पळवणार नाही आणि आपल्याला हमखास उशीर होणार. रिक्षाची हालत ही अशी असेल की चौथ्या गियरवर सुद्धा ती २० किमीच्या वर पळू शकणार नाही.
  27. आता आता तर काही रिक्षावाल्यांची तर ग्राहकांना मारण्याची व वाहतूक पोलिसांना जाळण्यापर्यंत  मजल गेली आहे. हे तर अतीच आहे.
tn (1)-1
अशी एकाहून एक कारणे आहेत त्यांचा राग करायला. ह्या सगळ्या रिक्षावाल्यांना ताळ्यावर आणण्यासाठी देवबाप्पा  आपल्या सरकार आणि वाहतूक खात्याला चांगली बुद्धी आणि ताकत देवो.



(टीप: अर्थात काही रिक्षावाले ह्याला अपवाद असतात. काही रिक्षावाले खरच खूप चांगले असतात. त्यांच्यात माणुसकी, समाज भावना आणि आपुलकी अजून शिल्लक आहे. त्यामुळेच बाकीचे वाचतात. अश्या सर्व चांगल्या रिक्षावाल्यांना सलाम)







CONVERSATION

7 comments:

  1. रिक्षेवाल्यांमुळे.... रिक्षा समोर रागाने गरगरलेला भोवरा...:)
    लेख मस्त झालाय..........................

    mynac

    ReplyDelete
  2. आशिष,
    माहित नाही पण तुझा भोवरा फिरायला,गरगरायला खूप वेळ लागतो..... आय मीन .. ब्लॉग स्क्रीन वर व्हिजिबल व्हायला खूपच वेळ घेतो... इतर ब्लॉगचे मुख्य पान लगेच ओपन होत असते.. थोड बघशील का ? धन्यवाद...

    ReplyDelete
  3. दादा लेख मस्तच झाला आहे. ह्यातील बरेसे अनुभव मी देखील घेतले आहेत.

    ReplyDelete
  4. Mynac
    तुझ्या दोन्ही कमेंट बद्दल आभार. तुझ्यासारख्या कट्टर पुणेरी माणसाकडून मिळणाऱ्या कमेंटला खरच महत्व असते.
    पेज लोडिंग बद्दल म्हणशील तर ते ब्राउजरचे वर्जन तसेच नेट स्पीड वर अवलंबून आहे. मी सर्व ब्राउजर मध्ये आणि वेगवेगळया स्पीड वर ट्राय करून बघितले. सहसा ऑफिस मध्ये जेथे एकाच नेट कनेक्शन वर खूप कनेक्शन दिले असतात तेथे थोडा लोड व्हायला वेळ लागतो. घरच्या पीसी वर लवकर लोड होते. IE7 पेक्षा कमी ब्राउजर असेल तरी लोड हळू हळू होतो. तरीसुद्धा मी काही विजेट्स कमी करता येतात का ते बघतो.

    तसेच ब्लॉग चे हेडिंग चित्र हे दुसऱ्या साईट वर टाकले आहे कारण त्या साईज चे चित्र पिकासा मध्ये टाकले की ते आपोआप कमी साईज मध्ये परावर्तीत होते आणि बरोबर दिसत नाही...
    पण तरी सुद्धा काही दुसरा पर्याय आहे का ते बघतो....
    धन्यवाद असच भेट देत राहा.

    ReplyDelete
  5. @श्रीकांत
    अरे आपल्या सारखे सामान्य माणूस आणि त्यांचे अनुभव इथून तिथून सारखेच.

    ReplyDelete
  6. @Anonymous

    धन्यवाद, ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल. नाव सांगितले असते तर बरे झाले असते.

    ReplyDelete

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top