Some free and useful softwares

Some free and useful softwares
काही उपयुक्त पण फुकट सॉफ्टवेअर

इंटरनेटवर नवीन सेवा देणाऱ्यांमध्ये तीन प्रकारच्या पद्धती असतात. एक पेड सर्विसेस (Paid Services), दुसऱ्या ओपन सोर्स (Open Source) आणि तिसरी पद्धत कोड ब्रेकर (Code breaker). ज्या पेड सर्विसेस असतील त्यांचा कोड ब्रेक करून तुम्हाला फुकट मध्ये उपलब्ध करून द्यायचे. 

पेड सर्विसेस चे सर्वात जवळचे उदाहरण म्हणजे मायक्रोसोफ्टचे एमएस ऑफिस  (MS-Office), ऍडोब चे फोटोशॉप इ. हे सर्व सॉफ्टवेअर बनवण्यास काही खर्च येत असतात तसेच त्यांच्यामध्ये असलेल्या युनिकनेस मुळे  ह्या सर्विसेस फुकट न मिळता काही पैसे देऊन विकत घ्यावे लागतात. 

ओपन सोर्सचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे गुगल तर्फे देण्यात येण्याऱ्या सर्विसेस, ब्लॉग, पिकासा,जीमेल वगैरे. काही कंपनी ह्या सॉफ्टवेअर बनवण्यासाठी लागणारा खर्च जाहिरातीद्वारे, डोनेशनद्वारे किंवा अन्य मार्गाने वसूल करत असतात त्यामुळे हे सॉफ्टवेअर आपल्याला फुकट उपलब्ध असतात. 

आणि तिसऱ्या पद्धतीत असे लोक असतात ज्यांना वाटत असते की इंटरनेटवर मिळणाऱ्या सर्व सर्विसेस फुकट असाव्यात. त्यामुळे ही लोक पेड सर्विसेस बनवणाऱ्या सर्व सॉफ्टवेअरचे कोड ब्रेक करून इंटरनेट वर विविध वेबसाईट वर टाकत असतात. ह्याचे जवळचे उदाहरण म्हणजे तुमच्या कम्प्युटर मध्ये असलेले मायक्रोसोफ्ट चे वर्ड आणि एक्सेल. मला नक्की खात्री आहे की जवळपास ७० टक्के लोक पायरटेड एमएस-ऑफिस वापरत असतात. इंटरनेट वर असणारे नवीन नवीन सिनेमास, नवीन सिनेमाची एमपी थ्री (MP3) गाणी हे सगळी ह्या लोकांची करामत असते. तसे म्हटले तर इंटरनेट वर जेवढे पहिले दोन ग्रुप महत्वाचे आहेत तेव्हढाच हा ग्रुप ही महत्वाचा असतो. जर हा ग्रुप नसता तर मायक्रोसोफ्ट ने MS-Office ची किंमत कमीत कमी वीस हजारावर नेवून ठेवली असती. ह्या कोड ब्रेकर ग्रुप मुळेच त्यांना किंमत कमी करावी लागते जेणेकरून लोक विकत घेण्याचे विचार करतील. उदाहरणादाखल तुम्ही "microsoft serial number" असे गुगल मध्ये शोधून पहा. कमीत कमी ५ करोड तरी रिजल्ट येतील. फोटोशॉप, कोरल ड्रॉ सारखे महागडे सॉफ्टवेअर ज्यांची किंमत कमीत कमी वीस हजाराच्या वर असते. त्यांच्या सीडीज आपल्याला स्टेशन वर १०० रुपयात  उपलब्ध असतात. त्या सुद्धा त्यांच्या सिरिअल नंबर ब्रेक करून.  अर्थातच हा नवीन सॉफ्टवेअर किंवा नवीन प्रोडक्ट बनवण्यार्‍यांवर किंवा त्यांच्या रचनात्मकतेवर, क्रियेटीविटीवर (Creativity) एक प्रकारे अन्यायच असतो. 

पण हे असेच चालू राहणार. कदाचित ह्या ग्रुपचे अस्तित्वच वरील दोन ग्रुप मध्ये समतोल साधायचा प्रयत्न करतो.

असो !! ह्या पोस्ट मध्ये मी काही असेच ओपेन सोर्सचे, चकटफू सॉफ्टवेअरची माहिती देणार आहेत. हे खाली दिलेले सॉफ्टवेअर मी स्वत: वापरले आहेत आणि काही अजून वापरतोय सुद्धा. तरी तुम्ही सर्व माहिती करून घेतल्यावरच हे सॉफ्टवेअर डाउनलोड करा अथवा वापरा.
---------------------------------------------------------------------------------------

हे सॉफ्टवेअर तुमच्या पीसी मधील साफसफाई करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे सॉफ्टवेअर आहे. वापरायला अत्यंत सोपे असलेले हे सॉफ्टवेअर तुमच्या नको असलेल्या कुकीज, टेम्प फाईल्स, हिस्ट्री, टेम्प इंटरनेट फाईल्स वगैरे नको असलेला कचरा एका क्लीक वर साफ करते.
ह्यासॉफ्टवेअर मध्ये तुमची विंडोजची रजिस्ट्री (Registry) जर खराब झाली असेल तर ती सुद्धा काही प्रमाणात दुरुस्त होते. पण हे करण्याआधी रजिस्ट्रीचा बॅकअप घेणे नेहमीच चांगले.
ह्या सॉफ्टवेअरचा अजून एक चांगला उपयोग म्हणजे तुम्ही कितीतरी सॉफ्टवेअर तुमच्या पीसी मध्ये टाकता. त्यातले अनेक सॉफ्टवेअर आपोआप तुमच्या क़्विक लौंच (Quick Launch) मध्ये आणि स्टार्ट अप (Start Up) मध्ये जाऊन बसतात. जेव्हा तुम्ही पीसी चालू करतात त्यावेळी हे सर्व प्रोग्राम चालू होत असतात आणि त्यामुळे तुमचा पीसी स्लो होतो आणि चालू व्हायला वेळ लागतो. असे नको असलेले सॉफ्टवेअर निघता निघत नाहीत. अश्या चिपकू सॉफ्टवेअरसाठी सी-क्लीनर चांगले आहे. ह्याच्या टूल्स (Tools) वर क्लिक करून स्टार्टअप  (StartUp) वर क्लिक करायचे आणि नको असलेले सॉफ्टवेअर काढून टाकायचे. येथून डिलीट केलेले सॉफ्टवेअर हे तुमच्या पीसी मधून डिलीट होत नाहीत तर फक्त स्टार्टअप मधून डिलीट होतात परिणामी तुमचा पीसी लवकर बूट होतो. ह्याच्याच वरती Uninstall चे बटन आहे तेथून नको असलेले प्रोग्राम डिलीट करता येतात. (Startup किंवा Uninstall मधून डिलीट करताना योग्य ते प्रोग्रामच डिलीट करा अन्यथा एखादी विंडोज किंवा सिस्टीम ची फाईल चुकून डिलीट झाली तर पीसी चालू होणार नाही.) अजून ही भरपूर फायदे आहेत ह्या सॉफ्टवेअरचे. तुम्ही इंस्टॉल केले की तुम्हाला समजतीलच.
हे सॉफ्टवेअर तुम्ही इथे डाऊनलोड करू शकता.
---------------------------------------------------------------------------



तुमच्या डिजिटल इमेजेस साईज मोठ्या असल्या तर लोड व्हायला वेळ लागतो. एकेक फोटो बघायला कंटाळा येतो. ह्या इमेजेस फटाफट लोड करून बघायचे असेल तर इरफान व्ह्यू हे खूप चांगले सॉफ्टवेअर आहे. ऑस्ट्रियातील एका तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअर ने बनवलेले हे सॉफ्टवेअर खुपच हलके आणि वापरायला सोपे आहे. जवळपास सर्व प्रकारच्या इमेज फाईल्सला हे सपोर्ट करते. विंडोज च्या कुठल्याही वर्जन मध्ये हे चालते.  इमेज उघडण्यापासून त्यात बदल करणे, वेगवेगळे इफेक्ट्स देणे, डेस्कटॉप वर फोटो लावणे, चित्र कृष्ण धवल मध्ये बदलणे वगैरे सारखे खूप फायदे ह्या सॉफ्टवेअर मुळे मिळतील. ह्या साईट वर मिळणारे प्लगइन डाउनलोड करून तुम्ही त्यांचा चांगला उपयोग करू शकता.







---------------------------------------------------------------------------

पिकासा नावाच्या महान चित्रकाराच्या नावावर बनवलेले हे सॉफ्टवेअर गुगलच्या मालकीचे आहे. गुगलचा एकच फंडा आहे जे काही बनवायचे ते पीसी साठी एकदम हलके असले पाहिजे, वापरायला आणि लोड व्हायला सोपे असले पाहिजे आणि फुकट असले पाहिजे. पिकासा त्या सर्व गोष्टी पूर्ण करते. मोठमोठ्या इमेजेस ते सहजच लोड करते आणि त्या बरोबर दिलेले crop, straighten, I'm feeling lucky, contrast, color, retouch  वगैरे सारखे खूप विकल्प पण  आहेत. सोपे फोटो एडिटिंग आणि वेगवेगळे ईफेक्ट देण्यासाठी हे खूप छान सॉफ्टवेअर आहे. 
हे सॉफ्टवेअर तुम्ही इथून डाउनलोड करू शकता.
---------------------------------------------------------------------------------------


आजकाल आपण इंटरनेट वरून खूप काही गोष्टी डाउनलोड करत असतो. असे डाउनलोड करताना मुख्यत्वे स्लो कनेक्शन, नेटवर्क गायब होणे,१ एमबी डाऊनलोड करायला सुद्धा १० मिनिटे लागणे, डाउनलोड होता होता अचानक नेटचा संपर्क तुटून डाउनलोड रद्द होणे. एकावेळी एकच फाईल डाउनलोड होणे वगैरे सारख्या अडचणी तुम्ही नक्कीच अनुभवल्या असतील. विचार करा तुम्ही एखादी १०० एमबी ची फाईल डाउनलोड करत आहात. एक तास डाउनलोड करून तुम्ही ९९% फाईल डाउनलोड केली आणि अचानक तुमचे नेटचे कनेक्शन गेले अथवा विजेचा संपर्क तुटला तर तुमचा एक तास तर फुकट गेलाच पण तुमचे डाऊनलोडचे पैसे ही फुकट जातात शिवाय पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागते.
DAP
पण ह्या सगळ्या प्रॉब्लेमवर एक उपाय आहे तो म्हणजे Download Accelerator Plus (DAP).  डॅप हे सॉफ्टवेअर तुमच्या डाऊनलोड करायच्या फाईलला तिच्या आकार आणि केबी साईज अनुसार तीन,चार किंवा त्याहून अधिक भागात विभाजित करतो आणि हे वेगवेगळे भाग डाउनलोड करायला सुरुवात करतो. त्यामुळे तुमची फाईल लवकर डाउनलोड होते तसेच मध्ये नेटचा संपर्क तुटला किंवा लाईट गेली तरी सुद्धा पुन्हा कनेक्शन चालू झाल्यावर हा मागचा डाउनलोड लक्षात ठेवून त्यापुढेच चालू करतो. त्यामुळे तुमचे डाउनलोड चे पैसे फुकट जात नाहीत आणि तुम्हाला नव्याने सुरुवात सुद्धा करावी लागत नाही आणि वेळ ही वाचतो. तसेच तुम्ही हिस्ट्री वर क्लिक करून तुमचे जुने डाउनलोड सुद्धा बघू शकता. जर तुम्हाला एक १० एमबी चे गाणे डाउनलोड करायला १० मिनिटे लागत असतील तर त्याच पीसी वर डॅप हे गाणे १ ते २ मिनिटात डाउनलोड करू शकते. तसेच एखादे डाउनलोड तुम्ही पॉज करून नंतर सुद्धा चालू करू शकता. एकावेळी अनेक फाईल्स डाउनलोड करायला तुम्ही लावू शकता. ह्या डॅप बरोबर तुम्हाला इंटरनेट चे ब्राउजर आणि एफटीपी सॉफ्टवेअर सुद्धा फुकट मध्ये मिळते. नक्की डाउनलोड करण्यासारखे सॉफ्टवेअर आहे.

---------------------------------------------------------------------------------------

डॅपचा भाऊबंद असलेले हे सॉफ्टवेअर डॅप बरोबर तुम्हाला फुकट मिळते. नसेल मिळाले तर ते इथे डाउनलोड  करू शकता. हे सॉफ्टवेअर व्हीडीओ असलेल्या साईट विना रुकावट, पॉज न होता पाहू शकता. जसे यु ट्यूब वर अनेक वेळा तुम्हाला व्हीडीओ पूर्ण लोड होईपर्यंत थांबावे लागते किंवा थांबत थांबत बघावे लागते आणि व्हीडीओ बघायची इच्छाच निघून जाते. अशावेळी हे सॉफ्टवेअर व्हीडीओचे स्ट्रीमिंग लवकर करून जेवढे होईल तेव्हढे व्हीडीओ लवकर दाखवण्याचे प्रयत्न करते. दरवेळेला हे शक्य होत नाही पण जवळपास ९० टक्क्याहून जास्त केसेस मध्ये हे सॉफ्टवेअर उपयुक्त होते. 

जवळपास सर्व व्हीडीओ साईट वर हे सॉफ्टवेअर चालते. फक्त उच्च प्रतीचे  (HD - highdefinition) व्हीडीओला हे सपोर्ट करत नाही. त्यासाठी तुम्हाला पैसे देऊन पेड वर्जन खरेदी करावे लागते. दुसरी एक न आवडणारी एक गोष्ट म्हणजे ह्याच्या जबरदस्तीने बरोबर येणारे फुकट SPEEDbit Search टूलबार. साला निघता निघत नाही हा !!


हे सॉफ्टवेअर तुम्ही इथून डाउनलोड करू शकता.
---------------------------------------------------------------------------------------




काही वेळेला तुम्ही एखादा व्हिडीओ डाउनलोड करता किंवा सीडी, डीव्हीडी लावता पण त्यातील व्हिडीओ तुमच्या पीसी वर दिसताच नाही. विंडोज बरोबर येणारे Windows Media player हे सर्व प्रकारच्या फाईल्स प्ले करत नाही किंवा कधी कधी एखादे कोडेक (Codec) उपलब्ध नसल्याचे सांगते. अश्या वेळेला VLC Media Player- व्हिएलसी मिडिया प्लेयर हे फुकट सॉफ्टवेअर उपयोगी येते. जवळपास सर्व प्रकारच्या व्हिडीओज हे प्ले करते. ते सुद्धा चांगल्या पद्धतीने. 3gp, avi, mpeg,dat असे कुठलेही व्हिडीओ ह्यातून प्ले होतात. हे सॉफ्टवेअर क्रॅश होण्याचे प्रमाण ही खूप कमी आहे. तसेच हे सॉफ्टवेअर  विंडोज, मॅक वगैरे सर्व सिस्टीम मध्ये चालते.



हे सॉफ्टवेअर इथे डाउनलोड करू शकता  अथवा इथेही करू शकता.
---------------------------------------------------------------------------------------




गुगलचा फंडा ह्या सॉफ्टवेअरला सुद्धा लागू होतो. अतिशय हलके आणि उपयुक्त असे सॉफ्टवेअर आहे. गुगलचा उपयोग तुम्हाला माहितच आहे. नेटवरचे गुगलचे सर्च इंजिन खूप पॉवरफुल आहे. तेच सर्च इंजिन जर तुमच्या पीसी मधील फाईल शोधण्यास भेटले तर किती बरे होईल. तेच काम हे सॉफ्टवेअर करते. 

हे सॉफ्टवेअर तुमच्या पीसी मध्ये जर इंस्टॉल केले तर ते तुमच्या सर्व फाईल्स सूचीबद्ध, इंडेक्स (index) करते. सुरुवातीला हे करायला जरा वेळ लागू शकतो. तुमच्या पीसी मध्ये असलेल्या फाईल्स वर ते अवलंबून असते. जर तुम्ही पीसी बंद केला आणि परत जेव्हा चालू कराल त्यावेळेला पुढील इंडेक्स होणे चालू राहते. एकदा इंडेक्स करून पूर्ण झाले की नवीन तयार होणाऱ्या फाईल्स आपोआप इंडेक्स होत राहतात. 

गुगलचा सर्चबार तुमच्या टास्कबार वर येतो तेथे तुम्ही फक्त फाईलचे नाव टाईप करायचा अवकाश की तुमच्या फाईल्स दिसू लागतात. जर तुम्हाला फाईलचे नाव आठवत नसेल आणि फाईल मधील एखादा शब्द आठवत असेल तरीही चालते. तुम्ही तो शब्द टाकला की ती फाईल दाखवली जाते आणि ते सुद्धा सेकंद पूर्ण व्हायच्या आतच. मग आहे की नाही फायद्याचे...मग करा डाउनलोड.

ह्या सॉफ्टवेअरचा एकच हानिकारक परिणाम म्हणजे तुम्ही ह्याच्यावर अवलंबून राहू लागता आणि तुमच्या स्मृतीला ताण देत नाही....परिणामी तुमचा मेंदू कमी वापरला जातो.

हे सॉफ्टवेअर येथून डाउनलोड करता येईल.
---------------------------------------------------------------------------------------





WordWeb

कधी कधी काम करताना तुम्हाला एखादा इंग्लिश शब्दाचा अर्थ समजत नाही आणि त्यामुळे पूर्ण वाक्याचा अर्थ ही समजत नाही. अशा वेळेला डिक्शनरी कुठे शोधात बसणार. वर्डवेब ही अशी एक डिक्शनरी आहे जी तुम्हाला एका क्लिकवर एखाद्या शब्दाचा अर्थ, त्याचा विरुद्ध अर्थ, त्या शब्दाचा वाक्यात उपयोग वगैरे सगळे करून देते. हे सॉफ्टवेअर सर्व सिस्टीम वर चालते. तसेच जवळपास सर्व प्रोग्रामवर चालते. समजा तुम्ही इंटरनेट वर काही वाचत आहात किंवा एखादी वर्ड फाईल वाचत आहात आणि तुम्हाला एखादा शब्द अडला तर फक्त त्या शब्दावर डबलक्लिक करून सिलेक्ट करायचे आणि Ctrl+Alt+W किंवा टास्कबार वर येणाऱ्या W ह्या आयकॉन वर क्लिक करायचे तुम्हाला लगेच त्या शब्दाचा अर्थ तुमच्या स्क्रीन वर दिसेल. तो अर्थ जरी नाही समजला तरी त्याचे वाक्यात रुपांतर करून दाखवले असते त्यावरून तरी तुम्हाला नक्की समजेल. 

दीड लाखाहून अधिक मूळ शब्द ह्या डिक्शनरी मध्ये समाविष्ट केलेले आहेत. अतिशय उपयुक्त अशी सर्वात छोटी असलेली अशी ही डिक्शनरी आहे. ह्याचे पैसे देऊन जर पेड वर्जन घेतले तर त्याच्यात तुम्हाला शब्दांचे उच्चार (audio) सेवा पण मिळते. असे फुकट सॉफ्टवेअर देणारे खरच महान आहेत.

हे सॉफ्टवेअर तुम्ही इथे डाउनलोड अथवा इथे डाउनलोड करू शकता.
---------------------------------------------------------------------------------------

क्रित्येकदा तुम्ही फाईल्स एका फोल्डर मधून दुसऱ्या फोल्डर मध्ये कॉपी अथवा मुव्ह करत असताना, किंवा तुमच्या पीसी मधून पेन ड्राईव्ह मध्ये कॉपी करत असताना तुमच्या पीसीच्या कमी मेमरी मुळे खूप वेळ लागतो किंवा कॉपी करताना मध्येच काहीतरी एरर येते आणि सर्व पुन्हा कॉपी करावे लागते. विंडोज मध्ये जे कॉपी पेस्टचा पर्याय आहे तो तुम्हाला फक्त फाईल्स एकावर एक ओवरराईड करताना फक्त  'Yes to all' चा पर्याय देतो. 'No to All' अथवा 'skip' चा पर्याय नसतो.मग तुम्हाला एकेक फाईल चेक करत बसावे लागते. 


पण टेरा कॉपी हे एक असे सॉफ्टवेअर आहे जे तुमच्या सर्व अडचणी दूर करू शकते. हे सॉफ्टवेअर पीसीच्या कमी मेमरी मध्ये सुद्धा कॉपी पेस्ट जलदगतीने करते. हे सॉफ्टवेअर तुम्हाला फाईल ओवरराईड करताना कॉपी ऑल, स्कीप, फाईलचे नाव बदलून रिनेम(Rename) करायचा पर्याय पण देते. १० जीबीच्या फाईल्स सुध्या अगदी २ ते ३ मिनिटात कॉपी होतात. कॉपी करताना आलेल्या एरर बघायची सुद्धा सोय आहे. ज्यांना वाट बघायचा कंटाळा येतो त्यांनी हे सॉफ्टवेअर डाउनलोड करायला काहीच हरकत नाही.

हे सॉफ्टवेअर इथून अथवा इथून डाउनलोड करता येईल.
---------------------------------------------------------------------------------------




XOBNI - क्झोबनी


ह्या शब्दाचा उच्चार कसा करायचे ते तुमचे तुम्हीच ठरवा. सोयीसाठी मी इंग्लिश शब्दच वापरत आहे. Xobni हा शब्द बहुतेक त्याच्या निर्मात्यांनी Inbox ह्या शब्दावरून घेतला असावा.Inbox उलट वाचले तर Xobni असे होते. Xobni हे सॉफ्टवेअर आउटलुकचे ईमेल वापरणाऱ्यांसाठी आहे. तुमच्या आउटलुक मध्ये जर तुम्ही Xobni सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले तर ते तुमचे सर्व इमेल्स इंडेक्स करते आणि Xobni च्या सर्चबॉक्स मध्ये तुम्ही एखादा शब्द टाकला अथवा एखादा ईमेल टाकला तर त्याच्या संदर्भातील सर्व ईमेल दाखवते. 





हे सॉफ्टवेअर तुम्ही जीमेल वर आणि तुमच्या आयफोन मोबाईल वर पण चालवू शकता. पहिल्यांदा सर्व ईमेल इंडेक्स होईपर्यंत हे सॉफ्टवेअर जरा हळू चालते. पण एकदा इंडेक्सची प्रक्रिया पूर्ण झाली की मग हे सॉफ्टवेअर दणदणीत चालते. तुम्ही फक्त एक शब्द टाकायचा अवकाश ते फटाफट रिजल्ट देते. नवीन येणारे मेल्स ते आपोआप जेव्हा तुम्ही काम करत नसाल तेव्हा इंडेक्स करत राहते. 


एखाद्या इमेल आयडी वरून आलेले सगळे इमेल्स, त्यावरून आलेल्या सर्व फाईल्स, त्या व्यक्तीबरोबर किती वेळा तुमचा संवाद झाला आहे ह्याचा एक प्रकारे सगळा सारांश ते काढून देते. जर तुमच्या हाताखाली असलेली माणसे काम करतात की नाही ते बघायचे असेल तर हा एक छान पर्याय आहे. हे सॉफ्टवेअर तुम्हाला दिवसभरात, आठवड्यात, महिन्यात किती इमेल्स आले, तुम्ही किती इमेल्सला उत्तरे दिली, किती वेळात दिली ह्याचा सर्व गोषवारा हे सॉफ्टवेअर तुम्हाला देते. 



Xobni हे सॉफ्टवेअर इथे डाउनलोड करता येईल.
---------------------------------------------------------------------------------------


ही पोस्ट आता खुपच लांबली आहे. बाकीचे सॉफ्टवेअर बद्दल नंतर कधीतरी सांगीन. ही माहिती कशी आहे ते नक्की कमेंट मध्ये कळवा. मी टेक्निकल फिल्ड मध्ये नसलो तरी वरील माहिती अनुभवानुसार लिहिली आहे. जर कुठे चुकले असेल तर नक्की दुरुस्ती साठी सांगा. आणि हो! कमेंट करायला विसरू नका...तुमच्या बऱ्या वाईट प्रतिक्रियाच ह्या ब्लॉगचे इंधन आहे.


टीप : पीसी मध्ये अनेक सॉफ्टवेअर इंस्टॉल आणि अन-इंस्टॉल केल्याने पीसीची रजिस्ट्री वापरली जाते आणि सॉफ्टवेअर अनलोड करताना ती रजिस्ट्री बिघडवत (corrupt) जाते. त्यामुळे तुम्हाला जेवढ्या सॉफ्टवेअरची गरज आहे तेव्हाच ते इंस्टॉल करा.


CONVERSATION

1 comments:

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top