डबल सीट !!!!


डबल सीट !!!!

बाईक किंवा दोन चाकी वर डबलसीट बसणे किंवा दुसऱ्याला बसवले की मनुष्य प्राण्याच्या एका विचित्रच स्वभावाची अनुभूती येते. त्याचे स्वार्थी, अविश्वासी वगैरे गुण दिसून येतात … कसे?

जर तुम्ही स्वत: बाईक अथवा दोन चाकी चालवत असाल तर ती तुम्ही कशीही चालवत असाल तरीही तुम्हाला काही वाटत नाही.

मग तुम्ही ती ७०/८० च्या स्पीड ला चालवत असाल...किंवा

गटाराच्या/ रस्त्याच्या कडेवर चालवत असाल...किंवा

फुटपाथ वर चालवत असाल...किंवा

तुम्ही सुसाट गाडी चालवत दुसऱ्या गाड्यांना कट मारत असाल...किंवा

ट्राफिक मध्ये गाड्यांच्या गॅप मध्ये चालवत असाल....किंवा   

गाडी खड्ड्यातून आपटत नेत असाल...किंवा

स्पीडब्रेकरला स्लो न करता तशीच रेमटवत असाल.

जेव्हा तुम्ही स्वत: गाडी चालवत असाल तेव्हा त्याचे काही वाटत नसते किंवा त्या वेळेला तुम्ही मागच्या सीटवर बसलेल्या माणसाच्या मनाचा विचारही करत नाही. आपल्याच मस्तीत चालवत असतात . पण तेच जर तुम्ही स्वत:  मागच्या सीट वर बसलेले असाल तर मात्र तुम्ही गाडी चालवणाऱ्याला सल्ले द्यायला चालू करता.


तिथे जास्तीत जास्त स्पीड ५० लिहिला आहे तू ७०/८० वर काय पळवतोस …मामा पकडेल ना!

अरे त्या कडेवर चालवू नकोस गाडी स्लीप झाली तर आपण दोघे आतमध्ये पडू.. साईडला घे पाहू !!!

अरे फुटपाथ हा रस्त्यावर चालणाऱ्या लोकांसाठी बनवला आहे ….आधी रस्त्यावर उतरव पाहू .

अरे अशी कट मारत जाऊ नकोस , रिस्की असते....कधी बॅलन्स गेला तर ??

अरे ट्राफिक मध्ये अश्या गाड्या वळवू नकोस ….लेन ची शिस्त पाळ जरा !!!

अरे खड्डे सांभाळ जरा …मला ना पाठीचा प्रोब्लेम आहे रे !!

स्पीडब्रेकर ला गाडी स्लो करायची असते रे...आजूबाजूला शाळा बीळा असेल !!

एक नाही हजार बहाणे !!!! अरे च्यामायला तुम्ही जेव्हा कशीही बेदरकारपणे गाडी चालवता तेव्हा चालते …तशीच गाडी दुसरा चालवतो तेव्हा फाटते. हा मनुष्याचा स्वार्थी स्वभाव नाही का? दुसरा गाडी चालवतो तेव्हा त्याच्यावर तुम्ही अविश्वास नाही का दाखवत? भले तो गाडी चालवण्यात कितीही एक्स्पर्ट असला तरी ? पण मला वाटते ह्यात कोणाचा दोष नाही …मनुष्याचा नैसर्गिक स्वभावाच तसा असतो …आणि हे गुण जन्मापासूनच अंगभूत असावेत.

तुम्हाला काय वाटते ?

DSCN2716-2



CONVERSATION

2 comments:

  1. अगदी खर आहे रे हे... साला मनुष्य हे यंत्रच अस बनवलाय देवाने ..अनाकलनीय ... :)

    ReplyDelete
  2. धन्यवाद दवबिंदू. खरच अनाकलनीय.

    ReplyDelete

आवडले तर कमेंट करायला विसरू नका !!

Back
to top