First Flashmob of Mumbai

२७ नोव्हेंबर २०११ ह्या दिवशी मुंबई ने पहिला फ्लॅशमॉब अनुभवला. कदाचित देशातला हा पहिलाच फ्लॅशमॉब होता.  फ्लॅशमॉब संकल्पना मुळची अमेरिकेतली. फ्लॅशमॉब म्हणजे अचानक काही मॉब (माणसांचा समूह) एकत्र येतो आणि काहीतरी नाच गाणे करून दाखवतात. दोन मिनिटे नाच गाणे चालते आणि अचानक ते संपल्यावर सर्वजण आपापल्या कामाला निघून जातात जसे काही घडलेच नाही. फ्लॅशमॉब मध्ये काय करायचे आणि कुठल्या संगीतावर नाच करायचे हे बहुदा ठरवलेले असते. नाच चांगला निर्देशन (choreograph)  करून बसवलेला असतो तर कधी कधी अचानक कुठलेही गाणे लावून नाच केला जातो. 

भारतात  ही संकल्पना अजून आलेली नव्हती. पण २६/११ च्या शहिदांना श्रद्धांजली देण्यासाठी २३ वर्षीय मुलगी शोनान कोठारी ह्या मुलीने पहिलावहिला फ्लॅशमॉब आयोजित केला होता. चक्क रेल्वेने आपली प्रसारण/घोषणा  व्यवस्था (announcement system) ह्या फ्लॅशमॉब  साठी वापरायला दिली होती. संध्याकाळी पाच च्या सुमारास लोकांना गाडीची घोषणा ऐकू येण्याऐवजी रंग दे बसंती चे शीर्षक गीत ऐकू यायला लागले. अचानक एका मुलीने नाच करायला सुरुवात केली तिच्या बरोबर अजून एक मुलगी तिला सोबत द्यायला आली आणि असे करत करत ४ ते ६० वयोगटातील जवळपास दोनशे च्या वर लोकांनी ह्यात सहभाग घेतला. गाणे पूर्ण वाजवले गेले आणि संपल्यावर सर्व जण आपापल्या रस्त्याने निघून गेले. जसे काही झालेच नाही.लोकांना काय झाले ते नेमके समजलेच नाही. 

जपान सारख्या काही देशांमध्ये ही संकल्पना करमणुकी बरोबर शरीराचा व्यायाम करण्यासाठी सुद्धा वापरली जाते. ऑफिस मध्ये काम करत असताना अचानक सार्वजनिक  घोषणा यंत्रावर एखादे संगीत अथवा कसरतीचे संगीत लावले जाते. सर्वजण आपापली कामे सोडून उठतात अगदी महत्वाची मिटींग असली तरी सर्व जण उभे रहातात. ठरवलेली कसरत करतात आणि संगीत संपल्यावर काही झाले नाही अश्या अविर्भावात काम चालू करतात. नवीन माणूस कोण असेल तर त्याला हे समजतच नाही की हे काय चालले आहे. दिवसभर बसून शरीराला व्यायाम मिळत नाही तो मिळावा म्हणून फ्लॅशमॉबचा उपयोग केला जातो.

काही देशात ह्या फ्लॅशमॉबवर बंदी घातलेली आहे. सार्वजनिक जागेचा गैरवापर होऊन काही अघटीत घडू नये म्हणून कायद्याने ह्यावर बंदी घातली गेली आहे.तसेच ह्याचा उपयोग काही दंगे करण्यासाठी होऊ नये अशीही अपेक्षा होती. काही महिन्यापूर्वी लंडन मध्ये अश्याच फ्लॅशमॉबने खूप दंगे झाले होते.  हे सगळे लोक अचानक एखाद्या मॉल अथवा मार्केट मध्ये जमायचे आणि ठरल्या वेळेवर दंगे करायचे  आणि सर्व मॉलची नासधूस करून निघून जायचे. ह्यात श्रीमंतपासून अगदी गरीब लोक पण सामील असायचे.  ह्यांचा उद्देश फक्त चोरी करण्याचा नसतो तर फक्त एकत्र येऊन एकजूट दाखवायची आणि आपली करमणूक करून घ्यायची.

फ्लॅशमॉब कसा आयोजित केला जातो?
हा सहसा इमेल्स पाठवून, किंवा फेसबुक, ओर्कुट सारख्या सोशल नेटवर्किंग च्या साईट वर ठरवला जातो. कधी कधी मोठ्या कंपनी आपल्या उत्पादकांची जाहिरात करण्यासाठी अश्या फ्लॅशमॉबला प्रायोजित करतात. कधी कधी नाच शिकवणाऱ्या नृत्य निर्देशाकाला (Dance director/choreographer) हाताशी धरून त्याच्या नृत्यशाळेतले शिकाऊ मुलांना घेऊन केले जाते. तसे आयोजित करायला सोपे पडते.

बघू आपल्या देशातही ह्याची सुरुवात झाली आहे. आपल्या देशात फ्लॅशमॉबचा उपयोग चांगल्या कामासाठी होईल अशी आशा आहे. खाली मुंबईत झालेल्या पहिल्या फ्लॅशमॉबचा व्हिडियो जोडत आहे. नक्की बघा.













CONVERSATION

5 comments:

  1. yala yedya patha natya maharashtrat manatat,kalale

    ReplyDelete
  2. अच्छा असं हाय होय...मला वाटल तिथे कनीमोळीला सोडलं म्हणून नाचत होते की काय...:)
    असो माहिती उपयुक्त आहे पण या प्रकाराने नक्की काय साधता येईल हे जरा डोक्याच्या पलीकडे आहे..म्हणजे एकत्र येऊन नाच करण जितक चांगल तितकाच एकत्र येऊन समजा जर त्याच सीएसटी स्थान्कावारचा थोडा कचरा (नाचत नाचत का होईना) उचलला तर जास्त उपयुक्त होईल आणि बघ्यांना पण थोडी समज येईल..बाकीच्या देशात का करतात माहित नाही पण आपण आपल्या देशात जे work out होईल असंही काही करूया...:)

    ReplyDelete
  3. चांगले सजेशन आहे अपर्णा!!
    आपल्यापर्यंत कधी फेसबुक द्वारे FlashMob ची रिक्वेस्ट आली की आपण नक्की हा प्रयत्न करून बघुया..
    ब्लॉग वर स्वागत आणि कमेंट दिल्याबद्दल धन्यवाद

    ReplyDelete
  4. @ Delhi Dude of Marathi Origin
    धन्यवाद अर्सी

    ReplyDelete

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top